Categories
Entertainment

Mulshi Pattern Full Movie । मुळशी पॅटर्न

Mulshi Pattern : Director / Screenwriter / Story Writer / Dialogue Writer : Pravin Tarde
Mulshi Pattern : Producers : Punit Balan, Abhijeet Bhosale

Mulshi Pattern Cast : Om Bhutkar (Rahul), Pravin Tarde (Nanya Bhai), Upendra Limaye (Vitthal), Mahesh Manjrekar (Shirpya), Sunil Abhyankar (Vakil), Mohan Joshi (Sakha), Kshitish Date (Ganya)

प्रवीण तरडे दिग्दर्शित, मुळशी पॅटर्न | Mulshi Pattern.

Mulshi Pattern | मुळशी पॅटर्न – प्रवीण तरडे, ओम भुटकर, मोहन जोशी, महेश मांजरेकर आणि उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मुळशी पॅटर्न आहे तरी नेमका काय असा प्रश्न पडतो, नावामुळे नेमका अंदाज येत नाही कि सिनेमा कोणत्या गोष्टीवर आधारित आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर समजते कि तो खूप मारधाड युक्त सिनेमा आहे.

Mulshi Pattern । मुळशी पॅटर्न

2018 सालच्या मुळशी पॅटर्न सिनेमाने पुण्यात गुन्हेगारीची तीव्रता कशी शिगेला पोहचली ह्यावर प्रकाश टाकला आहे. त्यामागची परिस्थिती, करणे प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केले आहे.

कदाचित तुम्ही हि कथा ऐकली असेल पण येथे आवर्जून सांगावी अशी आहे.

एकदा कॉलेजमध्ये प्राध्यपकांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, तिथे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. जर मी तुम्हाला एक कोटी रुपये दिले. तर तुम्ही त्याचं काय कराल?

विद्यार्थ्यां ते ऐकून एकदम वेडी झाली आणि कल्पना करू लागले, काहींनी उत्तर दिले कि आम्ही घर, गाडी घेऊ. काही म्हणाले, कपडे, गाड्या यांसह महागडे मोबाईल, लॅपटॉप आदी गोष्टी घेऊ. काही मुली म्हणाल्या आम्ही दागिने घेऊ, तर काही मुलं म्हणाली, आम्ही सगळे पैसे बँकेत ठेवू आणि मिळणारं व्याज खाऊ.

एक मुलगा मात्र शांत बसला होता, प्राध्यपकांनी त्याच्या  जवळ जाऊन विचारले, काय रे, तुला नकोत का एक कोटी? त्यावर तो मुलगा म्हणतो, ‘पैसे कुणाला नको असतात सर, पण मी विचार करेन कि मिळालेल्या एक कोटीचे पुढे जाऊन दोन कोटी कसे होतील’.

वरच्या एका गोष्टी वरून तुमच्या लक्षात आहे असेल कि, माणसाकडे खूप सारा पैसा एकदम आला कि तो कसा खर्च करायचा ह्याचा विचार करणाऱ्यांची संख्या जगात अधिक आहे. अचानकपणे एकदम मोठी रक्कम आपल्याकडे आली तर तिचं करायचं काय हे  कित्येकांना समजत नाही.

माणूस उद्याचा विचार करत नाही, तो आज काय करायचं ह्या विचारात असतो त्यामुळे साधारणतः नेहमी गोधळलेला असतो. आपल्याकडे जो पैसे आहे तो आज वापरायचा म्हणजे बंगला, गाडी, मोबाईल, फिरायला जातो, चैनीच्या मोठेपणा करणाऱ्या इत्यादी गोष्टीवर तो पैसा खर्च करून मोकळा होतो.

आपल्याकडे जो पैसा आहे तो एकदाचा खर्च कसा करायचा ह्याकडे त्याचा कल जास्त असतो, उद्याची चिंता करण्यासाठी त्याचाकडे वेळ नसतो. एकदा पैसे संपले कि त्याची अक्कल ठिकाणावर येते, खर्च जास्त आणि उत्त्पन्न कमी असे होते तेव्हा त्याचा ताळमेळ आला नाही कि नैराश्य येते, व्यसन लागतात, आपल्या मुलाबाळांना देखील हालअपेष्टां भोगायला लागतात.

पुढे ह्याच सर्वातून सुरुवात होते ती गुन्हेगारी करण्याची आणि आपला मोठेपणा करण्याची, दुसऱ्याचा टाळूवरचे लोणी खाणार्यांची. अशाच एका आशयाचा सिनेमा प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न मधून घेऊन आला आहे.

Marathi News Live

Mulshi Pattern | मुळशी पॅटर्न कशाबद्दल:

1991 मध्ये झालेल्या आर्थिक उदारीकरणा नंतर पुण्यात झालेल्या पुनर्विकासावर हा चित्रपट आधारित आहे. एकीकडे शहरांचा विकास जलदगतीने होत होता, त्यामुळेच शहराच्या आजूबाजूच्या गावातील जमिनीला मागणी वाढाली, मागणी वाढल्याने अचानक जमिनींचे भाव वाढले. 

मोठ्या मोठ्या कंपन्या, व्यापारी, बिल्डर या लोकांमध्ये जमिनी विकत घेण्याची स्पर्धा चालू झाली आणि जमीन मालकांना मोठ्या मोठ्या रक्कमेचे आमिष देण्यास सुरूवात झाली. त्यातच वर्षभर मेहनत करून देखील हाती काहीच नाही अशा शेतकऱ्यांना एका रात्रीतून कोट्याधीश होण्याची संधी चालून येत होती. 

त्या आमिषाला बळी पडून कित्याक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकून टाकल्या. अचानक आलेल्या इतक्या मोठ्या पैशाचं काय करायचं आणि कसा करायचं ह्या गोष्टीच ज्ञान नसलेला शेतकरी कुटुंब भेटलेल्या पैशाला बंगला, गाडी, सोन, मौज मस्ती करून, एकमेकांवर मोठेपणा करून तो संपवत होते. 

ज्यावेळी पैसा संपला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली, आणि त्यांचे डोळे उघडले. जमिनीचे मालक होते त्याच जमिनीवर आता त्यांना नोकर माणूस, गडी माणूस म्हणून वागणूक भेटत होती. सर्व मान सन्मान गमावला होता आणि आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती आली होती. 

आपली फसगत झाली ह्या विचारातून कित्येकजण गुन्हेगारीकडे वळले. ह्याचातूनच पुढे माणसातील जनावर जागा झाला, जंगलातील नियमा प्रमाणे जो ताकातवर तो राज्य करणार त्यासाठी आपल्यापेक्षा कमजोर असलेल्या संपवायचे हाच उद्देश. तोच आपल्याला मुळशी पॅटर्न मध्ये बघायला भेटतो.

Mulshi Pattern | मुळशी पॅटर्नची कथा : 

कथा आहे एका जमीन विकलेल्या शेतकरी कुटुंबाची. आपल्या गावातील पाटील असलेला सखाराम (मोहन जोशी) ह्याने आपली जमीन विकून मिळालेले पैसे खर्च करून टाकले आहेत. आता त्याला त्याच जमिनीवर वॉचमन म्हणून बिल्डरकडे नोकरी करावी लागत आहेत. 

राहुल (ओम भुतकर) सखारामचा मुलगा आपल्या बापाला टोमणे मारत राहतो, नेहमी टोचून बोलत राहतो. पैसे संपल्याने आणि आता त्यांची शेत जमीन देखील नसल्याने त्यांची आर्थिक परिसिथिती नाजूक होते. सर्व कुटुंब पुणे शहरात राहायला येते. 

एका झोपडपट्टीत राहायला लागतात आणि सखाराम मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करायला लागतो. त्यांचा मुलगा राहुल आपल्या वडिलांविषयी राग ठेऊन असतो. एक दिवस त्याच्या हातून गुन्हा होतो आणि त्याला तुरुंगात जावे लागते.

तुरुंगात गेल्यावर त्याची भेट होते ती नान्या भाई (प्रवीण तरडे) ह्या गुंडांशी, त्याला देखील राहुलच्या वागणुकीमुळे प्रभावित होतो आणि त्याचे नाव ठेवतो बकासुर. नान्या भाईला राहुल मध्ये स्वतःची छवी दिसते आणि तो राहुलला आपल्या टोळीत सामील करून घेतो. राहुल देखील त्याचा विश्वास मिळवतो.

एक दिवस हाच राहुल नान्या भाईला साफ करतो, आणि त्याची जागा घेतो आणि आपली दहशत पसरवतो, तो जसा वर वर जातो तसाच तो आपले शत्रू देखील निर्माण करत असतो. पोलीस खात्याचा रडार वर तो येतोच आणि येथे भेट होते ती निरीक्षक कडू (उपेंद्र लिमये) सोबत.

निरीक्षक कडू आता कशा पद्धतीने राहुलच्या गुन्हेगारीला आला घालतात, त्यासाठी काय करतॊ आणि कायद्याचं राज्य निर्माण करु शकतो का  ते पहा. 

एखाद्याचा डोक्यात राग चढला कि तो कोणत्या ठरला जातो हे दाखवले आहे. एखादी वस्तू आपल्याकडे नाही ती दुसऱ्याकडे आहे पण ती वस्तू आपण पैशाने मिळवू शकत नाही तेव्हा होणार मानसिक त्रास ती लाचारी उत्तम रंगवली आहे. 

राहुल आपल्या कुटुंबाच्या वाताहतीसाठी वडिलांना जबाबधार धरतो, ज्यावेळी त्याला जाणवते कि बापाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही तेव्हा जो राहुल रंगवला आहे तो बघण्यासारखा आहे. वडिलांच्या भूमिकेत मोहन जोशी चांगले आहेत 

एक खचलेला बाप, आयुष्यात काहीच करू न शकलेला माणूस बोलका आहे. महेश मांजरेकर देखील आपली छाप टाकतात. गणेश (क्षितिश दाते) राहुलच्या मित्राच्या भूमिकेत खूपच प्रभावी वाटतो. रमेश परदेशी आणि देवेंद्र गायकवाड हे भाई चांगले उभे केले आहेत, वकिलाच्या भूमिकेत सुनील अभ्यंकर छान आहेत. 

Mulshi Pattern | मुळशी पॅटर्न काय आहे 

सिनेमाची कथा साठी, सरळ असली तरी त्याचा मांडणी, संवाद, पटकथेवर लेखक आणि दिगदर्शक प्रवीण तरडेने चांगली बरीच मेहनत घेऊन चांगले काम केले आहे. सिनेमातील काही दृश्य खूप प्रासंगिक आणि हृदयद्रावक आहेत.

कथा अगदी वास्तविक वाटावी अशी मांडली आहे. एक शेतकरी जो पैशाच्या मागे लागून जमीन विकून टाकतो, पुढे त्याची मौज मस्ती आणि जगण्यासाठीचा संघर्ष. त्याच्या कुटुंबाचे कशे हाल होतात, एका कुटुंबाची कशी वाताहत होते ते दाखवण्यात यशस्वी होतात.

सिनेमाचे संवाद उत्तम लिहिले आहेत, अगदी नैसर्गिक वाटतात. निराशा, अभिमान, क्रोध, गर्विष्ठपणा ह्या सर्व भावना सिनेमात उत्तम प्रकारे दाखवल्या गेल्या आहेत. सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहेत आणि आपले पात्र चांगले रंगवले आहेत.

Mulshi Pattern | मुळशी पॅटर्न का पहावा :

शहरीकरण आणि त्यातून कशा पद्धतीने जमिनी बळकावण्याची स्पर्धा चालू झाली ते पाहण्यासाठी तसेच गरीब, शेतकऱ्याची आपली जमीन विकल्यावर होणारी वाताहत उत्तम दाखवली आहे. ओम भूटकरचा पॉवरफुल  अभिनय पाहण्यासारखा आहे. 

Mulshi Pattern Full Movie Download 

Mulshi Pattern : मुळशी पॅटर्न हा सिनेमा तुम्ही ZEE5 च्या वर पाहू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा. 

mulshi pattern, Mulshi Pattern – Full Movie Audio Jukebox, Mulshi Pattern | मुळशी पॅटर्न | Official Trailer, mulshi pattern full movie, mulshi pattern full movie – youtube, mulshi pattern full movie download, mulshi pattern full movie download 480p filmywap, mulshi pattern full movie download 720p, mulshi pattern full movie download bolly4u, mulshi pattern full movie hd, mulshi pattern full movie online, mulshi pattern full movie watch online, mulshi pattern full movie watch online dailymotion, mulshi pattern full movie watch online youtube, mulshi pattern marathi movie download, mulshi pattern movie, mulshi pattern movie download, mulshi pattern movie download 480p khatrimaza, mulshi pattern movie download free, mulshi pattern movie on zee talkies, mulshi pattern movie online, mulshi pattern movie review, mulshi pattern movie review in marathi, Mulshi Pattern remake, mulshi pattern review in marathi, Mulshi Pattern song, mulshi pattern wiki, patterns, pravin tarde, vipmarathi mulshi pattern full movie download, Watch Mulshi Pattern Full Movie Online in HD, मुळशी पॅटर्न