महाराष्ट्र पोलीस खात्याचे प्रमुख संजय पांडे यांनी कोरोना संकटात पोलीस हिताचे अनेक निर्णय घेतले. कोरोनासह राज्यभरात पोलिसांसाठी आजवर अनेक हितकारक निर्णय घेतले. या निर्णयांपैकी एक उत्तम निर्णय म्हणजे राज्यभरातील महिला पोलिसांना आठ तासांचे कर्तव्य बजावण्याचा घेतलेला कौतुकस्पद निर्णय ! या निर्णयामुळे सध्या पोलीस कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. कर्तव्य बजावणाऱ्या इतर पोलिसांच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस प्रमुख या नात्याने महासंचालक राज्य पोलीस दल प्रमुखांच्या सतत संपर्कात असतात. दर रविवारी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन संवाद साधतात. पोलिसांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी आवाहन करून त्यावर अंमलबजावणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.

महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी आतापर्यंत केलेल्या कर्तव्यावर प्रकाश पाडल्याशिवाय हे व्यक्तिमत्व समजणे शक्य नाही. पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार असून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा पदभार सुद्धा असणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या संचालक पदाचा कायभार सुद्धा असणार आहे. संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. एक शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख आहे. जगात सर्वात मोठे लोकशाही राज्य म्हणून महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक महत्त्वाचे आणि सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारे राज्य आहे.
पोलीस महासंचालक पदी विराजमान झाल्यानंतर अवस्या काही दिवसांत त्यांनी पोलिसांच्या हितासाठी बेट राज्य शासनाकडे विनंती केली. राज्य सरकारी कर्मचान्याच्या तुलनेत पोलिसांना जादा कामाचे तास जास्त असून सुट्याही कमी आहेत. इतरांना वर्षभरात १०४ सुटया मिळतात तर पोलिसांना फक्त ७७ दिवसांच्या मिळतात. इतरांना ७७ दिवसांच्या वार्षिक साप्ताहिक सुटया मिळातांना पोलिसांना केवळ ५२ दिवस मिळतात. सरकारी सार्वजनिक सुटया २५ असूनही पोलिसांना त्या मिळत नाहीतर अतिरिक्त १५ दिवसाच्या रजा पोलिसांना मिळत असतात मात्र त्याही त्यांना बंदोबस्तामुळे कधी कधी मिळत नाहीत. किरकोळ रजा कर्मचान्यांना ८ दिवसांच्या तर पोलिसांना १२ दिवस मिळत असल्या तरी सरकारी कर्मचान्यांना वर्षभरात तब्बल १३७ दिवस सुट्टया मिळतात. या तुलनेत पोलिसांना केवळ ७९ दिवस सुट्या उपलब्ध असतात मात्र या सर्व सुट्या पोलिसांना उपभोगता येत नाही, याकडे पांडे यांनी सरकारचे लक्ष वेधले.
भारत हा उत्सवप्रिय देश असून महाराष्ट्र राज्य त्याला अपवाद नाही. मागील दीपावली म्हटले की प्रत्येकाच्या उत्साहाला उधाण येत असते. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांनी सरकारने दिलेले नियम-अटींचे पालन करूनच आपापल्या परीने दीपावलीचा सण साजरा केला. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जरी कमी झाले अद्याप कोरोना गेलेला नाही. त्यामुळे सुजान नागरिक म्हणून आपणही काळजीपूर्वक सण साजरा केला. नेहमीप्रमाणे राज्य पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी तैनात आहेतच. राज्यातील पोलिसांच्याही दिवाळी असते अन् पण अनेकदा पोलीस असलेल्या कुटुंबप्रमुखाचा त्यात सहभाग नसतो. यंदा तर पोलिसांवर दुहेरी जबाबदारी होती. कोरोना आणि कायदा व सुव्यवस्था राखणे कोरोना संकटात आलेली दीपावली तेजोमय कशी होईल याची जबाबदारी पोलिसांवर होती कोरोनामुळे नागरिकांनीही सहकार्य केले.