Is the India – Pakistan war over or is still running | भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे की थांबलय |
Is the India – Pakistan war over or is still running १० मे ला संध्याकाळी सांगण्यात आले की भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबले. दोन्ही देशांनी युद्ध विरामाला मान्यता दिली. परंतु काही तासात पाकिस्तान ने भारताच्या काही ठिकाणी drone attack केले आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तान ने युद्ध विरामचे उल्लंघन केल्याचे सांगितले. त्यानंतर पाकिस्तान चे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतानेच युद्ध विरामचे उल्लंघन केले हे स्पष्ट सांगितले.
शनिवारी १० मे ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले ‘अमेरिकेच्या मध्येस्थिणे रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदिवर सहमति दर्शवली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणकडे लक्ष्य दिल्याबद्दल धन्यवाद. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर पाकिस्तान चे उपपंतप्रधान इशाक दार यांनी युद्धविराम झाल्याचे ट्विट करून सांगितले. परंतु युद्धविरामची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानने च त्याचा भंग केला.
या घडलेल्या सर्व गोष्टींमुळे Is the India – Pakistan war over or is still running युद्ध थांबले यावर शंका निर्माण झाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबले असे सांगितले असले तरी अजून सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या नाहीत. तसेच सिंधु करारावर भारताकडून कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही. या सर्व गोष्टींचा उलगडा आज होणाऱ्या भारत पाकिस्तान मीटिंग नंतर च होईल.
भारताने युद्धविरामाला होकार दिल असला तरी सुद्धा सीमेवरील सैन्य अजूनही माघारी फिरलेले नाही. पाकिस्तान ने काही हालचाल केली तर त्यांना चोख प्रतिउत्तर देण्याचे आदेश सैन्याना देण्यात आलेले आहेत.