आज आपण माहिती करून घेणार आहोत बॉलीवूड सिनेअभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) बद्दलच्या 30 मनोरंजक गोष्टी:
डिंपल कपाडिया चा जन्म 8 जून 1957 रोजी झाला, तिचे वडील चुनीभाई कपाडिया यांच्या घरी झाला. ते एक अतिशय श्रीमंत व्यक्ती होते, ते आपल्या ‘समुद्र महाल’ ह्या घरा मध्ये बऱ्याचदा चित्रपटातील कलाकारांना पार्ट्या देत असत. असे म्हटले जाते की अशा एका पार्टीमध्ये चित्रपट निर्माते राज कपूरने 13 वर्षीय डिंपल हिला पहिले आणि डिंपल राज कपूर यांच्या चांगलीच लक्षात राहिली.
राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा महत्वाकांक्षी चित्रपट जेव्हा सिनेमाघरात काहीच यश मिळवू शकला नाही, तेव्हा त्यांनी नवीन कलाकारांसह चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला मुलगा ऋषी कपूर ला ‘बॉबी’ च्या माध्यमातून लाँच केले आणि 16 वर्षांची डिंपल नायिका म्हणून निवडली.
ज्यावेळी बॉबी सिनेमा आला तेव्हा एक अफवा खूप पसरली होती कि, डिंपल हि राज कपूर आणि नर्गिस ह्याची मुलगी आहे.
बॉबी (1973) च्या रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वी डिंपलची भेट त्यावेळचा सुपरस्टार राजेश खन्ना सोबत झाली. राजेश खन्ना डिंपल सोबत अचानक चांदण्या रात्री समुद्र किनारी घेऊन गेले आणि त्यांनी अचानक डिंपल समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. राजेश खन्ना वर आधीच मोहित झालेली डिंपल त्यावेळी फक्त 16 वर्षांची होती आणि तिला काहीच समजत नव्हते. तिला ते सर्वच स्वप्नासारखे भासत होते तिने लगेच होकार दिला.
राजेश खन्ना हा डिंपल पेक्षा सुमारे 15 वर्षांनी मोठा होता.
राजेश खन्ना आणि डिंपलच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. दोघांच्या लग्नावर एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आणि देशभरातील चित्रपटगृहां मध्ये दाखवली गेली.
डिंपल कपाडिया हि राजेश खन्नाची चाहती होती आणि शाळा बुडवून ती काकांचे चित्रपट बघायची.
असे बोलले जाते की, ‘बॉबी’ सिनेमा बनत असताना डिंपल आणि ऋषी कपूर एकमेकांकडे आकर्षित झाले होते, परंतु डिंपलने अचानक राजेश खन्ना सोबत लग्न केले.
डिंपलचा ‘बॉबी’ चित्रपट राजेश सोबत लग्ना झाल्या नंतर रिलीज झाला होता आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले होते. डिंपल रात्रीतून सुपरस्टार झाली होती, तरुण मुलं डिंपलचे दिवाने झाले होते.
लग्न केलेल्या डिंपलला ‘बॉबी’ इतके मोठे यश मिळवेल अशी अपेक्षा नव्हती पण तो पर्यंत तिचे लग्न झाले होते. लग्ना नंतर ती चित्रपटांमध्ये काम करणार नाही अशी अट तिच्या पती राजेश खन्नाने ठेवली होती. ‘बॉबी’ च्या यशा नंतर डिंपलला काम करायचं होतं, कदाचित ह्या कारणावरूनच दोघांमध्ये कलह होण्यास सुरु झाली असावी.
‘बॉबी’ चित्रपटाच्या वेळी डिंपल अभिनय कसे करतात हे माहीत नव्हते, त्यावेळी राज कपूर ने तिची खूप मदत केली होती.
डिंपलला बॉबी चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता.
राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यातील मतभेद झाल्याच्या बातम्या त्या काळात चित्रपट मासिकांमध्ये मुख्य बातम्या बनत असत. एकदा डिम्पलने आपल्या दोन मुली ट्विंकल आणि रिंकी समवेत राजेशचे घर सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तेव्हा तिने केवळ राज कपूरच्या बोलण्यावर आपला निर्णय बदली केला होता.
जेव्हा पाणी डोक्यावरून गेले त्यावेळी डिंपलने राजेश खन्नाचे घर सोडले. डिंपलला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची गर्दी होऊ लागली.
बॉम्बीच्या 11 वर्षांनंतर डिंपलचा दुसरा चित्रपट ‘जख्मी शेर’ 1984 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये डिंपलचा नायक होता जीतेंद्र जो राजेश खन्नाचा खास मित्र होता.
तिने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा डिंपलने प्रथम रमेश सिप्पीच्या ‘सागर’ वर साइन केला होता.
बॉलिवूडच्या इतिहासातील डिंपलला सर्वात सुंदर नायिका मानली जाते. एका प्रसिद्ध मासिकाने तिला मधुबालानंतर बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये दुसरे स्थान दिले होते.
डिंपलने ‘सागर’, ‘जांबाज’, ‘जख्मी औरत’ सारख्या चित्रपटांमध्ये खूप बिंदास दृश्य दिले, जी त्यावेळी एक मोठी गोष्ट मानली जात होती.
‘जांबाज’साठी अनिल कपूर सोबत तिला एक उत्तेजक सिन करायचा होता. अनिल कपूरच्या शरीरावर बरेच केस पाहून डिंपलने त्याला केस कापणाऱ्या कडे घेऊन जायला सांगितले होते. अनिल कपूरला तिचे असे बोलणे खूप लागले होते.
एका बाजूला डिंपल ‘बंटवारा’ सारख्या चित्रपटात धर्मेंद्रची नायिका होती, तर दुसरीकडे धर्मेंद्रचा मुलगा सनी देओल सोबत अर्जुन, मंजिल मंजिल सारख्या चित्रपटात त्याची नायिका होती.
विभक्त झाल्यानंतर डिंपल आणि राजेश खन्ना यांच्यातील कटुता कमी झाली. जेव्हा राजेश खन्ना यांनी लोकसभा निवडणूक लढविली, तेव्हा डिंपल यांनी राजेश खन्ना साठी प्रचार केला होता.
राजेश खन्ना यांनी ‘जय शिव शंकर’ नावाच्या चित्रपटात डिंपलची नायिका म्हणून निवड केली परंतु हा चित्रपट अपूर्णच राहिला.
कमर्शियल चित्रपटांमध्ये चांगले रोल न भेटल्याने डिंपलने समांतर चित्रपटात प्रवेश केला. दृष्टी, लेकिन, रुदाली यासारख्या चित्रपटात तिने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना चकित केले.
डिंपलला रुदालीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार (1993) मिळाला.
तिला बॉबी (1973), सागर (1985), रुदाली (1993) आणि क्रांतिवीर (1994) साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
डिंपलची जोडी सनी देओल आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत चांगलीच गाजली.
सनी आणि डिंपलच्या जवळीकबद्दल बरीच चर्चा झाली. या दोघांनीही कधीही त्यांचे नात जाहीरपणे स्वीकारले नाही.
डिंपल मेणबत्त्या डिझाईन करायची आणि तिच्या डिझाइन केलेल्या मेणबत्त्या अत्यंत महागड्या किंमतीत विकल्या गेल्या आहेत.
कारकीर्दीच्या शिखरावर असताना डिंपल खूपच मुडी स्वभावाची होती. यामुळे अनेक निर्माते-दिग्दर्शक नाराज झाले, त्यामध्ये फिरोज खान सारखे दिग्गज देखील होते.
काही चित्रपट दिग्दर्शकांचा अस मानणं आहे की डिंपलच्या कारकीर्दीत तिची सुंदरता देखील एक अडथळा होती ज्यामुळे तिला बर्याच भूमिकांना नकार दिला गेला.