Categories
Biography

सुंदर पिचाई माहिती: Google कंपनीचे CEO होण्यापर्यंत असलेली मेहनत आणि संघर्ष

आपल्यातील बहुतेकांना सुंदर पिचाई हे Google कंपनीचे CEO आहेत आणि ते भारतीय वंशाचे आहेत हेच माहीत आहे. आज आपण त्यांच्या बालपणा पासून ते CEO होण्यापर्यंतचा प्रवास बघू.

सुंदर पिचई परिचय

रघुनाथ पिचाई आणि लक्ष्मी ह्यांच्या घरी 10 जून, 1972 मध्ये मदुरै, तामिळनाडू येथे सुंदर पिचाई यांचा जन्म झाला. त्याचे मूळ नाव पिचाई सुंदरराजन असे आहे पण सुंदर पिचई म्हणूनच सर्वाना परिचित आहेत.

सुंदर पिचाई यांचे वडील रघुनाथ पिचाई हे ब्रिटिश समूहाच्या जीईसी मध्ये एक इलेक्ट्रिकल इंजीनियर पदावर होते, तर आई लक्ष्मी ह्या एक स्टेनोग्राफर होत्या. रघुनाथ यांचा मैन्युफैक्चरिंग प्लांट होता इलेक्ट्रिक कॉम्पोनेंट बनवले जात होते.

सुंदर पिचाई

सुंदर पिचाई यांनी आपली दहावी जवाहर नवोदय विद्यालय, अशोक नगर, चेन्नई येथून केली. तर वना वाणी स्कुल, चैन्नई येथून बारावी केली आहे. तसेच सुंदर ने मेटलर्जिकल इंजीनियरिंग ची बैचलर डिग्री, आयआयटी, खड्गपूर येथून घेतली आहे. याशिवाय सुंदरने अमेरिकेत स्टॅनफोर्ड विद्यापीठा मधून एमएस आणि व्हॉर्टन विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. सुंदर पिचाई यांना पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात सिबेल स्कॉलर म्हणून ओळखले जात असे.

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सुंदर पिचाई हे 1995 मध्ये स्टॅनफोर्डमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी जुन्या गोष्टी वापरल्या परंतु आपल्या अभ्यासा सोबत, शिक्षणाशी तडजोड केली नाही. त्यांना पीएचडी मिळवायची होती पण परिस्थिती अशी झाली कि त्यांना प्रोडक्ट मैनेजर अप्लायड मटीरियल्स इंक नोकरी करावी लागली. प्रसिद्ध कंपनी मैक्किंसे मध्ये कंसल्टेंट म्हणून काम करून देखील त्यांची स्वतःची अशी कोणतीच ओळख तयार झाली नव्हती.

सुंदर पिचाई चे कार्य

पुढे सुंदर ने 1 एप्रिल 2004 रोजी त्याने Google मध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी त्याच पहिले प्रोजेक्ट प्रोडक्ट मैनेजमेंट आणि इनोवेशन विभागात गूगलच्या  सर्च टूलबारला सुधारण्याचे आणि दुसऱ्या ब्रॉउजरच्या ट्रैफिकला गूगल वर घेऊन येणे हे होते. ह्याच दरम्यान सुंदर ने एक सूचना केली कि, गुगलने आपले ब्राउझर लॉन्च करावे.

बस्स ह्या एका कल्पनेमूळे तो गूगलचे संस्थापक लॅरी पेजच्या नजरेत आले. ह्या कल्पनेमूळे त्याला आपली खरी ओळख मिळू लागली. 2008 ते 2013 पर्यंत सुंदर पिचाईच्या नेतृत्वात क्रोम ऑपरेटिंग सिस्टमची यशस्वी लॉन्चिंग झाली आणि त्यानंतर जगभरात एंड्रॉइड मार्केट प्लेस वरून त्याचे नाव झाले.

Google Drive, Gmail App आणि Google Video Codec हे सुंदर पिचईने बनवले आहेत. सुंदर ने बनवलेल्या Chrome OS आणि Android App ने त्यांना Google मध्ये अग्रस्थानी पोहचवले. गेल्या वर्षी Android विभागाची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली आणि तसेच त्याने Google च्या इतर व्यवसायाच्या प्रगतीत आपले योगदान दिले. सुंदरच्या मुळेच Google ने Samsung सोबत भागीदारी केली.

सुंदर पिचाई

ज्यावेळी सुंदर प्रोडक्ट मैनेजर म्हणून Google मध्ये लागले तेव्हा त्यांनी इंटरनेट यूजर्ससाठी एक रिसर्च केले होते, यूजर्स जे काही इन्स्टॉल करू इच्छितो ते लवकरात लवकर इन्स्टॉल झाले पाहिजे. परंतु हे काम जास्त मजेदार नव्हते, तरी देखील त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतर कंपन्यांसोबत चांगले संबंध ठेवले, ज्यामुळे टूलबार मध्ये सुधारणा होऊ शकेल. त्यांना प्रोडक्ट मैनेजमेंट चे डायरेक्टर बनवले गेले. 2011 साली जेव्हा लॅरी पेज Google चे CEO झाले तेव्हा त्यांनी लगेच सुंदर पिचाई यांना प्रमोट केले आणि सीनियर वाइस प्रेसीडेंट बनवले.

सुंदर पिचाई

गुगलने आपल्या कंपनीचे नाव Alphabet Inc. मध्ये बदलले, त्यानंतर लॅरी पेज हे Alphabet Inc चे CEO झाले आणि त्यांनी सुंदर पिचाईला  Google LLC चे CEO बनवले. सुंदर पिचाई यांनी 2 ऑक्टोबर 2015 रोजी Google LLC चे CEO म्हणून पद स्वीकारला आणि त्यानंतर ते 3 डिसेंबर, 2019 रोजी Alphabet Inc चे CEO झाले.

व्यक्तिगत जीवन

सुंदर पिचाई ह्यांच्या पत्नीचे नाव आहे अंजली हरयानी, त्यांना काव्या आणि किरण नावाची दोन मूल आहे. सुंदर पिचाई ह्यांना फुटबॉल आणि क्रिकेट खूप आवडतात.

सुंदर पिचाई

पत्नी अंजली सोबत त्यांची भेट आयआयटी खडगपुर येथे झाली, ते दोघे हि एकाच वर्गात होते आणि दोघे पहिल्या पासून मित्र होते होते. त्यावेळी  सुंदर कॉलेज मध्ये असलेल्या सरोजिनी नायडू हॉल मधून अंजलीला वसतिगृहात फोन करायचे.

एका मुलाखतीत सुंदर ने सांगितले कि कॉलेजच्या काळात कॉल करणे खूप कठीण होते, सुंदर सांगतात कि, अंजलीच्या वसतिगृहाबाहेर जात असे आणि वसतिगृहाबाहेर फिरणाऱ्या कोणत्याही मुलीला अंजलीला बोलवायला सांगत असे आणि त्या मोठ्याने आवाज देत कि “अंजली, सुंदर आला आहे”. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, सुंदर पिचाई ने अंजली ला कॉलेजच्या शेवटच्या वर्षी लग्नासाठी मागणी घातली आणि त्यामागणीला अंजलीचा होकार आला.

Marathi News Live

सुंदर पिचाईच्या यशामागील संघर्षाची कहाणी

सुंदर पिचाईने एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी बोलतांना सांगिलते कि, ज्यावेळी त्यांना स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत यायचे होते तेव्हा तो काळ खूप आव्हानात्म होता.

अमेरिकेचे विमानाचे तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांच्या वडिलांना आपल्या वर्ष भराच्या पगारा इतकी रक्कम खर्च करावी लागली होती, जेणे करून मी स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी मध्ये येऊन शिक्षण घेऊ शकेल. तो विमान प्रवास माझा पहिला प्रवास होता… आणि अमेरिकेचा खूप महाग.

त्यावेळी घरी एक फोन करण्यासाठी एका मिनिटाचे 2 डॉलर खर्च करावे लागत होते. तसेच एका बॅगची किंमत सुद्धा माझ्या वडिलांच्या एका महिन्याच्या पगार इतकी होती.

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सुंदर पिचाई हे 1995 मध्ये स्टॅनफोर्डमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी जुन्या गोष्टी वापरल्या परंतु आपल्या अभ्यासा सोबत, शिक्षणाशी तडजोड केली नाही.

सुंदर सांगतात कि, मी तर बिना टेक्नोलॉजीचा मोठा झालो आहे, मी 10 वर्षाचा होई पर्यंत आमच्या घरी टेलिफोन देखील नव्हता, टेलिफोन येण्यासाठी आम्हाला पाच वर्ष वाट बघावी लागली. पण जेव्हा टेलिफोन आला तेव्हा तो जणू सार्वजनिक टेलीफोन झाला, आजूबाजूचे शेजारी आपल्या मुलांना नातेवाईकांना फोन करण्यासाठी येत असे. तसेच मी अमेरिकेला येई पर्यंत मला कॉम्पुटर वापरायला नव्हता आणि जेव्हा आमच्याकडे पहिला टीव्ही आला तेव्हा त्याच्यावर फक्त एकच चैनल येत होता.

Categories
Biography

डिंपल कपाडिया बद्दलच्या 30 मनोरंजक गोष्टी

आज आपण माहिती करून घेणार आहोत बॉलीवूड सिनेअभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) बद्दलच्या 30 मनोरंजक गोष्टी:

 • डिंपल कपाडिया चा जन्म 8 जून 1957 रोजी झाला, तिचे वडील चुनीभाई कपाडिया यांच्या घरी झाला. ते एक अतिशय श्रीमंत व्यक्ती होते, ते आपल्या ‘समुद्र महाल’ ह्या घरा मध्ये बऱ्याचदा चित्रपटातील कलाकारांना पार्ट्या देत असत. असे म्हटले जाते की अशा एका पार्टीमध्ये चित्रपट निर्माते राज कपूरने 13 वर्षीय डिंपल हिला पहिले आणि डिंपल राज कपूर यांच्या चांगलीच लक्षात राहिली.
 • राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा महत्वाकांक्षी चित्रपट जेव्हा सिनेमाघरात काहीच यश मिळवू शकला नाही, तेव्हा त्यांनी नवीन कलाकारांसह चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला मुलगा ऋषी कपूर ला ‘बॉबी’ च्या माध्यमातून लाँच केले आणि 16 वर्षांची डिंपल नायिका म्हणून निवडली.

डिंपल कपाडिया - Dimple Kapadia

 • ज्यावेळी बॉबी सिनेमा आला तेव्हा एक अफवा खूप पसरली होती कि, डिंपल हि राज कपूर आणि नर्गिस ह्याची मुलगी आहे.
 • बॉबी (1973) च्या रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वी डिंपलची भेट त्यावेळचा सुपरस्टार राजेश खन्ना सोबत झाली. राजेश खन्ना डिंपल सोबत अचानक चांदण्या रात्री समुद्र किनारी घेऊन गेले आणि त्यांनी अचानक डिंपल समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. राजेश खन्ना वर आधीच मोहित झालेली डिंपल त्यावेळी फक्त 16 वर्षांची होती आणि तिला काहीच समजत नव्हते. तिला ते सर्वच स्वप्नासारखे भासत होते तिने लगेच होकार दिला.
 • राजेश खन्ना हा डिंपल पेक्षा सुमारे 15 वर्षांनी मोठा होता.
 • राजेश खन्ना आणि डिंपलच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. दोघांच्या लग्नावर एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आणि देशभरातील चित्रपटगृहां मध्ये दाखवली गेली.
 • डिंपल कपाडिया हि राजेश खन्नाची चाहती होती आणि शाळा बुडवून ती काकांचे चित्रपट बघायची.
 • असे बोलले जाते की, ‘बॉबी’ सिनेमा बनत असताना डिंपल आणि ऋषी कपूर एकमेकांकडे आकर्षित झाले होते, परंतु डिंपलने अचानक राजेश खन्ना सोबत लग्न केले.

Marathi News Live

डिंपल कपाडिया - Dimple Kapadia

 • डिंपलचा ‘बॉबी’ चित्रपट राजेश सोबत लग्ना झाल्या नंतर रिलीज झाला होता आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले होते. डिंपल रात्रीतून सुपरस्टार झाली होती, तरुण मुलं डिंपलचे दिवाने झाले होते.
 • लग्न केलेल्या डिंपलला ‘बॉबी’ इतके मोठे यश मिळवेल अशी अपेक्षा नव्हती पण तो पर्यंत तिचे लग्न झाले होते. लग्ना नंतर ती चित्रपटांमध्ये काम करणार नाही अशी अट तिच्या पती राजेश खन्नाने ठेवली होती. ‘बॉबी’ च्या यशा नंतर डिंपलला काम करायचं होतं, कदाचित ह्या कारणावरूनच दोघांमध्ये कलह होण्यास सुरु झाली असावी.

डिंपल कपाडिया - Dimple Kapadia

 • ‘बॉबी’ चित्रपटाच्या वेळी डिंपल अभिनय कसे करतात हे माहीत नव्हते, त्यावेळी राज कपूर ने तिची खूप मदत केली होती.
 • डिंपलला बॉबी चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता.
 • राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यातील मतभेद झाल्याच्या बातम्या त्या काळात चित्रपट मासिकांमध्ये मुख्य बातम्या बनत असत. एकदा डिम्पलने आपल्या दोन मुली ट्विंकल आणि रिंकी समवेत राजेशचे घर सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तेव्हा तिने केवळ राज कपूरच्या बोलण्यावर आपला निर्णय बदली केला होता.

डिंपल कपाडिया - Dimple Kapadia

 • जेव्हा पाणी डोक्यावरून गेले त्यावेळी डिंपलने राजेश खन्नाचे घर सोडले. डिंपलला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची गर्दी होऊ लागली.
 • बॉम्बीच्या 11 वर्षांनंतर डिंपलचा दुसरा चित्रपट ‘जख्मी शेर’ 1984 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये डिंपलचा नायक होता जीतेंद्र जो राजेश खन्नाचा खास मित्र होता.
 • तिने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा डिंपलने प्रथम रमेश सिप्पीच्या ‘सागर’ वर साइन केला होता.

डिंपल कपाडिया - Dimple Kapadia

 • बॉलिवूडच्या इतिहासातील डिंपलला सर्वात सुंदर नायिका मानली जाते. एका प्रसिद्ध मासिकाने तिला मधुबालानंतर बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये दुसरे स्थान दिले होते.
 • डिंपलने ‘सागर’, ‘जांबाज’, ‘जख्मी औरत’ सारख्या चित्रपटांमध्ये खूप बिंदास दृश्य दिले, जी त्यावेळी एक मोठी गोष्ट मानली जात होती.
 • ‘जांबाज’साठी अनिल कपूर सोबत तिला एक उत्तेजक सिन करायचा होता. अनिल कपूरच्या शरीरावर बरेच केस पाहून डिंपलने त्याला केस कापणाऱ्या कडे घेऊन जायला सांगितले होते. अनिल कपूरला तिचे असे बोलणे खूप लागले होते.

डिंपल कपाडिया - Dimple Kapadia

 • एका बाजूला डिंपल ‘बंटवारा’ सारख्या चित्रपटात धर्मेंद्रची नायिका होती, तर दुसरीकडे धर्मेंद्रचा मुलगा सनी देओल सोबत अर्जुन, मंजिल मंजिल सारख्या चित्रपटात त्याची नायिका होती.

डिंपल कपाडिया - Dimple Kapadia

 • विभक्त झाल्यानंतर डिंपल आणि राजेश खन्ना यांच्यातील कटुता कमी झाली. जेव्हा राजेश खन्ना यांनी लोकसभा निवडणूक लढविली, तेव्हा डिंपल यांनी राजेश खन्ना साठी प्रचार केला होता.

डिंपल कपाडिया - Dimple Kapadia

 • राजेश खन्ना यांनी ‘जय शिव शंकर’ नावाच्या चित्रपटात डिंपलची नायिका म्हणून निवड केली परंतु हा चित्रपट अपूर्णच राहिला.
 • कमर्शियल चित्रपटांमध्ये चांगले रोल न भेटल्याने डिंपलने समांतर चित्रपटात प्रवेश केला. दृष्टी, लेकिन, रुदाली यासारख्या चित्रपटात तिने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना चकित केले.

 • डिंपलला रुदालीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार (1993) मिळाला.
 • तिला बॉबी (1973), सागर (1985), रुदाली (1993) आणि क्रांतिवीर (1994) साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
 • डिंपलची जोडी सनी देओल आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत चांगलीच गाजली.

 • सनी आणि डिंपलच्या जवळीकबद्दल बरीच चर्चा झाली. या दोघांनीही कधीही त्यांचे नात जाहीरपणे स्वीकारले नाही.
 • डिंपल मेणबत्त्या डिझाईन करायची आणि तिच्या डिझाइन केलेल्या मेणबत्त्या अत्यंत महागड्या किंमतीत विकल्या गेल्या आहेत.

 • कारकीर्दीच्या शिखरावर असताना डिंपल खूपच मुडी स्वभावाची होती. यामुळे अनेक निर्माते-दिग्दर्शक नाराज झाले, त्यामध्ये फिरोज खान सारखे दिग्गज देखील होते.
 • काही चित्रपट दिग्दर्शकांचा अस मानणं आहे की डिंपलच्या कारकीर्दीत तिची सुंदरता देखील एक अडथळा होती ज्यामुळे तिला बर्‍याच भूमिकांना नकार दिला गेला.

Categories
Biography

विराट कोहली माहिती

विराट कोहली माहिती: विराट कोहली हा भारत कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. आजच्या घडीला उजव्या हाताने फलंदाजी करणारा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो.

विराट कोहली माहिती

कोहली इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर्फे खेळतो. जेव्हा पासून तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे तेव्हा पासून त्याची फलंदाजी अजून चांगली होत चालली आहे.

विराट कोहलीने दिल्लीतील विविध वयोगटासाठी आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्ली संघातर्फे खेळल्यानंतर, विराट कोहली 2008 मध्ये मलेशिया येथे झालेल्या 19 वर्षा खालील क्रिकेट वल्डकपच्या भारतीय संघाचा कर्णधार होता.

त्यानंतर ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंके विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले.

विराट कोहली माहिती

राखीव खेळाडू म्हणून सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीने थोड्याच दिवसात भारतीय संघात मधल्या फळीत एक महत्वाचे स्थान मिळवले. 2011 च्या क्रिकेट वल्डकपसाठीच्या भारतीय संघात महत्वपूर्ण स्थान मिळवले होते, त्याच संघाने विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता.

विराटने 2011 साली वेस्ट इंडिज विरुद्ध किंगस्टन मध्ये खेळताना कसोटी संघात पदार्पण केले. लवकरच त्याने कसोटी मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध शतक ठोकले त्यामुळे त्यांच्या वर तो फक्त “एकदिवसीय विशेषज्ञ” आहे असा शिक्का पुसला गेला.

बघता बघता त्याने आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकवर स्थान मिळवले. 20 साली झालेल्या T-20 क्रिकेट वल्डकपमध्ये मालिकावीर होण्याचा मान मिळवला होता आणि T-20 क्रिकेट मध्ये हि त्याचे वर्चस्व सिद्ध केले.

पुढे आयसीसी T-20 क्रिकेट क्रमावीत अव्व्ल स्थान मिळवले. 2016 सालच्या T-20 क्रिकेट वल्डकपमध्ये विराटच्या कामगिरीमुळे पुन्हा मालिकावीर हा पुरस्कार दिला गेला.

विराट कोहली

कोहलीची 2012 मध्ये उपकर्णधार म्हणून भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघा मध्ये नियुक्ती केली गेली.

विराट ने अनेकदा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणून जबाबदारी पार पडली त्यामुळे 2014 साली महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर विराट कोहलीची भारतीय क्रिकेट संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली.

विराट कोहली

विराटच्या नावावर एकदिवसीय क्रिकेट मध्ये बऱ्याच विक्रमांची नोंद झाली आहे. सर्वात जलद शतक, सर्वात जलद 5000 धावा आणि सर्वात जलद 10 शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.

सलग चार कॅलेंडर वर्षांमध्ये दरवर्षी किमान 1000 धावा करणारा विराट जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.

विराट कोहली

आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये 2015 साली सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज झाला.

विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराटने धावांचा पाऊस पाडतो म्हणून त्याला क्रिकेट विशेषज्ञ ”विराट द रन मशीन” म्हणून बोलतात.

विराट कोहली

विराट कोहलीने आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. 2012 सालच्या आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तसेच बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा 2011-12 आणि 2014-15 चा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.

भारतीय क्रिकेट मधल्या त्याच्या कामगिरीसाठी भारत सरकारने अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे. विराट कोहलीने बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत 11 डिसेंबर 2017 ला विवाह केला.

विराट कोहली चे बालपण

विराट कोहली

प्रेम कोहली आणि सरोज कोहली ह्यांच्या घरी 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्लीतील उत्तम नगर येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात विराट चा जन्म झाला. विराटचे वडील व्यवसायाने एक वकील होते तर आई गृहिणी होत्या.

विराटला विकास नावाचा मोठा भाऊ तर भावना नावाची मोठी बहीण देखील आहे. विराटचे कुटुंब असे सांगते कि, विराट हा 3 वर्षाचा असल्यापासून आपल्या वडिलांसोबत क्रिकेट खेळायचा, तो बॅट उचलून फिरायचा आणि वडिलांना गोलंदाजी करायला लावायचा.

विराट कोहली

2006 सालच्या 18 डिसेंबरला विराटच्या वडिलांचे निधन झाले, त्यापूर्वी ते मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यात होते.

आपल्या पूर्वायुष्यातील गोष्टींबद्दल बोलताना सांगतो की, “आयुष्यात खूप काही पाहिलं आहे, वडिलांचे निधन लवकर झाले आणि कौटुंबिक व्यापार चांगला चालत नव्हता, शिवाय भाड्याच्या घरात राहत होतो, कुटुंबासाठी कठीण वेळ आली होती हे सर्वच मनामध्ये घर करून राहील आहे.”

त्याच्या लहानपणी वडिलांकडून क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा मिळाला, ते खूप मोठे आधार होते, ते नेहमी सोबत सरावासाठी घेऊन जात, अजून देखील त्यांच्या सहवासाची आठवण येते.

विराट कोहलीचे शिक्षण 

उत्तम नगर मध्येच विराट मोठा झाला आहे, त्याचे शालेय शिक्षण विशाल भरती पब्लिक स्कूलमध्ये झाले. पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची 1998 साली स्थापना झाली आणि त्यावेळी विराट 9 वर्षाचा होता. विराट अकादमीच्या पहिल्या तुकडीचा सदस्य होता.

गल्ली क्रिकेटमध्ये विराटचा वेळ वाया न घालवता त्याला एका व्यावसायिक कल्वमध्ये टाकवे, असे शेजारच्या काही मंडळींनी विराटच्या वडिलांना सुचवले.

शेजाऱ्यांचा सल्ला ऐकून विराटला अकादमीमध्ये टाकले गेले, त्यावेळी राजकुमार शर्मा यांच्याकडून विराटने क्रिकेटचे धडे घेतले, त्यांनीच विराट ला चिकू हे टोपण नाव दिले होते.

विराट कोहली

सुमित डोग्रा ह्या नोयडा जवळच्या अकादमी मधून देखील त्याने सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या सरावासाठी मदत मिळावी म्हणून विराट नववीमध्ये असताना त्याने दिल्लीच्या पश्चिम विहार मधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला होता.

विराट खेळ सोबतच अभ्यासातही हुशार होता, त्याचे शिक्षक त्याला “तेजस्वी आणि हुशार” समजत असत.

विराट कोहलीची कारकीर्द

विराटने देशांतर्गत क्रिकेट मध्ये बरीच चांगली कामगिरी केली आहे. त्याने देशांतर्गत विविध स्पर्धाना मध्ये उत्तम कामगिरी केली त्याच्या मुळेच तो 2002 साली अंडर 15 क्रिकेट स्पर्धेत तो खेळला आहे, पुढे 2006 साली त्याची अंडर 17 संघात निवड झाली.

विराट कोहली

दिवसंदिवस विराटची कामगिरी चांगली होत होती, लवकरच विराटची निवड 2008 सालच्या अंडर 19 संघात झाली, अंडर 18 वल्डकप स्पर्धा मलेशिया मध्ये झाली त्यामध्ये विराटने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

त्याच्या खेळामुळे त्याला भारतीय एकदिवसीय आंतरराष्टीय संघात स्थान मिळवून दिले.

विराट कोहली

2011 सालच्या वल्डकपसाठी विराटची निवड करण्यात आली. वल्डकपच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट ने शतक बनवले होते, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय असा मान त्याला भेटला.

भारताने त्यावर्षी तो वल्डकप जिंकला होता. 2011 मधल्या होणाऱ्या कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आले होते. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिली कसोटी खेळली होती.

विराट कोहली

विराट कोहलीने 2014 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना 4 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतक ठोकले होते, त्यांच्या मदतीने त्या मालिकेमध्ये 692 धावा केल्या होत्या.

ह्या मालिकेमध्येच महेंद्रसिंग धोनीने आपली आंतरराष्टीय कसोटी मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती, त्याचा नंतर कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराटची निवड करण्यात आली.

विराट कोहली

पुढे 2017 उजाडताच महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय आणि T-20 मधील कर्णधार पदाचा राजीनामा दिला असल्याने विराटची त्याच्या जागी कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.

जेव्हा पासून त्याला कर्णधार केले आहे तेव्हा पासून त्याच्या खेळामध्ये अजून सुधारणा केल्याचे दिसून येते, शिवाय पूर्वी पेक्षा जास्त जबाबदारीने तो सामना खेळतो आणि संघाला जिंकण्यासाठी जीवपणाला लावतो.

विराट कोहली ने आता पर्यंत 86 कसोटी सामन्यांमध्ये 7240 धाव केल्या आहेत, त्यामध्ये 27 शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे, नाबाद 254 हि त्याची कसोटी मधील सर्वोच धावा आहे.

तसेच 248 एकदिवसीय सामने खेळला आहे, त्यामध्ये 11867 धाव, 43 शतक आणि 58 अर्धशतक केले आहेत, 183 सर्वोच धाव केल्या आहेत.

याशिवाय T-20 सामानाची विराटची कारकीर्द पाहिली तर त्याने 82 सामन्यांमध्ये 2794 धाव केल्या आहेत, त्यामध्ये 24 अर्धशतक केले आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 177 सामने खेळत त्याने 5412 धावा केल्या आहेत, 5 शतक, 36 अर्धशतक केले आहेत.

विराट कोहलीच्या खेळाची शैली

खेळाच्या शैली बद्दल बोलायचं झाले तर तो नैसर्गिकरित्या मजबूत तांत्रिक कौशल्याचा एक आक्रमक फलंदाज आहे.

विराट बहुतेक वेळा मधल्या फळीमध्ये फलंदाजी करतो, तर कधी कधी डावाची सुरुवात देखील करतो. संघाची जशी गरज आहे त्याप्रमाणे तो स्वतःचा फलंदाजी क्रम बदलत असतो.

तो फलंदाजी करताना छाती पुढे काढलेल्या पावित्र्यात आणि आपल्या खालच्या हाताची पकड मजबूत करून फलंदाजी करतो, शिवाय त्याच्या पायाची हालचालसुद्धा खूप चपळपणे करतो.

फलंदाजी करताना त्याची फटक्यांची विविधता उत्तम असते, जशी गरज आहे त्याप्रमाणे तो धावांची गती वाढवू शकतो. दबावाखाली फलंदाजी करताना तो सर्वोत्तम खेळाडू आहे.

मिड विकेट आणि कव्हर क्षेत्रात त्याचे उत्तम सामर्थ्य आहे, कव्हर ड्राइव्ह हा त्याचा आवडता फटका आहे, त्याला फिल्कचा फटका नैसर्गिकरित्या येतो.

फलंदाजी शिवाय तो क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम करतो. त्याचा आत्मविश्वास, बांधिलकी, एकाग्रता आणि नीतितत्त्वे ह्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतात.

विराट कोहलीच्या शैलीमुळे त्याची तुलना सचिन तेंडुलकर सोबत केली जाते, अनके माजी क्रिकेटपटूंना अशी अपेक्षा आहे कि विराट सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडू शकतो.

विराट कोहली मैदानात खूप आक्रमक असा वाटतो, अनेक प्रसार माध्यमांनी तर त्याला उतावीळ आणि उद्दाम देखील बोलले आहे. तो अनेकदा प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत, पंचाशी वाद करताना दिसतो.

त्यामुळे त्याला टीका सुद्धा सहन कराव्या लागतात. तर काही माजी खेळाडू त्याच्या ह्या आक्रमकतेचा चाहते आहेत ते त्याला पाठिंबा देतात.

विराट कोहली नमूद करतो कि, तो त्याच्या आक्रमकतेला आवर घालण्याचा प्रयत्न करतो आहे, पण खेळातील ताण आणि काही प्रसंगी त्या भावनांना आवर घालणे अवघड जाते. विराट सांगतो कि तो कपिल शर्मा शो चा चाहता आहे, त्याला तो शो खूप आवडतो.

विराट कोहली ने केलेले विक्रम व कामगिरी

 1. भारतीय फलंदाजांमधील सर्वात जलद शतक (52 चेंडूंत)
 2. सर्वात जलद 1000, 4000, 5000, 6000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय
 3. 7000 सर्वात जलद एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज
 4. सर्वात जलद 10 एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज
 5. 15 व 20 सर्वात जलद एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज
 6. सर्वात जलद 25 एकदिवसीय शतके करणारा फलंदाज.
 7. सर्वात जलद 1000 आंतरराष्ट्रीय T-20 धावा पूर्ण करणारा फलंदाज

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा

 1. 2010 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय
 2. 2011 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा.
 3. 2012, 2013, 2014 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.
 4. 2012, 2015, 2016 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.
 5. एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (973)
विराट कोहलीची कर्णधार म्हणून विक्रम
 1. एक कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके ठोकणारा पहिला क्रिकेटपटू.
 2. परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार.
 3. दोन किंवा अधिक द्विशतके करणारा पहिला भारतीय कसोटी कर्णधार.
 4. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा कर्णधार.
 5. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार

विराट कोहलीला मिळालेले पुरस्कार

विराट कोहलीने त्याच्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीत खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळेच तो आज ह्या शिखरावर पोहचला आहे. क्रिकेट मधील त्याचा योगदानासाठी त्याला अनेक पुरस्कार देण्यात आहे आहे.

 • 2012 साली पिपल चॉइस अवॉर्ड फॉर फेवरेट क्रिकेटर
 • 2012 साली आईसीसी ओडीआई प्लेयर ऑफ द ईयर अवॉर्ड

 • 2013 साली भारत सरकार तर्फे अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट
 • 2013 मध्ये सीमा सुरक्षा दलाने ब्रॅण्ड अँबेसेडर म्हणून घोषित केले

 • 2017 साली सीएनएन- आईबीएन इंडियन ऑफ द ईयर
 • 2017 साली भारत सरकार तर्फे पद्मश्री अवॉर्ड

 • 2018 साली सर गर्फीएल्ड सोबर्स ट्रॉफी ने विराट कोहली ला सन्मानित करण्यात आलं.

वैयक्तिक आयुष्य

तसे तर विराटचे नाव अनेक अभिनेत्रीनं सोबत घेतले गेले, एकदा तर इंग्लंड महिला क्रिकेट संघाची एक खेळाडू हिने विराट ला ट्विटरद्वारे प्रपोझ केले होते.

परंतु बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत त्याची मैत्री आणि प्रेम खूप जास्त होते असे बोलावे लागेल. ती सुद्धा त्याला भेटायला, त्याचे सामने बघायला परदेशात देखील जात होती. प्रसारमाध्यमांनी तर खूप प्रसिद्धी दिली होती त्यांचा नात्याला.

विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये इटली मध्ये धुमधडाक्यामध्ये काही मोजक्याच पाहुण्यांच्या साक्षीने लग्न सोहळा पार पडला. एक आदर्श पतिपत्नी म्हणून सुखाचा संसार करत आहेत.

दोघेही आप आपल्या कार्यक्षेत्रांत यश मिळवत आहे. प्रसारमाध्यम त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा चाहत्यांपर्यंत पोहचवत आहेत.

व्यावसायिक गुंतवणूक

विराटच्या बोलण्यानुसार फुटबॉल हा त्याचा क्रिकेट नंतर आवडता खेळ आहे. विराट २०१४ साली इंडियन सुपर लीगच्या क्लब एफसी गोवाचा सह-मालक झाला.

त्याला स्वतःला फुटबॉल मध्ये उत्सुकता आहे आणि त्याच असं मत आहे कि भारतामध्ये हा खेळ वाढीस लागावा त्यासाठी त्याने हि गुंतवणूक केली आहे.

शिवाय तो भविष्यातील एक व्यावसायिक उपक्रम म्हणून पाहतो, क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर काय करायचे ह्या दृष्टीने तो पर्याय खुले ठेवतोय.

WROGN नावाच्या फॅशन ब्रँड मध्ये गुंतवणूक केली आहे, ते पुरुषांचे कॅज्युअल कपडे बनवतात. याशिवाय मायंत्रा, शॉपर्स स्टॉप यांच्याशी देखील हातमिळवणी केली आहे.

विराटने देशभरात व्यायामशाळा आणि स्वस्थ केंद्राची साखळी सुरु करण्यासाठी गुंतवणूक केली आहे,

विराट कोहली फाउंडेशन

विराटने मार्च 2013 मध्ये “विराट कोहली फाउंडेशन ” नावाने एक गरिबांना मदत करणारी संस्था चालू केली, जी वंचित मुलांना मदत करते तसेच त्यासाठी पैसे गोळा करणे.

विराटच्या मध्ये त्याची संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत काम करते. त्याचं मुख्य हेतू मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे हा आहे. जमा झालेल्या निधीतून गरजू मुलांचे शिक्षण आणि आरोग्य ह्यासाठी सेवा केली जाते.

Categories
Biography

सचिन तेंडुलकर माहिती

सचिन तेंडुलकर कोण आहे?

सचिन तेंडुलकर माहिती (Sachin Tendulkar Mahiti) आपण जाणूनच घेणार आहोत कारण भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर हा देव आहे.

आपण एक जप ऐकला असेल, तुम्हाला कदाचित क्रिकेट खेळ विषयी जास्त माहित नसेल तरी तुम्ही देखील कधी तरी हा जप नाही ऐकला असेल. वानखेडे मधून उगम होऊन तो सात समुद्रपार देखील ऐकला गेला आहे.

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

तो जप आहे “सचिन! सचिन!”. हो तुम्हाला विचित्र वाटेल कदाचित पण जेव्हा सचिन मैदानात फलंदाजी करायला असायचा तेव्हा हा जप त्याचे चाहते करत असायचे आणि त्याला प्रोत्साहन देत असत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असे नाव आहे जे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेकांना प्रेरणा देत आहे.

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

भारतीय क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर नावाने खूप दबदबा निर्माण झाला होता, ज्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली बनवले.

भारतीय संघ एका बाजूला आणि एकटा सचिन एका बाजूला अशी परिस्थिती असायची, त्याने एकट्याचं जीवावर किती तरी विजय मिळवून दिले आहेत. तो जर बाद झाला तर आपण हारलो असेच सर्व समजून टीव्ही बंद करायचे.

सचिन तेंडुलकर शिवाय भारतीय संघ कसा असतो हे माहित नसताना एक संपूर्ण पिढी मोठी झाली.

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा, दोन फॉर्मेटमधील सर्वाधिक शतके आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके यासह आकडेवारीने पछाडलेल्या खेळात त्याच्याकडे जवळपास प्रत्येक फलंदाजीचा विक्रम आहे.

100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा एकमेव फलंदाज, 200 कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू, एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा पहिला, 30,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा एकमेव फलंदाज.

कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मध्ये सर्वात जास्त धावा आणि शतके करणारा फलंदाज आहे.

गोलंदाजांनी टाकलेल्या चेंडूला आपल्या बॅट ने उत्तर देणे त्याला उत्तम येत होते, प्रत्येक चेंडू तो मैदानात त्याला पाहिजे त्याठिकाणी तो मारू शकत होता.

तो फलंदाजी करायला आला कि सर्व प्रेक्षक त्याची फलंदाजी बघण्यात आपले काम विसरून जात असत. सचिन वर कधी कोणी टीका केली तर तो त्यांना आपल्या उत्तम फलंदाजी मधून सडेतोड उत्तर देत असे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

त्याचे संपूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहे. सचिन चा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईच्या दादर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तो सुप्रसिद्ध सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील आहेत.

त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठी कवी आणि कादंबरीकार होते. त्याच्या आईचे नाव रजनी होते, त्याची आई विमा उद्योगात काम करणारी होती.

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

सचिनला त्याचा मोठा भाऊ अजित कडून खूप प्रोत्साहन आणि साहाय्य मिळाले. सचिन देखील हे कित्येकदा बोलून दाखवतो कि त्यांच्या क्रिकेट जीवनात त्यांच्या भावाचे पण खूप योगदान आहे.

तो लहान असताना त्याच्या काका काकू कडे राहायचा कारण त्याला क्रिकेटचं मैदान जवळ पडावे म्हणून. त्याच्या काका काकूंनी देखील त्याच्यावर आई वडिलांसारखे प्रेम केले.

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा तो पहिल्या आंतरराष्ट्रीय दौर्‍यावरून परतत होता तेव्हा तो आपली जीवनसाथी अंजलीला भेटला. बघताच क्षणी दोघांना प्रेम झाले, त्याची ओळख एका मैत्रिणीने अंजलीशी केली आणि तिला क्रिकेट या खेळा विषयी काहीच माहिती नव्हते.

पाच वर्ष डेटिंग करुन सचिन आणि अंजलीने 1995 मध्ये एकमेकांशी लग्न केले. अंजली एक बाल-चिकित्सक आहे त्यांना सारा नावाची मोठी मुलगी आहे तर अर्जुन नावाचा मुलगा आहे.

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

सचिनकडे पहिले कि खूप कौतिक वाटते आणि अभिमान वाटतो. तो एक उत्तम फलंदाज असण्याच्या सोबतच तो उत्तम मुलगा, भाऊ, पती, आणि आता वडील देखील आहे.

त्याच सचिन आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच आपली सामाजिक बांधीलकीपण जपत असतो. वेळोवेळी तो सामाजिक कामे करत असतो.

सुरुवातीचे दिवस 

Sachin Tendulkar

सचिनचे पहिले क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर हे आहेत. सचिन शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत असतानाच क्रिकेटचे धडे गिरवायला क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्या कडून सुरुवात केली.

सचिनने शाळेत असताना बालमित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळी सोबत हॅरीस शील्ड सामन्यात 664 धावांची अजस्र भागीदारी रचली होती. आपण वाचत आहात सचिन तेंडुलकर माहिती.

1988-89 साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये 100 धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय 15 वर्षे 232 दिवस होते, आणि पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1989 साली पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान मध्ये कराची येथे खेळला. वकार युनूस चा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामध्ये सचिनला त्याने 15 धावांवर त्रिफळाचीत केले होते.

सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली होती.

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

आपल्या पहिल्याच सामन्यात वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा त्याला सामना करावा लागला. सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून वकार युनूस सोबत बदला घेतला होता.

पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सचिनची सुरुवातही खराब झाली. डिसेंबर 18 ला झालेल्या आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच परत एकदा वकार युनूसने त्याला बाद केले.

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

सचिनने आपले पहिले कसोटी शतक 1990 सालच्या इंग्लंडच्या दौर्‍यात झळकवले. परंतु 1991-92 सालच्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यात सचिन तेंडुलकरला आपला खरा सूर गवसला होता. त्यावेळी त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली.

2 वेळा सचिन बॉर्डर-गावसकर चषकामध्ये मालिकावीर राहिला आहे, तसेच आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये 11 वेळा सामनावीर होण्याचा बहुमान मिळाला आहे. सचिन तेंडुलकर माहिती वाचताना तुम्हाला आनंद येत असेलच.

थोडक्यात परिचय: सचिन तेंडुलकर माहिती

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

 1. पूर्ण नाव: सचिन रमेश तेंडुलकर
 2. जन्म: 24 एप्रिल, 1973
 3. जन्मस्थानः बॉम्बे (आताचे मुंबई), महाराष्ट्र
 4. टोपणनाव: क्रिकेटचा देव, लिटल मास्टर, मास्टर ब्लास्टर
 5. राष्ट्रीयत्व: भारतीय
 6. वडिलांचे नाव: कै. रमेश तेंडुलकर
 7. आईचे नाव: रजनी तेंडुलकर
 8. भाऊ: नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर
 9. बहिण: सविता तेंडुलकर
 10. जोडीदार नाव: अंजली तेंडुलकर
 11. लग्नाची तारीख: 24 मे, 1995
 12. मुले: सारा आणि अर्जुन तेंडुलकर
 13. भूमिका: फलंदाज
 14. फलंदाजी: उजवा हात
 15. गोलंदाजी: उजवा हात मध्यम, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक
 16. वनडे पदार्पण: 18 डिसेंबर, 1989 विरुद्ध पाकिस्तान
 17. कसोटी पदार्पण: 15 नोव्हेंबर, 1989 विरुद्ध पाकिस्तान
 18. आवडता खाद्यपदार्थ: बॉम्बे डक, कोळंबी करी, क्रॅब मसाला, कीमा पराठा, लस्सी, चिंगरी कोळंबी, मटण बिर्याणी, मटन करी, बायगन भारता इत्यादी
 19. आवडता अभिनेता: अमिताभ बच्चन, आमिर खान, नाना पाटेकर
 20. आवडती अभिनेत्री: माधुरी दीक्षित
 21. आवडता रंग: निळा

सचिन तेंडुलकरची काही मनोरंजक तथ्य 

 1. सचिनचे वडील प्रसिद्ध संगीतकार एस.डी. बर्मन खूप मोठे चाहते होते. एस.डी. बर्मन चे पूर्ण नाव सचिन देव बर्मन असे होते, त्यामुळेच त्यांनी आपल्या लाडक्या मुलाचे नाव त्यांच्या नावावरून “सचिन” असे ठेवले.
 2. रणजी सामना खेळणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर चे नाव घेतले जाते, वयाच्या 14 व्या वर्षी सचिनने रणजी सामने खेळायला सुरुवात केली.
 3. खरं तर सचिनला फलंदाज बनण्यात काहीरस नव्हता, त्याला वेगवान गोलंदाज बनायचे होते, पण त्याचे ते स्वप्न भंगले त्याचे झाले असे कि, 1987 साली चेन्नईच्या MRF Pace Academy मध्ये प्रसिद्ध ओस्ट्रेलियन गोलंदाज डेनिस लिली ह्यांनी सचिनला वेगवान गोलंदाज म्हणून रिजेक्ट केले.
 4. सचिन हा खरा डावखुरा व्यक्ती आहे, तो क्रिकेट मध्ये उजव्या हाताने बॅटिंग आणि बॉलिंग करतो, पण लिखाण आणि इतर कामे मात्र डाव्या हाताने करतो.
 5. एक आगळावेगळा विक्रम सचिनच्या नावावर आहे. तो असा एकमात्र खेळाडू आहे ज्याला संघ हरलेला असताना देखील सहा वेळा Man-of-the-Match पुरस्कार मिळालेला आहे.
 6. त्याच्या वयाची 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत सचिनने कसोटी कारकिर्दीमध्ये 5 शतके ठोकली होती. क्रिकेट विश्वात हा देखील जागतिक विक्रम आहे.
 7. वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये 2000 रन्सचा टप्पा पार करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे. वर्ल्डकप क्रिकेटच्या 45 सामान्यांमध्ये 2278 रन्स केलेल्या आहेत.
 8. 1996 च्या वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक 523 रन्स केले होते आणि 2003 च्या वर्ल्डकप मध्ये त्याने सर्वाधिक 673 रन्स. त्याच्या नावावर दोन वर्ल्डकप टूर्नामेंट्समध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून विक्रम आहे.
 9. अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध 19 विकेट्स पटकावत विक्रम घडवला होता तो सामना तुम्हाला आठवतो का? फिरोजशहा कोटलावर पाकिस्तान विरुद्ध जो सामना सुरु होता तेव्हा ओव्हर सुरु होण्यापूर्वी कुंबळेचे स्वेटर आणि कॅप काढून अम्पायरकडे सचिनने सोपवले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी अनिल कुंबळेने विकेट्स घेतल्या आहेत.
 10. सचिनला पुरस्कार म्हणून मिळालेली पहिली शॅम्पेन त्याने आपल्या मुलीच्या पहिल्या बर्थडेच्या वेळी उघडली आणि सेलिब्रेशन केले. झाले असे कि, सचिनला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या सेंच्युरीसाठी Man-of-the-Match पुरस्कार 1990 साली मिळाला, तेव्हा त्याला सेलिब्रेशन करण्यासाठी शॅम्पेनची बॉटल देण्यात आली होती, परंतु तेव्हा त्यावेळी त्याचे वय 18 पेक्षा कमी होते म्हणजे कायद्याप्रमाणे तो मद्याचा वापर करू शकत नव्हता.

कसोटीतील कारकिर्दीतील ठळक कामगिरी

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

 1. सचिनला विस्डेनतर्फे दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान आहे. प्रथम क्रमांकावर डॉन ब्रॅडमन आहेत.
 2. सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिनच्या आधी सुनील गावसकर यांनी 34 शतके केल्याचा विक्रम होता, त्यांचा हा विक्रम सचिनने दिल्लीमध्ये 2005 साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना 35 वे शतक करून मोडला.
 3. आतापर्यंत सचिन 52 मैदानांवर कसोटी सामने खेळून विक्रम केला आहे. मोहम्मद अझहरुद्दीन 48 आणि कपिल देव 47 या भारतीय खेळाडूंचा नंबर लागतो तर, इंजमाम उल-हक 46 आणि वसिम अक्रम 45 ह्या पाकिस्तानी खेळाडूंचा मैदानांवर क्रिकेट खेळले आहेत.
 4. सर्वात जलद 10000 कसोटी धाव करणायचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा ह्या दोघांमध्ये समान आहे, कारण दोघांनीही 195 डावांमध्ये त्या धाव केल्या आहेत.
 5. सर्वाधिक एकूण कसोटी धावा करण्यात सचिनचा पहिला क्रमांक आहे.
 6. सचिन ची सर्वोच्च फलंदाजीची सरासरी: 53.79. ही आहे.
 7. 10000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा सचिन हा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
 8. सचिनच्या नावावर 37 कसोटी बळी आहेत.
 9. जलद 9000 धावा करणारा फलंदाज म्हणून सचिन दुसर्‍या क्रमांकाचा आहे. ब्रायन लाराने 177 डावांमध्ये ती कामगिरी केली आहे.
 10. सचिनची कसोटी कारकीर्द 24 वर्षे आणि 1 दिवसांची आहे.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी (सचिन तेंडुलकर माहिती)

 1. सचिनच्या नावावर सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम आहे
 2. सर्वात जास्त (50) वेळा सामनावीर म्हणून मान मिळण्याचा विक्रम
 3. सर्वात जास्त (89 वेगवेगळ्या) मैदानांवर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला आहे
 4. 18008 धावा बनवले आहे, ह्या सर्वात जास्त धावा आहे एका खेळाडूच्या.
 5. सर्वात जास्त  शतके (49)
 6. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे विरुद्ध सर्वात जास्त शतक केले आहेत.
 7. 10000, 11000, 12000, 13000 आणि 14000, 15000, 16000, 17000, 18000 धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज.
 8. सचिन असा एकमेव फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 14000 धावांचा टप्पा पार केला
 9. एकमेव असा फलंदाज ज्याने 100 डांवांमध्ये 50 अथवा अधिक धावा केल्या
 10. गोलंदाजीत 100 हून अधिक बळी
 11. 10000 पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वात जास्त फलंदाजीची सरासरी
 12. एका वर्षात 1000 अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वात जास्त वेळा करण्याचा विक्रम. आत्तापर्यंत सहा वेळा हि कामगिरी केली
 13. 1998 साली त्याने 1894 एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम अबाधित आहे.
 14. 1998 साली त्याने 9 एकदिवसीय शतके झळकवली. हा विक्रम अबाधित आहे.
 15. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच 200 धावा फटकावण्याचा विक्रम, फेब्रुवारी 2010 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये हि कामगिरी केली.

विश्वचषका मधील विक्रम

 1. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावा (59.72 च्या सरासरीने 1732 धावा).
 2. 2003 सालच्या विश्वचषकासाठी मालिकावीर म्हणून निवडण्यात आहे.
 3. 2003 सालच्या विश्वचषकामध्ये त्याने 673 धावा केल्या. ह्या कोणीही कोणत्याही एका विश्वचषकामध्ये केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत.

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar

सचिन ने 23 डिसेंबर 2012 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

सचिनच्या नावातील इतर विक्रम

 1. तिसर्‍या पंचाकडून धावचीत दिला गेलेला पहिला फलंदाज आहे.
 2. यॉर्कशायर क्रिकेट काउंटी क्लबमध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे.
 3. सर्वोच्च 100 फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद केलेली नाही, हे विशेष.

सचिन ने केले काही विक्रम मोडता न येणारे आहेत.

सचिनला मिळालेले विशेष पुरस्कार 

भारत सरकार ने सचिनला पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सचिनच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशीच भारत सरकारतर्फे भारतरत्न ह्या सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली आणि पुढे तो सन्मान देण्यात आला.

Sachin Tendulkar

त्याशिवाय त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा भारतीय विमान दलाने प्रदान केलेला आहे, असा मान मिळालेला सचिन पहिला खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेली पहिले व्यक्ती आहे.

Sachin Tendulkar

म्हैसूर विद्यापीठाने आणि राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव 6 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईत प्रदान करण्यात आला.

तसेच सचिन तेंडुलकरची भारत सरकार तर्फे राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्ती केली गेली होती. सचिन तेंडुलकर माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करण्यास विसरू नका.

Marathi News Live

सचिन तेंडुलकर - Sachin Tendulkar