Solapur fire News: Central Textile या टॉवेल च्या कंपनीला लागलेल्या आगीत कंपनीच्या मालकासह 8 जणांचा मृत्यू.
रविवारी सकाळी सोलापूर मधून एक दुखद बातमी समोर आली. सोलापूर मधील अक्कलकोट midc मध्ये असणाऱ्या सेंट्रल टेक्सटाइल कंपनीला आग लागली. यामध्ये कंपनीच्या मालकासह 8 जणांचा मृत्यू झाला .
Solapur fire News: Central Textile आग कधी आणि कशी लागली
रविवारी पहाटे 3.45 च्या दरम्यान सेंट्रल टेक्सटाइल या टॉवेल बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. कंपनीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे लोकानी बघितले. मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे लक्ष्यात आल्यावर लोकानी midc हद्दीत असणाऱ्या अग्निशामक दलाला फोन केला. साधारण चार वाजन्याच्या दरम्यान अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले.
Solapur fire News: Central Textile आग विझवायला उशीर झाला का ?
अग्निशामक दलाने आग विझवण्यासाठी कसोटीने प्रयत्न केले. या कंपनीवर पत्रे असल्यामुळे आग विझवायला अडचण निर्माण झाली. म्हणून अग्निशामक दलातील जवान सीडीच्या सहाय्याने खिडकीतून आत गेले. सुरुवातीला त्यांनी आग विझवण्यासाठी फोम चा वापर केला . धूर जास्त वाढल्यामुळे नंतर त्यांनी आग विझवण्यासाठी ps 8 मटेरियल चा वापर केला. 10 पेक्ष्या जास्त गाड्या ही आग विझवत होत्या. आग विझवण्यासाठी jcb च्या सहाय्याने या कंपनीची एक भिंतही पाडण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी 100 पेक्ष्या जास्त पाण्याचे बंब वापरले.
Solapur fire News: Central Textile कंपनीच्या मालकासह 8 जणांचा होरपळून मृत्यू
SOLAPUR FIRE NEWS- 8 people died in fire आगीत होरपळून आठ जणांचा मृत्यू
काही वेळात जवानांनी तिघांना बाहेर काढले. त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कंपनीच्या वरच्या मजल्यावर मास्टर बेडरूममध्ये कंपनीचे मालक उस्मानभाई मनसुरी त्यांचा मुलगा ,सून आणि 1 वर्षीयचा नातू आणि अन्य एक जन असे एकूण 5 जन अडकले होते. ही आग वाढत असल्यामुळे सोलापूर मधील सर्व अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. याच बरोबर पंढरपूर आणि अक्कलकोट येतील गाड्या सुद्धा बोलावण्यात आल्या. ही आग विझवताना अग्निशामक दलाचे दोन जवान काही प्रमाणात भाजले गेले.
कंपनीच्या मालकासह चार जणांना दुपारी एक च्या दरम्यान बाहेर काढण्यात यश आले. आणि त्यांना हॉस्पिटल ला नेण्यात आले. परंतु धूराने गुदमरून आणि आगीने त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सर्वांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
Solapur fire News: Central Textile आग नेमकी का लागली
आग नेमकी कशाने लागली हे अजून तरी समजू शकले नाही. परंतु शॉर्ट सर्किट झाल्यामुले आग लागली असावी असा अंदाज वेक्त केला जात आहे. टॉवेल बनवणारी कंपनी असल्यामुळे तिथे कापडी मटेरियल जास्त होते आणि त्याने मोट्या प्रमात आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.