Site icon Marathi News

Manoj jarange patil:पाडापाडी करणार,उमेदवार देणार आणि डायरेक्ट पलटी जरांगे पाटलांची भूमिका.

मनोज जरांगे पाटील

Manoj jarange patil काल जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन एक महत्वाचा निर्णय घेतला.यामध्ये त्यांनी 25 जागांवर मराठा उमेदवार निवडणूक लढवणार असे सांगितले.आणखी काही मतदार संघात उमेदवार द्यायचे का नाही यावर रात्रीत निर्णय होईल असे सांगितले.आणि ज्या ठिकाणी उमेदवार देणार नाही तीथे पाडा पाडी करणार असल्याचे सांगितले.

 

हे निर्णय घेण्याच्या अगोदर मराठा,मुस्लिम, आणि बौद्ध समीकरण जुळल्याच सुद्धा जरांजे पाटील यांनी सांगितले काही जागेवर मराठा आणि काही जागांवर इतर दोन समाजाचे उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.आणि ज्या ठिकाणी उमेदवार देणार नाही तिथे पाडापाडी करण्याचा निर्णय घेतला होता.

 

Manoj jarange patil आज सकाळी जरांगे पाटील यांनी सर्वात वेगळी भूमिका घेतली. त्यांनी सर्व मराठा उमेदवार यांना अर्ज मागे घ्यायला सांगितले. तसेच ह्याला पाडा आणि त्याला पाडा अशी भूमिका माझी नाही असे त्यांनी सांगितले. म्हणजे जरांगे पाटील यांनी जे दोन निर्णय घेतले होते

1) 25  जागांवर मराठा उमेदवार निवडणूक लढवणार .

2) ज्या ठिकाणी उमेदवार देणार नाही तीथे पाडा पाडी करणार . 

या दोन्ही निर्णयांना फिरकी मारणारी भूमिका जरांगे पाटील घेतली आणि निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले.

या निवडणुकीत जरांगे पाटील नेमक काय करणार – पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे यांनी सांगितले की जरांगे फॅक्टर लई काय करणार निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो काय आणि बाहेर राहिलो काय कसा बी खेळ खल्लास करणार. सुट्टी कोणालाच देणार नाही. एक जातीवर धाडस करणे आणि निवडणुकीला सामोरे जाणे योग्य नाही म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

 

 

Exit mobile version