Chhota Bheem – छोटा भीम हे कार्टून प्रयेक लहान मुलाला तर माहित आहेच, पण त्याच बरोबर घरातील मोठ्यांना देखील माहीत आहे. छोटा भीम सर्वांच्याच आवडीचा आहे.
सध्या कार्टूनच्या जगतात दोन पात्र सोशल मीडिया मध्ये खूप चर्चेत आहेत. ट्विटर पर तर हे पात्र टॉप ट्रेंडिंग मध्ये आहेत. ह्या पात्रांशी जोडून काही हैशटैग ट्रेण्ड मध्ये आल्याने काही लोक हैराण झाले आहेत.
ह्या हैशटैग सोबत जवळ जवळ 10 हजार ट्विट्स केले गेले आहेत. ह्या ट्विट्सच्या माध्यमातून कार्टून पात्र छुटकी हिला न्याय भेटला पाहिजे ह्यासाठी आवाज उठवला जात आहे.
काय प्रकरण आहे
या मालिकेत छोटा भीम ढोलकपूरच्या राजकुमारी इंदुमतीशी लग्न करीत आहे. छोटा भीम सोबत राहणारी छुटकी हिच्या सोबत होत नाही, हि गोष्ट प्रेक्षकांना आवडत नाही आहे. ह्या गोष्टीवर नाराज होऊन सोशल मीडिया वर युजर्स मिम्स आणि ट्विट पोस्ट करत आहेत.
किती जुना आहे छोटा भीम
छोटा भीम हा 2008 साली पोगो वाहिनीवर सुरू झालेला अॅनिमेटेड शो आहे. या शोमधील संपूर्ण कथा ढोलकपूरमध्ये राहणाऱ्या मुलाच्या भोवती फिरली आहे, त्याचे नाव छोटा भीम आहे. आज इतक्या वर्षांनी देखील त्याची लोक प्रियता काही कमी झाली नाही आहे.
छुटकी ही छोटा भीमची सर्वात जवळची मित्र आहे. शोमध्ये छोटा भीमचा सर्वात चांगला मित्र म्हणून छुटकीचे वर्णन केले गेले आहे. पण अचानक शोच्या शेवटी भीमने ढोलकपूरची राजकन्या इंदुमतीशी लग्न केले. लोकांना ही गोष्ट आवडत नाही आहे, ह्या गोष्टी विरोधात मेसेज करत आहे.
लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे
हा शो दूरदर्शनवर पुन्हा दर्शविला जात आहे. सर्वांना ठाऊक आहे की दूरदर्शनवरील लॉकडाऊन दरम्यान पुन्हा अनेक कार्यक्रमांचे प्रसारण होत आहे. रामायण, महाभारत आणि शक्तीमानानंतर छोटा भीम दूरदर्शनवरही प्रसारित होत आहे.
छोटा भीमचे आवडते पात्र
छुटकी व्यतिरिक्त राजू, जग्गु, राजकुमारी इंदुमती, कालिया, ढोलू आणि भोलू ही या शोची महत्त्वाची पात्रं आहेत. ज्यांच्याभोवती संपूर्ण शोची कहाणी चालू राहते.
शत्रूंना धूळ चाटायला लावतो
छोटा भीम मुलांसाठी एक सुपर हीरो आहे, जो नेहमीच मोठी कामगिरी करतो. त्याने त्यांच्या एका ‘स्पेशल पंच’ च्या सहाय्याने धूळ चारली आहे, छोटा भीम कोणालाही घाबरत नाही.