Categories
Sports

भारताला सौरव गांगुली पेक्षा चांगला कर्णधार नाही मिळाला – शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ने जागातली उत्तम कर्णधार जसे कि, स्टीव वॉ, रिकी पोंटिंग, सौरव गांगुली, ग्रीम स्मिथ, स्टीफन फ्लेमिंग आणि एमएस धोनी सारख्या कर्णधारांविरुद्ध खेळला आहे.

अशा मध्ये ह्यापैकी सर्वोत्तम कर्णधार कोण हे निवडणे शोएब अख्तरसाठी खूप कठीण होते, परंतु शोएब अख्तर ने एक नाव निवडले. रावलपिंडी एक्सप्रेस ने भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआई अध्यक्ष सौरव गांगुली चे नाव घेतले आहे.

सौरव गांगुली

अख्तरने थेट विश्व क्रिकेटच्या इतर महान कर्णधारांशी तुलना केली नाही, परंतु गांगुलीला सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार म्हणून पसंती दिली. एमएस धोनीला खूप चांगला लीडर म्हणत असताना अख्तर म्हणतो की, गांगुलीला संघ बनवण्याची कला होती.

सौरव गांगुली

अख्तरचे असे म्हणून आहे कि, जर भारत बद्दल बोलायचं झाले तर सर्वोत्तम कर्णधार म्हणून  तो सौरव गांगुली असेल. त्यांच्यापेक्षा चांगला कर्णधार भारताला तयार करता आला नाही. धोनी खूप चांगला आहे, तो एक महान कर्णधार आहे पण जेव्हा आपण संघाच्या बांधणीबद्दल बोलतो तेव्हा गांगुलीने एक उत्तम कामगिरी केली आहे.

शोएब अख्तर ने 46 टेस्ट, 163 एकदिवसीय आणि 15 टी20 मध्ये क्रमशः 178, 247 और 19 विकेट घेऊन पाकिस्तानचे प्रतिनीतित्व केले आहे. त्याचे पुढे असे म्हणणे आहे कि, त्याने कधीच विचार केला नव्हता कि वर्ल्डकप व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्पर्धेत भारत पाकिस्तानला पराभूत करू शकेल.

सौरव गांगुली

तो सांगतो कि, वर्ल्ड कपच्या बाहेर भारत आमच्यावर विजय मिळवू शकेल असे मला कधी वाटले नव्हते. 1999 मध्ये मी भारताचा दौरा केला,  आम्ही चेन्नईमध्ये जिंकलो, दिल्लीत पराभव झाला पण कोलकातामध्ये आम्ही पुन्हा जिंकलो, एकदिवसीय सामने जिंकलो, शारजाहमध्ये जिंकलो.

परंतु आता चे माजी वेगवान गोलंदाज आणि जे त्या काळात जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होते त्यांच्यामते ह्या सर्वात बदल झाला जेव्हा सौरव गांगुली भारतीय संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली.

शोएब अख्तर

शोएब अख्तर सांगतो की, जेव्हा भारतीय संघ गांगुलीच्या नेतृत्वात मे 2004 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आला होता तेव्हा वाटले होते कि हा संघ पाकिस्तानला हरवू शकतो आणि त्यांनी आम्हाला हरवले देखील.

सौरव गांगुली

भारताने पाकिस्तानला कसोटी सामन्यात 2-1 आणि एकदिवसीय सामन्यात 3-2 असे पराभूत केले होते.

Marathi News Live 

हे पण वाचा : सचिन तेंडुलकर माहिती

हे पण वाचा : विराट कोहली माहिती