Categories
Wiki

Full Form of ATM – एटीएम ह्या 7 कामांसाठीही वापरू शकता

ATM आपल्या सर्व जणांच्या परिचयाचा शब्द आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात एटीएम चा वापर करतो. कधी आपले पैसे काढण्यासाठी तर कधी पैसे कोणाला पाठवायचे असेल तर एटीएम चा वापर केला जाते. पण काय तुम्हाला माहीत आहे का एटीएम चा Full Form काय आहे?

अनेकदा हा प्रश्न competitive म्हणजेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विचारला जातो परंतु योग्य उत्तर माहीत नसल्याने बहुतेक उमेदवारांकडून चूक होते नाहीतर चुकीचे उत्तर देऊन मोकळे होतात. आज आम्ही तुम्हाला ह्या ठिकाणी एटीएम Full Form आणि एटीएम च्या संबंधित माहिती करून देणार आहोत.

आपल्यापेकी बहुतेक लोक विचार करतात कि, ATM full form म्हणजे Any Time Money परंतु हे चुकीचे आहे. ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला एटीएम च्या फुल फॉर्मच्या बाबतीत माहिती करून देतो आहे.

जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये एटीएम ला वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते. कॅनडा मध्ये एटीएम ला ABM (Automatic Banking Machine) म्हणून ओळखले जाते. काही देशांमध्ये Cash Point, Cash Machine, Mini Bank आणि “Hole in the wall” म्हणून बोलले जाते.

इतक्या वेगवेगळ्या नावांमुळे गोंधळ होतो कि, नक्की एटीएम फुल फॉर्म काय? ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला मिळावे, ह्या प्रश्नाचे tention दूर करावे म्हणून माहिती करून देणार आहे. चला दर पाहूया योग्य फुल फॉर्म.

ATM Full Form : एटीएम फुल फॉर्म काय आहे

जर एटीएम च्या शब्दांप्रमाणे विश्लेषण केले तर आपल्याला माहीत होईल कि,

A – Automated

T – Teller 

M – Machine 

ATM

एटीएम चे काही अन्य फुल फॉर्म्स

चला तर बघूया एटीएम चे काही अन्य full form विषयी जे खाली दिले आहेत.

 1. Air Traffic Management (Aviation Terminologies मध्ये)
 2. Asynchronous Transfer Mode (I. T. Sector मध्ये) हे एक telecommunications concept आहे
 3. Association of Teachers of Mathematics (हे एक Non-profit Organization आणि UK ची registered charity आहे)
 4. Angkatan Tentera Malaysia (Malaysian Armed Forces)
 5. Altamira Airport हा एक Airport आहे जो कि, Altamira, Brazil (Airport Code) मध्ये आहे.

ATM काय आहे ?

एटीएम हे एक Electronic Telecommunications Device आहे, बँक खात्यातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरली जाते. एटीएम द्वारे वैयक्तिक बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी तसेच भरण्यासाठी देखील केला जातो, याशिवाय Fund Transfer देखील केले जाऊ शकते.

एटीएम आल्यापासून बँकिंग प्रक्रिया खूपच सुलभ झाली आहे. पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी मानवी कॅशियरची आवश्यकता नाही म्हणजेच Automatic पद्धतीने. एटीएम मशीन दोन प्रकारची आहेत त्यापैकी एक जिथे आपण रोख रक्कम काढू शकतो आणि दुसरे जेथे आपण रोख रक्कम काढू किंवा जमा देखील करू शकतो.

एटीएम सुविधा भारतात सर्व राज्यात उपलब्ध आहे. एटीएमद्वारे व्यक्ती कधीही कोणत्याही वेळी पैसे काढू शकतो आणि हल्लीच्या नवीन एटीएम मधून व्यक्ती पैसे खात्यामध्ये जमा देखील करू शकतात.

भारत मध्ये सर्व बँकांमध्ये एटीएम ची सुविधा आहे. भारत मध्ये सध्या 50 पेक्षा जास्त बँक आहे, त्यापैकी सर्वात प्रथम नंबरवर आहे भारतीय स्टेट बँक. त्यानंतर इतर बँका HDFC Bank, ICICI Bank, यूको बँक, Bank of Baroda, Bank of Maharashtra ,बँक ऑफ बडोदा, इत्यादी.

एटीएम का फुल फॉर्म हिंदी में (Full form ऑफ ATM in Hindi)

 • ए – स्वयंचलित
 • टी – टेलर
 • म – मशीन

ATM Meaning

एटीएम चा अर्थ स्वचालित गणक मशीन.

एटीएम चे Basic Parts

एटीएम हे एक यूजर-फ्रेंडली मशीन आहे. कोणी ही सहजपणे पैसे काढू शकतील किंवा पैसे जमा करू शकतील, यासाठी विविध इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस हे ह्याचे वैशिष्ट्ये आहेत. एटीएमचे मूलभूत इनपुट आणि आउटपुट साधने खाली दिली आहेत:

इनपुट साधने (Input Devices):

कार्ड रीडर (Card Reader) : हे इनपुट डिव्हाइस एटीएम Card च्या मागील बाजूस असलेल्या चुंबकीय पट्टीमध्ये संचयित केलेल्या कार्डचा डेटा वाचतो. जेव्हा कार्ड स्वाइप केले जाते किंवा दिलेल्या जागी घातले जाते तेव्हा कार्ड रीडर खात्याचा तपशील कॅप्चर करतो आणि सर्व्हरवर देतो. खाते तपशील आणि वापरकर्ता सर्व्हरकडून प्राप्त आदेशांच्या आधारावर परवानगी दिली जाते.

कीपॅड (Keypad):  वापरकर्त्यास वैयक्तिक ओळख क्रमांक, रोख रक्कम, आवश्यक पावती आवश्यक आहे किंवा नाही इत्यादीद्वारे मशीनला विचारलेला तपशील प्रदान करण्यास वापरकर्त्यास मदत करते. PIN Number सर्व्हरला एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये पाठविला जातो. Keypad द्वारेच Enter, Cancel, Clear, Balance Check, इत्यादी इनपुट दिले जातात.

आउटपुट साधने (Output Device):

प्रदर्शन स्क्रीन (Screen) : हे स्क्रीनवर व्यवहाराशी संबंधित माहिती दर्शवली जाते. ह्या माहितीच्या आधारे खातेदाराचे नाम, बँक खात्यातील शिल्लक राशी, इत्यादी माहिती पाहू शकतो आणि त्याचा वापर करून आपला व्यवहार पूर्ण करू शकतो. स्क्रीन साधारण सीआरटी स्क्रीन किंवा एलसीडी असू शकते.

स्पीकर (Speaker) : बहुतेक एटीएम मध्ये स्पीकर उपलब्ध असतात. Keyboard द्वारे जेव्हा बटन दाबून एकादी कृती केली जाते त्यावेळी एक Audio Feedback आपल्याला ऐकण्यास येतो, त्याद्वारे आपल्याला आवाज स्वरूपात अभिप्राय दिला जातो.

पावती प्रिंटर  (Receipt Printer) : तुम्हाला छापील व्यवहाराची पावती दिली जाते. हे आपल्याला व्यवहाराची तारीख आणि वेळ, पैसे काढण्याची रक्कम, शिल्लक इ. सांगते.

कॅश डिस्पेंसर (Cash Dispenser) : हे एटीएमचे मुख्य आउटपुट डिव्हाइस आहे, कारण रोख रक्कम ह्यामधून दिली जाते. एटीएममध्ये प्रदान केलेल्या माहिती नुसार खातेदाराच्या खात्यातून योग्य रक्कम वापरकर्त्यास देते. त्यासाठी तेथे उच्च परिशुद्धता सेन्सर्स असतात.

एटीएम कसे कार्य करते (How ATM works):

एटीएमचे कार्य सुरू करण्यासाठी सर्वप्रथम एटीएम मशीनमध्ये प्लास्टिक एटीएम Card टाकावे लागते. काही मशीन्समध्ये आपल्याला आपले कार्ड Drop करावे लागते, तर काही मशीन्स मध्ये कार्ड स्वॅप करावे लागते. एटीएम कार्डांमध्ये चुंबकीय पट्टीच्या (Magnetic) रूपात आपले खाते तपशील (Account Details) आणि इतर सुरक्षितता माहिती (Personal Information) असते.

जेव्हा आपण आपले कार्ड Drop / Swap करता तेव्हा मशीनला आपल्या खात्याची माहिती मिळते आणि तेव्हा ते आपला पिन क्रमांक विचारते. योग्य माहिती प्रमाणित (Authentication) केल्या नंतर, मशीन आर्थिक व्यवहारास (Transaction) अनुमती देईल.

एटीएम काय करते (What ATM does)

एटीएममध्ये रोख वितरणाच्या मूलभूत वापरासह बर्‍याच कार्यक्षमता आहेत. त्यापैकी काही आहेत:

 • रोकड व धनादेश
 • निधी हस्तांतरण
 • रोकड पैसे काढणे आणि शिल्लक चौकशी
 • पिन बदल आणि मिनी स्टेटमेंट
 • बिल देयके आणि मोबाइल रिचार्ज इ.
 • प्रथम एटीएमचा वापर 1969 मध्ये न्यूयॉर्क (USA) येथे केमिकल बँकेद्वारे ग्राहकांसाठी रोख वितरणासाठी केला जात होता.

एटीएम चा वापर ह्या 7 कामांसाठीही करु शकता

सध्या अनेकजण आपल्या पाकिटात रोख रक्कम बाळगण्यापेक्षा एटीएम कार्ड ठेवणे पसंद करतात. कारण एटीएम कार्डचा वापर आता फक्त बँकेमधून पैसे काढण्यासाठी किंवा बँक खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी नाहीत तर इतर हि कारणासाठी केला जातो. चला पाहूया अजून कोणत्या कारणासाठी एटीएम उपयोगी आहे.

 1. वैयक्तिक कर्ज (Personal Loan) : हल्ली अनेक बँका आपल्या खातेदारांना एटीएम मधून पैसे काढल्यानंतर वैयक्तिक कर्ज संदर्भात विचारणा करतात म्हणजेच ATM Screen वर विशेष Offers उपलब्ध करतात. गरज असल्यास खातेदार त्यावर क्लिक करून सहजरित्या वैयक्तिक कर्ज मिळवू शकतो. विशेष म्हणजे कर्जाचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागत नाही, ते एटीएम मधूनच काढू शकता.
 2. मुदत ठेव (Fixed Deposit / FD) : अनेकांना आपले पैसे बँकेत ठेवणे जास्त सुरक्षित वाटते त्यामुळे मुदत ठेवी करून ठेवतात आणि त्यातून व्याज मिळवतात. त्यासाठीच बँक आपल्या खातेदारांना Fixed Deposit करण्यासाठी एटीएम मशीन वर देखील सुविधा देते. एटीएम च्या स्क्रीन वरून योग्य पर्याय निवडून आणि पाहिजे त्या काळासाठी Fixed Deposit करू शकतात.
 3. बँकेत पैसे भरणे : अनेक बँक आता आपल्या ग्राहकांना पैसे खात्यात जमा करण्यासाठी एटीएम सेंटर वरच Cash Deposit मशीन उपलब्ध करून देतात. ज्यामुळे ग्राहकाला एका वेळी आपल्या खात्यामध्ये 49 हजार 900 रुपये भरता येणे शक्य आहे. Cash Deposit मशीन मधून 50 रुपयाच्या नोटीपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा भरण्याची परवानगी असते.
 4. विम्याचे हफ्ते भरणे : LIC, HDFC Life, SBI Life इत्यादी विमा कंपन्यांकडून विमा काढता येतो. याशिवाय विम्याचा दर महिन्याचा हफ्ता भारण्यासाठी बँकेत किंवा Insurance Office मध्ये जावे पण लागत नाही. एटीएम मधूनच Bill Pay पर्याय निवडून Insurance Policy चे पैसे भरता येऊ शकते.
 5. बील भरणा : बँक आपल्या ग्राहकांना त्यांचे वीजेचे, गॅसचे बील, टेलेफोन बील, मोबाईल बील एटीएम सेंटर मधून काही सेकंदात भरण्याची व्यवस्था करून देतात. त्यामुळे ग्राहकांचा अशी बील भारण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ आणि मेहनत वाचते.
 6. Income Tax भरणा : अनेक बँका ग्राहकांना एटीएम द्वारे Income Tax जमा करण्याचे पर्याय उपलब्ध करून देतात परंतु अनेकांना ह्याबाबत माहिती नसते. तसेच अँडवान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट, रेग्युलर असेसमेंट टॅक्स एटीएम द्वारे भरता येतात. पण त्यासाठी काही अटी आहेत त्या तुम्ही तुमच्या बँक कडून जाणून घ्या.
 7. पैसे पाठवणे (Money Transfer) : हल्ली एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी पेटीएम, गुगल पे, फोन पे अशा Apps चा वापर केला जातो. परंतु ह्या Apps ची मदत घेण्याऐवजी एटीएम ची मदत घेतली तर ग्राहकाला एका वेळी 40 हजार रुपय पर्यंत ट्रान्सफर करता येतात. तसेच मोबाईल अँप्स द्वारे फसगत देखील होण्याची शक्यता जास्त असते.

Marathi News Live 

ATM चे प्रकार (Types ऑफ ATM)

चला तर आता पाहूया एटीएम चे किती प्रकार आहेत.

ऑनलाईन एटीएम : ह्या प्रकारचे एटीएम हे बँकेच्या डेटाबेस server सोबत इंटरनेट ने 24 तास जोडलेले असतात. खातेदार आपल्या खात्यामध्ये जेवढी रक्कम शिल्लक असेल त्यापेक्षा अधिक काढू शकत नाही.

ऑफलाईन एटीएम : हे एटीएम बँकेच्या डेटाबेस server सोबत इंटरनेट ने जोडलेले नसतात. इतकेच काय तुमच्या खात्यामध्ये शिल्लक रक्कम नसताना देखील तुम्ही ह्या एटीएम मधून पैसे काढू शकता पण त्यासाठी बँक तुम्हाला दंड आकारू शकते.

ऑन साइट एटीएम : बँक परिसरात असलेल्या एटीएम ला ऑन साइट एटीएम म्हणून ओळखले जाते.

ऑफ साइट एटीएम : बँक परिसर व्यतिरिक्त विविध ठिकाणी असणाऱ्या एटीएम ला ऑफ साइट म्हणून ओळखले जाते.

Yellow Label एटीएम : Yellow Label एटीएम, E-Commerce reasons च्या वापरासाठी उपलब्ध केले जातात.

White Label एटीएम : नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्याद्वारे (Non-Banking Financial Companies) स्थापित केल्या गेलेल्या एटीएम ह्या प्रकारात मोडतात.

Brown Label एटीएम : ह्या प्रकारच्या एटीएमचे हार्डवेयर आणि एटीएम मशीनच्या पट्ट्यावर एका Service Provider ची Ownership असते, परंतु Banking Network च्या साठी Cash Management आणि Connectivity एका बँकेद्वारे उपलब्ध करून दिली जाते.

Green Label एटीएम : हे एटीएम कृषि क्षेत्रातील व्यवहारासाठी उपलब्ध करून दिले जाते.

Pink Label एटीएम : ह्या प्रकारचे एटीएम फक्त महिलांसाठी उपलब्ध करून दिले जाते.

Orange Label एटीएम : हे एटीएम Share Transaction च्या वापरासाठी उपलब्ध करून दिले जाते.

एटीएम काम कसे करते

एटीएमबद्दल महत्वाची (Important) / स्वारस्यपूर्ण तथ्ये (Interesting Facts about ATM)

ATM बद्दलची पुढील माहिती तुम्हाला माहिती नसेल.

एटीएमचा शोधकर्ता (Inventor of एटीएम) : जॉन शेफर्ड बॅरन (John Shepherd Barron)

एटीएम पिन क्रमांक (एटीएम Pin Number) : जॉन शेफर्ड बॅरॉनने एटीएमसाठी 6 अंकी पिन क्रमांक ठेवण्याचा विचार केला, परंतु पत्नीला 6 अंकी पिन लक्षात ठेवणे सोपे नव्हते म्हणून त्याने 4 अंकी ATP  पिन क्रमांक तयार करण्याचे ठरविले.

जगातील पहिले फ्लोटिंग एटीएम (World’s first floating एटीएम) : State Bank of India (Kerala).

भारतातील पहिले एटीएम (First एटीएम in India) : 1987 मध्ये HSBC (Hongkong and Shanghai Banking Corporation) यांनी स्थापित केले.

जगातील पहिले एटीएम (First एटीएम in the World) : 27 जून 1967 रोजी Barclays Bank of London लंडन येथे स्थापित केले गेले.

एटीएम वापरणारी पहिली व्यक्ती (First Person to use एटीएम) : प्रसिद्ध विनोदी अभिनेता रेग वर्नी (Reg Varney) एटीएममधून रोकड काढून घेणारी पहिली व्यक्ती होती.

अकाउंट शिवाय एटीएम (एटीएम without an Account) : एक युरोपियन देश असलेल्या रोमानियामध्ये बँक खाते नसताना एटीएम मधून पैसे काढता येतात.

बायोमेट्रिक एटीएम : बायोमेट्रिक एटीएम ब्राझीलमध्ये वापरला जातो. नावाप्रमाणेच, पैसे काढण्यापूर्वी वापरकर्त्याने या एटीएमवर आपली बोटं स्कॅन करणे आवश्यक आहे.

जगातील सर्वोच्च जागे वरील एटीएम (World’s Highest एटीएम) :  हे नाथू-ला (Nathu-La) मध्ये मुख्यतः सैन्याच्या व्यक्तींसाठी स्थापित केले गेले आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 14,300 फूट उंच असून Union Bank of India चालवते.

तुम्ही काय शिकला 

मला आशा आहे कि, तुम्ही ह्या पोस्ट मधून एटीएम FullForm काय आहे हे नक्की समजले असेल आणि माहिती आवडली असेल. आम्ही प्रयत्न करतो कि आमच्या readers ला एटीएम full form in Hindi / एटीएम Full Form विषयी पूर्ण माहिती उपलब्ध करून द्यावी जेणे करून तुम्हाला दुसऱ्या कोणत्या Website किंवा Internet वर article शोधात बसायला नको.

त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि एकाच ठिकाणी तुम्हाला एटीएम विषयी सर्व information मिळेल. तुमच्याकडे काही माहिती आहे आणि तिचा समावेश ह्या article मध्ये करावा असे वाटत असेल तर आम्हाला comments करून सांगू शकता.