Site icon Marathi News

Latest news Narayan rane on Sanjay raut संजय राऊत म्हणजे मूर्ख माणूस

narayan rane on sanjay raut

Latest news Narayan rane on Sanjay raut संजय राऊत म्हणजे मूर्ख माणूस.केंद्र सरकार ने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

sanjay raut on narendra modi अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की नरेंद्र मोदी यांना अर्थसंकल्प समजला नाही. याचे कारण म्हणजे अर्थसंकल्प समजायला किमान ७२ तास लागतात आणि अर्थसंकल्प मांडत असताना नरेंद्र मोदी जोरजोरात बाक वाजवत असतील तर नरेंद्र मोदींना अर्थसंकल्प समजला नाही असे संजय राऊत बोलले.

sanjay raut on devendra fadanvis

याच बरोबर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबद्दल खळबळ जनक वक्तव्य केले. वर्षा बंगल्याबद्दल संजय राऊत बोलले की मुख्यमंत्री अजून वर्षा बंगल्यावर गेले नाहीत. ते तिथे राहायला झोपायला तयार नाहीत याचे कारण काय ? वर्षा बंगल्यावर पूर्वी नेमक काय घडलंय. याआधी तिथे काय घडवून आणले आहे का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले.

narayan rane on sanjay raut 

संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना अर्थसंकल्प समजला नाही या टीकेवर बोलताना नारायण राणे म्हणाले संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जागतिक स्तरावर १४ व्या क्रमांकावर असणारा आपला देश आज ५ व्या क्रमांकावर आणला. नरेंद्र मोदी यांना या गोष्टी समजतात म्हणून तर आज आपला देश ५ व्या क्रमांकावर आहे.एका खोलीत बसून टीका करणे निंदा नालस्ती करणे हा त्यांचा गुण आहे म्हणून संजय राऊत यांच्या कोणत्याच व्यक्तव्याची दखल घेऊ नये असे मला वाटते असे नारायण राणे म्हणाले.

 

Exit mobile version