सचिन तेंडुलकर कोण आहे?
सचिन तेंडुलकर माहिती (Sachin Tendulkar Mahiti) आपण जाणूनच घेणार आहोत कारण भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर हा देव आहे.
आपण एक जप ऐकला असेल, तुम्हाला कदाचित क्रिकेट खेळ विषयी जास्त माहित नसेल तरी तुम्ही देखील कधी तरी हा जप नाही ऐकला असेल. वानखेडे मधून उगम होऊन तो सात समुद्रपार देखील ऐकला गेला आहे.
तो जप आहे “सचिन! सचिन!”. हो तुम्हाला विचित्र वाटेल कदाचित पण जेव्हा सचिन मैदानात फलंदाजी करायला असायचा तेव्हा हा जप त्याचे चाहते करत असायचे आणि त्याला प्रोत्साहन देत असत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असे नाव आहे जे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेकांना प्रेरणा देत आहे.
भारतीय क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर नावाने खूप दबदबा निर्माण झाला होता, ज्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली बनवले.
भारतीय संघ एका बाजूला आणि एकटा सचिन एका बाजूला अशी परिस्थिती असायची, त्याने एकट्याचं जीवावर किती तरी विजय मिळवून दिले आहेत. तो जर बाद झाला तर आपण हारलो असेच सर्व समजून टीव्ही बंद करायचे.
सचिन तेंडुलकर शिवाय भारतीय संघ कसा असतो हे माहित नसताना एक संपूर्ण पिढी मोठी झाली.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा, दोन फॉर्मेटमधील सर्वाधिक शतके आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके यासह आकडेवारीने पछाडलेल्या खेळात त्याच्याकडे जवळपास प्रत्येक फलंदाजीचा विक्रम आहे.
100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा एकमेव फलंदाज, 200 कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू, एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा पहिला, 30,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा एकमेव फलंदाज.
कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मध्ये सर्वात जास्त धावा आणि शतके करणारा फलंदाज आहे.
गोलंदाजांनी टाकलेल्या चेंडूला आपल्या बॅट ने उत्तर देणे त्याला उत्तम येत होते, प्रत्येक चेंडू तो मैदानात त्याला पाहिजे त्याठिकाणी तो मारू शकत होता.
तो फलंदाजी करायला आला कि सर्व प्रेक्षक त्याची फलंदाजी बघण्यात आपले काम विसरून जात असत. सचिन वर कधी कोणी टीका केली तर तो त्यांना आपल्या उत्तम फलंदाजी मधून सडेतोड उत्तर देत असे.
कौटुंबिक पार्श्वभूमी
त्याचे संपूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहे. सचिन चा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईच्या दादर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तो सुप्रसिद्ध सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील आहेत.
त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठी कवी आणि कादंबरीकार होते. त्याच्या आईचे नाव रजनी होते, त्याची आई विमा उद्योगात काम करणारी होती.
सचिनला त्याचा मोठा भाऊ अजित कडून खूप प्रोत्साहन आणि साहाय्य मिळाले. सचिन देखील हे कित्येकदा बोलून दाखवतो कि त्यांच्या क्रिकेट जीवनात त्यांच्या भावाचे पण खूप योगदान आहे.
तो लहान असताना त्याच्या काका काकू कडे राहायचा कारण त्याला क्रिकेटचं मैदान जवळ पडावे म्हणून. त्याच्या काका काकूंनी देखील त्याच्यावर आई वडिलांसारखे प्रेम केले.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा तो पहिल्या आंतरराष्ट्रीय दौर्यावरून परतत होता तेव्हा तो आपली जीवनसाथी अंजलीला भेटला. बघताच क्षणी दोघांना प्रेम झाले, त्याची ओळख एका मैत्रिणीने अंजलीशी केली आणि तिला क्रिकेट या खेळा विषयी काहीच माहिती नव्हते.
पाच वर्ष डेटिंग करुन सचिन आणि अंजलीने 1995 मध्ये एकमेकांशी लग्न केले. अंजली एक बाल-चिकित्सक आहे त्यांना सारा नावाची मोठी मुलगी आहे तर अर्जुन नावाचा मुलगा आहे.
सचिनकडे पहिले कि खूप कौतिक वाटते आणि अभिमान वाटतो. तो एक उत्तम फलंदाज असण्याच्या सोबतच तो उत्तम मुलगा, भाऊ, पती, आणि आता वडील देखील आहे.
त्याच सचिन आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच आपली सामाजिक बांधीलकीपण जपत असतो. वेळोवेळी तो सामाजिक कामे करत असतो.
सुरुवातीचे दिवस
सचिनचे पहिले क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर हे आहेत. सचिन शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत असतानाच क्रिकेटचे धडे गिरवायला क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्या कडून सुरुवात केली.
सचिनने शाळेत असताना बालमित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळी सोबत हॅरीस शील्ड सामन्यात 664 धावांची अजस्र भागीदारी रचली होती. आपण वाचत आहात सचिन तेंडुलकर माहिती.
1988-89 साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये 100 धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय 15 वर्षे 232 दिवस होते, आणि पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता.
आंतरराष्ट्रीय कारकिर्द
सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1989 साली पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान मध्ये कराची येथे खेळला. वकार युनूस चा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामध्ये सचिनला त्याने 15 धावांवर त्रिफळाचीत केले होते.
सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली होती.
आपल्या पहिल्याच सामन्यात वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा त्याला सामना करावा लागला. सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून वकार युनूस सोबत बदला घेतला होता.
पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सचिनची सुरुवातही खराब झाली. डिसेंबर 18 ला झालेल्या आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच परत एकदा वकार युनूसने त्याला बाद केले.
सचिनने आपले पहिले कसोटी शतक 1990 सालच्या इंग्लंडच्या दौर्यात झळकवले. परंतु 1991-92 सालच्या ऑस्ट्रेलियन दौर्यात सचिन तेंडुलकरला आपला खरा सूर गवसला होता. त्यावेळी त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली.
2 वेळा सचिन बॉर्डर-गावसकर चषकामध्ये मालिकावीर राहिला आहे, तसेच आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये 11 वेळा सामनावीर होण्याचा बहुमान मिळाला आहे. सचिन तेंडुलकर माहिती वाचताना तुम्हाला आनंद येत असेलच.
थोडक्यात परिचय: सचिन तेंडुलकर माहिती
- पूर्ण नाव: सचिन रमेश तेंडुलकर
- जन्म: 24 एप्रिल, 1973
- जन्मस्थानः बॉम्बे (आताचे मुंबई), महाराष्ट्र
- टोपणनाव: क्रिकेटचा देव, लिटल मास्टर, मास्टर ब्लास्टर
- राष्ट्रीयत्व: भारतीय
- वडिलांचे नाव: कै. रमेश तेंडुलकर
- आईचे नाव: रजनी तेंडुलकर
- भाऊ: नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर
- बहिण: सविता तेंडुलकर
- जोडीदार नाव: अंजली तेंडुलकर
- लग्नाची तारीख: 24 मे, 1995
- मुले: सारा आणि अर्जुन तेंडुलकर
- भूमिका: फलंदाज
- फलंदाजी: उजवा हात
- गोलंदाजी: उजवा हात मध्यम, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक
- वनडे पदार्पण: 18 डिसेंबर, 1989 विरुद्ध पाकिस्तान
- कसोटी पदार्पण: 15 नोव्हेंबर, 1989 विरुद्ध पाकिस्तान
- आवडता खाद्यपदार्थ: बॉम्बे डक, कोळंबी करी, क्रॅब मसाला, कीमा पराठा, लस्सी, चिंगरी कोळंबी, मटण बिर्याणी, मटन करी, बायगन भारता इत्यादी
- आवडता अभिनेता: अमिताभ बच्चन, आमिर खान, नाना पाटेकर
- आवडती अभिनेत्री: माधुरी दीक्षित
- आवडता रंग: निळा
सचिन तेंडुलकरची काही मनोरंजक तथ्य
- सचिनचे वडील प्रसिद्ध संगीतकार एस.डी. बर्मन खूप मोठे चाहते होते. एस.डी. बर्मन चे पूर्ण नाव सचिन देव बर्मन असे होते, त्यामुळेच त्यांनी आपल्या लाडक्या मुलाचे नाव त्यांच्या नावावरून “सचिन” असे ठेवले.
- रणजी सामना खेळणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर चे नाव घेतले जाते, वयाच्या 14 व्या वर्षी सचिनने रणजी सामने खेळायला सुरुवात केली.
- खरं तर सचिनला फलंदाज बनण्यात काहीरस नव्हता, त्याला वेगवान गोलंदाज बनायचे होते, पण त्याचे ते स्वप्न भंगले त्याचे झाले असे कि, 1987 साली चेन्नईच्या MRF Pace Academy मध्ये प्रसिद्ध ओस्ट्रेलियन गोलंदाज डेनिस लिली ह्यांनी सचिनला वेगवान गोलंदाज म्हणून रिजेक्ट केले.
- सचिन हा खरा डावखुरा व्यक्ती आहे, तो क्रिकेट मध्ये उजव्या हाताने बॅटिंग आणि बॉलिंग करतो, पण लिखाण आणि इतर कामे मात्र डाव्या हाताने करतो.
- एक आगळावेगळा विक्रम सचिनच्या नावावर आहे. तो असा एकमात्र खेळाडू आहे ज्याला संघ हरलेला असताना देखील सहा वेळा Man-of-the-Match पुरस्कार मिळालेला आहे.
- त्याच्या वयाची 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत सचिनने कसोटी कारकिर्दीमध्ये 5 शतके ठोकली होती. क्रिकेट विश्वात हा देखील जागतिक विक्रम आहे.
- वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये 2000 रन्सचा टप्पा पार करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे. वर्ल्डकप क्रिकेटच्या 45 सामान्यांमध्ये 2278 रन्स केलेल्या आहेत.
- 1996 च्या वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक 523 रन्स केले होते आणि 2003 च्या वर्ल्डकप मध्ये त्याने सर्वाधिक 673 रन्स. त्याच्या नावावर दोन वर्ल्डकप टूर्नामेंट्समध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून विक्रम आहे.
- अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध 19 विकेट्स पटकावत विक्रम घडवला होता तो सामना तुम्हाला आठवतो का? फिरोजशहा कोटलावर पाकिस्तान विरुद्ध जो सामना सुरु होता तेव्हा ओव्हर सुरु होण्यापूर्वी कुंबळेचे स्वेटर आणि कॅप काढून अम्पायरकडे सचिनने सोपवले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी अनिल कुंबळेने विकेट्स घेतल्या आहेत.
- सचिनला पुरस्कार म्हणून मिळालेली पहिली शॅम्पेन त्याने आपल्या मुलीच्या पहिल्या बर्थडेच्या वेळी उघडली आणि सेलिब्रेशन केले. झाले असे कि, सचिनला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या सेंच्युरीसाठी Man-of-the-Match पुरस्कार 1990 साली मिळाला, तेव्हा त्याला सेलिब्रेशन करण्यासाठी शॅम्पेनची बॉटल देण्यात आली होती, परंतु तेव्हा त्यावेळी त्याचे वय 18 पेक्षा कमी होते म्हणजे कायद्याप्रमाणे तो मद्याचा वापर करू शकत नव्हता.
कसोटीतील कारकिर्दीतील ठळक कामगिरी
- सचिनला विस्डेनतर्फे दुसर्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान आहे. प्रथम क्रमांकावर डॉन ब्रॅडमन आहेत.
- सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिनच्या आधी सुनील गावसकर यांनी 34 शतके केल्याचा विक्रम होता, त्यांचा हा विक्रम सचिनने दिल्लीमध्ये 2005 साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना 35 वे शतक करून मोडला.
- आतापर्यंत सचिन 52 मैदानांवर कसोटी सामने खेळून विक्रम केला आहे. मोहम्मद अझहरुद्दीन 48 आणि कपिल देव 47 या भारतीय खेळाडूंचा नंबर लागतो तर, इंजमाम उल-हक 46 आणि वसिम अक्रम 45 ह्या पाकिस्तानी खेळाडूंचा मैदानांवर क्रिकेट खेळले आहेत.
- सर्वात जलद 10000 कसोटी धाव करणायचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा ह्या दोघांमध्ये समान आहे, कारण दोघांनीही 195 डावांमध्ये त्या धाव केल्या आहेत.
- सर्वाधिक एकूण कसोटी धावा करण्यात सचिनचा पहिला क्रमांक आहे.
- सचिन ची सर्वोच्च फलंदाजीची सरासरी: 53.79. ही आहे.
- 10000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा सचिन हा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
- सचिनच्या नावावर 37 कसोटी बळी आहेत.
- जलद 9000 धावा करणारा फलंदाज म्हणून सचिन दुसर्या क्रमांकाचा आहे. ब्रायन लाराने 177 डावांमध्ये ती कामगिरी केली आहे.
- सचिनची कसोटी कारकीर्द 24 वर्षे आणि 1 दिवसांची आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी (सचिन तेंडुलकर माहिती)
- सचिनच्या नावावर सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम आहे
- सर्वात जास्त (50) वेळा सामनावीर म्हणून मान मिळण्याचा विक्रम
- सर्वात जास्त (89 वेगवेगळ्या) मैदानांवर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला आहे
- 18008 धावा बनवले आहे, ह्या सर्वात जास्त धावा आहे एका खेळाडूच्या.
- सर्वात जास्त शतके (49)
- ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे विरुद्ध सर्वात जास्त शतक केले आहेत.
- 10000, 11000, 12000, 13000 आणि 14000, 15000, 16000, 17000, 18000 धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज.
- सचिन असा एकमेव फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 14000 धावांचा टप्पा पार केला
- एकमेव असा फलंदाज ज्याने 100 डांवांमध्ये 50 अथवा अधिक धावा केल्या
- गोलंदाजीत 100 हून अधिक बळी
- 10000 पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वात जास्त फलंदाजीची सरासरी
- एका वर्षात 1000 अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वात जास्त वेळा करण्याचा विक्रम. आत्तापर्यंत सहा वेळा हि कामगिरी केली
- 1998 साली त्याने 1894 एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम अबाधित आहे.
- 1998 साली त्याने 9 एकदिवसीय शतके झळकवली. हा विक्रम अबाधित आहे.
- एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच 200 धावा फटकावण्याचा विक्रम, फेब्रुवारी 2010 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये हि कामगिरी केली.
विश्वचषका मधील विक्रम
- विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावा (59.72 च्या सरासरीने 1732 धावा).
- 2003 सालच्या विश्वचषकासाठी मालिकावीर म्हणून निवडण्यात आहे.
- 2003 सालच्या विश्वचषकामध्ये त्याने 673 धावा केल्या. ह्या कोणीही कोणत्याही एका विश्वचषकामध्ये केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत.
सचिन ने 23 डिसेंबर 2012 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
सचिनच्या नावातील इतर विक्रम
- तिसर्या पंचाकडून धावचीत दिला गेलेला पहिला फलंदाज आहे.
- यॉर्कशायर क्रिकेट काउंटी क्लबमध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे.
- सर्वोच्च 100 फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद केलेली नाही, हे विशेष.
सचिन ने केले काही विक्रम मोडता न येणारे आहेत.
सचिनला मिळालेले विशेष पुरस्कार
भारत सरकार ने सचिनला पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सचिनच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशीच भारत सरकारतर्फे भारतरत्न ह्या सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली आणि पुढे तो सन्मान देण्यात आला.
त्याशिवाय त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा भारतीय विमान दलाने प्रदान केलेला आहे, असा मान मिळालेला सचिन पहिला खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेली पहिले व्यक्ती आहे.
म्हैसूर विद्यापीठाने आणि राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव 6 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईत प्रदान करण्यात आला.
तसेच सचिन तेंडुलकरची भारत सरकार तर्फे राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्ती केली गेली होती. सचिन तेंडुलकर माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करण्यास विसरू नका.