Swami vivekanand: स्वामी विवेकानंद यांची ही गोष्ट वाचा तुम्ही कधीच दुखी होणार नाहीत.

swami vivekanand stories

आपल्याला जीवन म्हणजे काय ? असा प्रश्न कधी ना कधी समोर येतोच. जीवनाचा अर्थ काय? सुख दुख म्हणजे काय ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला भेटणार आहेत. त्यासाठी ही स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलेली गोष्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

Swami vivekanand एकदा स्वामी विवेकानंद यांचा एक शिष्य त्यांच्याकडे येतो आणि विचारतो जीवन म्हणजे काय ? कोणी म्हणत आयुष्य चांगल आहे कोणी म्हणत आयुष्य वाईट आहे. नेमक जीवन म्हणजे आहे तरी काय ?

यावर Swami vivekanand स्वामी विवेकानंद त्याला एक गोष्ट सांगतात ती अशी आहे , एकदा एक माणूस जंगलातून प्रवास करत असतो अचानक त्याच्या अंगावर लांडगा धावून येतो. मग तो माणूस रोड च्या बाजूला खड्ड्यात उडी मारतो. पण तो खड्ड्यात पडण्या अगोदर खड्ड्याच्या काठावर असणाऱ्या वडाच्या झाडाच्या पारंबीला लटकतो. त्याला थोड बरं वाटत की लांडग्यापासून आपण वाचलो.

मग तो खाली खड्ड्यात बघतो. खड्ड्यातील पाण्यात त्याला भली मोठी मगर दिसते.ती त्याची खाली पडण्याची वाटच बघत असते.पुन्हा घाबरतो पण थोड त्याला समाधान वाटत आपण खड्ड्यात पडलो नाही.थोड्या वेळात त्याला जाणवते की त्याच्या डोक्यावर कशाचा तरी थेंब सारखा पडतोय, मग तो वरी बघतो. वरी एक मधमाशीचे पोळ असत आणि त्यातून मधाचा एक एक थेंब त्याच्या डोक्यावर पडत होता.

ते बघून तो माणूस तोंड वर करतो आणि मधाचे थेंब जिभेवर घेतो. थोड्या वेळासाठी तो सर्व विसरतो आणि मधाचा गोडवा चाखतो.यामध्ये त्याला आनंद मिळतो. पण हा त्याचा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता.त्याला काही तरी कुरतडल्या सारखा आवाज येतो आणि बघतो तर काय दोन उंदीर एक काळा आणि एक पांढरा तो ज्या पारंबीला लटकलेला असतो तिला ते उंदीर कुरतडत होते. गोष्ट संपते.

Swami vivekanand शिष्याचा चेहरा बघून स्वामी विवेकानंदांच्या लक्ष्यात येते की याला काहीच समजले नाही.मग विवेकानंद सांगतात तो जो लांडगा अंगावर धाऊन आला होता तो काळ होता. पाण्यामध्ये जी मगर होती तो मृत्यू होता. जे काळा आणि पांढरा उंदीर म्हणजे दिवस आणि रात्र होते. आणि मध्येच पारंबीला लटकून मधाचा गोडवा आणि त्यात मिळालेला आनंद म्हणजे जीवन रस होय.

     

आयुष्य असेच आहे मृत्यू अटळ आहे. समुद्राला जशी भरती आणि ओहोटी आहे तसेच आपल्याला सुख आणि दुख आहे. मृत्यू चा दुखांचा विचार करण्यापेक्ष्या आहे त्या परिस्थितीत आनंदी राहता आले पाहिजे.आपला आदर्श नेहमी मोठा असावा.जर आपण बघितलं ज्यांनी काही तरी मोठ काम केलंय त्यांना आयुष्य कमी मिळाल  पण काम मोठं केल स्वामी विवेकानंद असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील 50 ते 55 वर्ष एवढ आयुष्य मिळाल पण तेवढ्या कमी वेळात एवढ मोठ स्वराज्य महाराजांनी उभे केले.आपल्याला एक घर उभ करायला आपल आयुष्य जात.म्हणून आयुष्य जास्त असो किंवा कमी काही तरी चांगला काम केल म्हणजे जीवनाचे सार्थक झाले म्हणायचे आणि आनंदात जगायच.