‘लोकशाही’ने सन्मानित झालेले आयपीएस डॉ. अभिनव देशमुख!

प्रत्येक यशस्वी मनुष्याच्या जीवनात शिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणामुळे अनेकांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवले आहे. कोणी डॉक्टर झाले तर कोणी वकील तर कोणी पोलीस खात्यात कर्तव्यादक्ष कामामुळे जनमानसात खाकीची प्रतिमा उंचावली. अशीच शिक्षणाची अभिरूची अंगी असल्यामुळे पोलीस खात्याला आयपीएस डॉ. अभिनव देशमुख यांच्या रूपात कर्तव्य दक्ष अधिकारी लाभला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेला डॉक्टर पोलीस खात्याला लाभला आहे. आयपीएस डॉ. अभिनव देशमुख (Ips Abhinav Deshmukh) यांच्या विद्यार्थी दशेतल्या आजवरच्या एकूणच प्रवासामुळे त्यांना आयपीएस होता आले. त्यांचा एकूणच अनुभव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर वडील नोकरी करत असल्याने परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर आदी ठिकाणच्या शाळामधून डॉ. अभिनव देशमुख यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणापासून अंगी हुशारी असल्याने लातूरच्या केशवराज विद्यालयाचे गुरुजी धोंडीराम नामदेवराव चाफेकर, कै. शंकरराव मोरे, प्रफुल्ल कुलकर्णी, अनिरुद्ध जाधव, डी. वाय. मुळे, अतुल लांडे, विवेक कुलकर्णी, जगन्नाथ दीक्षित या शिक्षकांनी विद्यार्थी दशेपासून अभिनव देशमुख यांना स्पर्धा परीक्षासाठी तयारी करून घेतली. लातूरच्या केशवराज विद्यालयात शिकत असताना थोडीराम चाफेकर गुरुजी मराठी विषय शिकवीत होते. डोक्यावर कायम गांधी टोपी, पांढरेशुभ भोतर परिधान करून सायकलवरून चाटात प्रवास करायचा असा चाफेकर गुरुजींचा रुबाब होता. त्यांच्याकडे पाहून अभिनव यांना भारतीय कपड्यांमध्ये आपण चांगले दिसू शकतो, याची त्याचवेळी जाणीव झाली.

परिणामी लहानपणापासून स्वच्छ कपडे परिधान करण्याची त्यांना सवय लागली. दरम्यान, राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. तेथे शिक्षक अनिरुद्ध जाधव यांचा दरारा मोठा होता. लातूर पॅटर्नचे प्रणेते म्हणून त्यांची ओळख असल्याने ते समोरून आल्याचे पाहताच सर्वच विद्यार्थी पळ काढायचे. शिस्तबद्ध स्वभावाचे असल्याने जाधव सरांना खासगी क्लासेस, शिक्षण संस्थांच्या ऑफर येत होत्याय परंतु पैसा कमाविण्याऐवजी संस्थेशी एकनिष्ठ राहून ती नावारूपास आणली. संस्थेतील एकाही शिक्षकाला स्वतःचा वैयक्तिक क्लास क दिला नाही. त्यांच्याकडून अभिनव देशमुख यांना शिस्तीचे धडे शिकता आले. त्यानंतर अभिनव यांनी औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. एमबीबीएस पदवीचे शिक्षण घेताना शिक्षक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्याकडून पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजातील घडामोडींच्या ज्ञानाचा खजिना आत्मसात करता आला.

शालेय जीवनात दक्षिण भारता गेलेल्या सहलीमुळे अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि खूप मोठा अनुभव देखमुख यांना आत्मसात करता आला. कबी कुसुमाग्रज यांना भेटायची संधी मिळाली. प्रफुल्ल कुलकर्णी हे तसे राजकीय शिक्षक ते शाळेत कमी आणि बाहेर जास्त असत. त्यामुळे आम्ही राजकीय शिक्षक या नावाने त्यांची ओळखत होती. ते मराठी शिकवीत होते. त्यांनी शिकविलेली कोलंबस गर्वगीत कवितेने आयुष्याला नवे वळण मिळाले, असा अनुभव सांगत डॉ. अभिनव देशमुख हे शिक्षकांमुळेच आयपीएस झाले, हे कायम सांगतात. डॉ. अभिनव देशमुख यांच्या कर्तव्याचा कार्यकाळ पाहता गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी नक्षलवाद मोडून काढण्याचा धडाकेबाज पराक्रम केला आहे. नक्षलवाद, माओवाद मोडून काढताना गडचिरोली पोलीस प्रशासनाने राबवलेले सोशल पोलिसिंगवी

दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. एकेकाळी माओवाद्यांनी पुरस्कृत केलेला नक्षलवाद मोडून काढणारे डॉ. अभिनव देशमुख हे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात कर्तव्य बजावताना कोराना प्रादुर्भावाने देशात शिरकाव केला. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्याने डॉ. अभिनव देशमुख यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोल्हापूरकरांच्या साथीने व पोलीस खात्यातील सहकाऱ्यांसह अहोरात्र कर्तव्य बजावले. लॉकडाऊनच्या काळात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखांनी संदेश देताना आपल्या भावना तळमळीने व्यक्त केला. कोरोनाची लढाई ही काही एकट्या प्रशासनाची नसून सर्वाची जबाबदारी आहे. सर्व समाजघटकांमध्ये सक्रिय सहभाग असल्याशिवाय कोरोनावर मात करू शकणार नाही. अशा प्रकारे कोरोना संकट काळात कर्तव्य बजावताना डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षकपदी बदली झाली. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. अभिनव देशमुख यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने गुन्हेगारी प्रवृती नष्ट करून पुणे ग्रामीण परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याचे आश्वासन दिले.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचा चार्ज घेतला. ‘पोलीस दल हीच माझी ताकद आहे याच ताकदीवर जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, अवैध धंदे, काळे धंदे मोडून काढण्यासाठी पोलिसांची पथक नेमू, असे जाहीर करून त्यांनी गुन्हेगारी व काळे धंदे मोडून काढण्याचा विडा उचलला. पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारताच डॉ. देशमुख यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. सुरुवातीला त्यांनी दौड येथील गुंडाला मोक्का अंतर्गत कारवाई करत तडीपार केले, तर शिक्रापूर येथे सुमारे ४१ लाख रुपयांचा गुटखा पकडून जिल्ह्यात मोठी कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे.. अनेक फरार आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्यात, तर जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यामध्ये छोट्या-मोठ्या अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली.

त्यामुळे डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यास अवैध धंदे, दोन नंबरवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अभिनव देशमुख हे शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांनी कोल्हापूर येथे कार्यरत असताना कामात कुचराई, बेशिस्तपणा, गैरवर्तन, निष्काळजीपणा, नियमांचा भंग करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती तर पोलीस खात्यातील काही हप्ता बहाद्दरांना देखील वेळेत घरी बसवले होते. तसेच अवैद्य धंद्यांवर आळा घालण्यासाठी ते परिचित असून, पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक असलेले अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.