नाशिकचे सिंघम पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये

१९९९ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी दीपक पाण्ड्ये हे नाशिक पोलीस आयुक्तपदी (Nashik Police Commissioner Deepak Pandye) सध्या कर्तव्य बजावत आहेत. कोरोना संकट काळात त्यांनी नाशिक पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. या संकट काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत नागरिकांना कोरोनामुक्त राहण्यासाठी दीपक पाण्ड्ये यांनी वेळोवेळी उत्तम निर्णय घेतले. या निर्णयांमुळे नाशिककरांचे आरोग्य उत्तम राहण्यास हातभार लागला. आध्यात्माला व सात्वीक विचारशैली असलेल्या दीपक पाण्डवे यांची विशेष खासियत म्हणजे त्यांच्या दिवसाच्या सुरुवात गोदास्नाने होते. आयपीएस अधिकारी असूनही त्यांनी संस्कृती, सी-परंपरांसह अध्यात्माला कायम प्रथम स्थान दिले आहे. तसेस त्यांनी आतापर्यंत राज्य सरकारच्या सुधार सेवाचे विशेष पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र राज्य पोलिस हाऊसिंग अॅण्ड वेल्फेअर कॉर्पोरेशनचे विशेष महानिरीक्षक आणि सहसंचालक म्हणून कर्तव्य बजावले आहे.

गुन्हेगारीचा बिमोड करून नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये यांच्या रूपात नागरिकांनी वेळोवेळी पाहिले. मात्र या पलीकडे आणखी एक स्तुप गुण पाहून नाशिककर भारावून गेले. दीपक पाड्ये चक्क गोदावरी नदीत स्नान करतात, त्यांच्या जोडीला ९० वर्षाचे त्यांचे वडीलही असतात. या दृश्यामुळे आयुक्तपदाचा थाटबाट सोडून गोदास्नान करणारा पहिला आयपीएस अधिकारी दीपक पाण्ड्ये यांच्या रूपात बघायला मिळाला आहे.

बिहार राज्यात गंगा नदीकिनारी राहणाऱ्या दीपक पाण्ड्ये यांची नाशिक शहर पोलीस आयुक्त पदी बदली झाली आणि दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदामाईच्या दिशेने ते आकर्षित झाले. गेल्या दहा महिन्यांपासून दीपक पांडे आणि त्यांचे वडील शिवानंद पाण्ड्ये हे दररोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर गोदा नदीपत्रात स्नान करतात. इतर वेळी चालताना काठीचा आधार घेणारे शिवानांद पाण्ड्ये पाण्यात गेल्या मात्र जो सूर मारतात, हे प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय अनेकांना विश्वास बसणार नाही.

गोदावरी नदीत स्नान करण्यामागे धार्मिकता नसून शास्त्र आहे. नदीच्या वाहत्या पाण्यात प्रचंड ताकद असते. पंचमहाभुतांचे स्नान इथे घडते. शरीरासाठी जल, वायू, सूर्यप्रकाश आवश्यक आहे. त्यामुळे जल चिकित्सा करण्यासाठी येथे जाणे दीपक पाण्ड्ये पसंत करतात. आयपीएस झाल्यानंतर नदीकाठी पोस्टिंग झाली नव्हती. त्यामुळे नदीस्नान करण्याचा योग आला नव्हता. मात्र त्यांचे वडील ५० ते ६० वर्षापासून गंगास्नान करत आहेत.

लोकांच्या नजरेतून पाहावयाचे झाल्यास, आयपीएस अधिकारी म्हटल्यावर सुखी आयुष्य, उत्तम थाट डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र सर्वसामान्य नागरिकांसोबत दीपक पाण्ड्ये गोदावरीत स्नान करत असल्याने नागरिकांना त्यांच्यांविषयी कुतूहल निर्माण झाली आहे. अधिकारीच गोदापत्रात स्नान करत असल्याने गोदावरी प्रदूषणमुक्त होईल गावकरी नदीपात्रात कचरा, नाल्यांचे पाणी टाकणे बंद करतील, असा विश्वास अनेकांना वाटतो.

कमालीची बाब म्हणजे शहरी भागातील नदी प्रदूषित असल्याने रामकुंडात स्नान करण्याचे टाळून स्वच्छ पाण्याच्या शोधात त्यांनी शहराची हद्द ओलांडली. गोदास्नानाच्या दिनक्रमात एकाही दिवस खंड पडलेला नाही. काही दिवसांपूर्वी गोदावरीला पूर आला तेव्हाही दीपक पांडे यांनी गोदा स्नान केले. अलीकडेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यांवर गुन्हा दाखल करून देशभरात खळबळ उडवून दिल्यानंतर ही तेवढ्याच शांततेत गोदामाईच्या पाण्यात स्नानाचा आनंद लुटत होते.

गोदा स्नानानंतर नदीकाठी दोघे पितापुत्र श्वासाद्वारे मेंदूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायामाचे धडे गिरवतात, एक दीड तास निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यानंतर खाकी परिधान करून रुबाबदार अधिकारी दैनंदिन कामकाजासाठी कार्यालयात दाखल होतो आणि गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पाण्ड्ये सज्ज असतात.

गोदा स्नानामागचे कारण :
दीपक पांडे यांच्या पंचमहाभूत स्नानाबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेतले असता नदीचे पाणी रात्रभर स्थिर असते. चंद्राचा शीतल प्रकाश पडल्याने पित्ताचा नाश होतो, तर सूर्योदयवेळी नदीत स्नान केल्याने कफ, वात पित्त हे त्रिदोष मिटण्यास उपयोग होत असल्याचा आयुर्वेदाचार्य विक्रांत जाधव यांनी केलाय. नियुक्ती पासूनच दीपक पांडे चर्चेत आहेत, कधी ग्रीन ज्यूसच्या माध्यमातून, कधी हेल्मेटसक्तीच्या उपक्रमातून तर कधी थेट केंद्रीय मंर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यात आता आणखी एका उपक्रमाची भर पडली, फक्त या उपक्रमाचा गोदामाई प्रदूषण मुक्तीसाठी जर उपयोग झाला तरी नाशिककर धन्य होतील.