मुंबई पोलीस ! नावतच सर्व काही विश्लेषण करायची गरज नाही. आपल्या देशाचा जसा इतिहास आहे अगदी तसाच इतिहास मुंबई पोलीस खात्याचा आहे अगदी तसाच इतिहास मुंबई पोलीस दलाचा आहे. या इतिहासात सुवर्ण नोंद करण्यासाठी कर्तव्य दक्ष पोलिसांनी मोलाचे कार्य आहे. परिणामी मुंबई पोलीस खात्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, खात्याची प्रतिमा उजळवली आहे. त्यामुळे नेहमीच मुंबई पोलीस दलाचा सरदार अर्थात पोलीस आयुक्त पदाची ‘किल्ली’ हाती पडण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये कायम रस्सीखेच असते. मात्र मुंबई पोलीस आयुक्त पदाचा मान नुकताच हेमंत नगराळे यांना मिळाला होता.

मुंबईभोवती पसरणाऱ्या अमलीपदार्थाचे जाळे तोडण्यासाठी हेमंत नगराळे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटातही हेमंत नगराळे यांनी उत्तमोत्तम निर्णय घेऊन मुंबई पोलिसांना दिलासा दिला आहे. अशा या दुलखुलास सक्षम व्यक्तिमत्व लाभलेल्या आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कर्तव्याचा आढावा घेण्याचा केलेला प्रयत्न
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला गेले. तेथील पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केले आहे. १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळे यांच्या कर्तव्याची नोंद घेवून त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकट काळात महाराष्ट्र पोलीस उत्तम कामगिरी करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे सरकारी, खासगी कार्यालये, जीवनावश्यक वस्तूंसह इतर दुकाने व उद्योगधंदे बंद पडले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना डॉक्टर रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. लॉकडाऊनचा आदेश जारी होताच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालकांपासून पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार पूर्ण ताकदीने कर्तव्य बजावण्यास सज्ज झाले. जसजसा एक दिवस पुढे जात होता तशी पोलिसांवर जबाबदारी वाढत होती. लॉकडाऊन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या पलीकडे जाऊन लोकहितकारक कर्तव्य बजावण्यात आले. कर्तव्य बजावताना हजारो पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी शेकडो पोलीस अधिकारी व अंमलदारांना वीर मरण आले. तरीदेखील पोलीस डगमगले नाही. आपले कर्तव्य सुरूच ठेवले.
कोरोना काळात पोलीस आपापल्या परीने माणुसकी जपत होते. माणुसकी जपत असताना काही पोलिसांनी व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांनी लाखमोलाचे कार्य केले.. मुनष्याच्या जिवनातील शेवटचा विधी म्हणजे अंत्यसंस्कार ! कोरोना नावाच्या महाभयंकर संसर्गाने अनेकांना आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता आले नाही. त्यावेळी पोलिसांनी कसाही विचार न करता विधीपूर्वक सन्मानाने ( संबंधित धार्मिक विधीनुसार) अंत्यसंस्कार केले. पोलिसांप्रति आधीपासून अभिमान आहे. मात्र कोरोना काळात पोलिसांनी कर्तव्यापलीकडे जाऊन बजावलेल्या कर्तव्यामुळे पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद झाली आहे. ही नोंद कायम स्मरणी राहील.