विद्येचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शहराला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. यामुळे या शहराची प्रतिमा मल्लीन होऊ लागली. सदर बाब लक्षात घेऊन गृह विभागाने आयपीएस अमिताभ गुप्ता यांची आयुक्त पदी नियुक्ती केली. या पदावर विराजमान होताच त्यांनी शहराची प्रतिमा अधिकाधिक उंचावण्यासाठी विशेष मोहीम राबवली अन् विद्येचे माहेर गुन्हेगारीमुक्त ठेवण्याचा विडा उचलला. आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर अनेक कारवाई घडून आल्या.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाळाया व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाळाया गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदशनाखाली आतापर्यंत ५३ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र सर्वच कारवाया या लेखात मांडता येणार नाही. मात्र त्यापैकी सर्वोत्कृष्ट कारवाईचा मागोवा घेतला आहे.
शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सार्थक मिसाळ गंगच्या म्होरक्यासह आठ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत ५३ टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख सार्थक संगित मिसाळ (वय २०, रा. मानाजी नगर, नळाहेगाव, पुणे), अजय उर्फ शुभम रविंद्र हिरे (वय २३, रा. जांभळे हाईट्स, आंबेगाव खुर्द) यांना २३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे, तर तुकाराम रामचंद्र येनपुरे ऊर्फ वस्ताद (वय ५२, रा. लिपाणे वस्ते, आंबेगाव खुर्द), तुषार प्रकाश डोंबे (वय २१, रा. जांभळवाडी रोड, पुणे), लकी ऊर्फ लखन अरुण गायकवाड (वय १९, रा. जैन मैदिर, कात्रज), तेजस ऊर्फ बंटी तुकाराम येनपुरे (वय २०, रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव खुर्द), आदित्य उर्फ बबलु जगमोहन सिंन्हा (वय १९, रा. दत्तनगर, आंबेगाव खुर्द), कल्पेश अनिल चव्हाण (वय ३२, रा. दत्तनगर आंबेगाव खुर्द) यांना २४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सार्थक मिसाळ टोळीवर २०२० सालापासून संघटीतपणे गंभीर स्वरूपाचे शिरिराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या टोळीची परिसरात दहशत रहावी यासाठी जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे असे कृत्ये सातत्याने सुरु ठेवली होती. या टोळतील अनेकांवर हद्दपार व स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वतर्नात सुधारणा होत नव्हती. २२ ऑगस्ट रोजी या टोळीने जुन्या भांडणाच्या रागातून आकाश पवार (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक) याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यामार्फत तो अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे याच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे दिली.