Categories
Entertainment

Bigg Boss 14 नाही थांबणार, एक ट्विस्ट सोबत सलमान खान करणार मोठी घोषणा

साडेचार महिने चाललेला सर्वात विवादास्पद रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 13 (Bigg Boss 13) कार्यक्रमात शोचा सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला या हंगामाचा विजेता म्हणून घोषित झाला, तर सिद्धार्थशी मैत्री आणि दुश्मनी असलेले असिम रियाज उपविजेता झाला. ‘पंजाबची कतरिना कैफ’ शहनाज गिल अव्वल 3 मध्ये स्थान मिळवू शकली होती.

Bigg Boss

सिद्धार्थला ट्रॉफीसह 50 लाख रुपयांच्या बक्षिसे देण्यात आले होते. सिद्धार्थला सोशल मीडियामध्ये मिळालेला पाठिंबा आणि सेलिब्रिटींच्या पाठिंब्यामुळे एक विजेता म्हणून पहिले जात होते, तर असिम रियाझच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला देखील विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते.

रिएलिटी शो बिग बॉस. बिग बॉस 14 (Bigg Boss 14) च्या पुढील सीझनबद्दल जोरदार चर्चा चालू आहे. कधी सोशल मीडियावर (Social Media) या पुढच्या सीजनच्या थीम बद्दल अंदाज बांधला जातो तर कधी या शोचे संभाव्य स्पर्धक चर्चेत येतात.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीमुळे बिग बॉस -14 काही काळासाठी थांबवावे लागू शकते, परंतु आता अशी माहिती समोर येते आहे ती बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही.

असे म्हटले जात आहे की सलमान खान (Salman Khan) लवकरच बिग बॉस 14 बद्दल मोठी घोषणा करू शकेल, परंतु या घोषणेत एक ट्विस्ट आहे.

वास्तविक, सलमान खान आजकाल तो पनवेल मधील आपल्या फार्म हाऊसमध्ये वेळ घालवत आहे आणि लॉकडाऊनमध्येही सवलत मिळाली आहे.

अनलॉक -1 मध्ये जिथे टीव्ही इंडस्ट्रीचे काम हळूहळू ट्रॅककडे परतत असताना बिग बॉसचे निर्मातेही त्यांच्या शोची तयारी करत आहेत. सलमान खान देखील या शो ला दिलेल्या वचनबद्धतेस पूर्णपणे समर्पित आहे.

पीपिंग मून यांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की सलमान खान आपल्या पनवेल फार्महाऊस मधून बिग बॉस 14 ची घोषणा करू शकतो. सलमान आणि क्रिएटिव टीम यांच्यात चर्चा चालू आहे.

या रिपोर्टमध्ये असेही सांगितले जात आहे की ऑक्टोबर मध्ये या शोचा प्रीमियर होऊ शकेल. त्याच बरोबर सलमान खानने या हंगामात निर्मात्यांना ‘सोशल डिस्टर्निंग’ची विशेष काळजी घेण्यावर भर दिला आहे.

असा अंदाज आहे की बिग बॉस -14 च्या थीम मध्येही काही बदल केले जाऊ शकतात. त्याचबरोबर हे पाहावे लागेल की सलमान बिग बॉस 14 बद्दल किती काळात आणि कशा प्रकारे घोषणा करणार आहे.

तुम्हाला आठवण करून देतो की, शोच्या स्पर्धकांबद्दल अनेक प्रकारचे कयास पहिल्या पासून लावण्यात येत आहेत. ‘हमरी बहू सिल्क’ जान खान आणि ‘तुझसे है राब्ता’ फेम शगुन पांडे आणि पारस छाब्राची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी अशा अनेक सेलेब्सची नावे समोर आली आहेत.

तथापि, शोच्या मेकर्स आणि चॅनेल्सकडून याबद्दल अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.