Gulabo Sitabo Movie Review: कोरोना काळातील सिनेमाघर लॉकआउट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता यांच्यादरम्यान, शूजित सरकार-दिग्दर्शित गुलाबो सिताबो 200 देशांमध्ये 15 भाषांच्या सबटाइटल्स सोबत प्रदर्शित झाला आहे.
गुलाबो सिताबो सिनेमागृहात प्रदर्शित न होता थेट मोबाईल फोन वर प्रदर्शित होत आहे म्हणून लक्षात राहील. अमिताभ बच्चन यांनी उत्कृष्ट काम केले असले तरी त्यांच्या उत्तम चित्रपटांच्या यादीत हि भूमिका समाविष्ट होणार नाही.
घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील ‘टॉम आणि जेरी’ भांडणाच्या कथा गाव गावात ऐकायला मिळतात. शुजितसाठी ‘विकी डोनर’ ते ‘ऑक्टोबर’ पर्यंत कथा लिखाण करणारी जूही चतुर्वेदी हिने ह्याच नात्याला केंद्रस्थानी ठेवून ‘गुलाबो सिताबो’ लिहिली आहे.
Gulabo Sitabo Movie Review
कलाकार : अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना, विजय राज, फारुख जफर
निर्देशक : शूजित सरकार
मूवी टाइप : कॉमिडी
रेटिंग : 3.5 / 5
Gulabo Sitabo Movie Review – कथा
सिनेमाची कथा आहे 78 वर्षीय लालची, भाडघोर, कंजूस आणि चिडचिड्या स्वभावाच्या मिर्जा ची, सर्व कथा हि त्याच्याच आजूबाजूला फिरते. मिर्जा चा जीव हा 100 वर्ष जुनाट जर्जर झालेल्या हवेली मध्ये आहे. हवेली मिर्जाची बायको फातिमा बेगम (फारुख जाफर) हिची खानदानी संपत्ती आहे, त्यासाठी त्या हवेलीचे नाव फातिमा महल आहे. मिर्जा लालची नाही तर चलाख देखील आहे, जो पैशांसाठी हवेली मधील जुन्या वस्तू चोरून विकत असतो. तो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आपली पत्नी फातिमाच्या मरणाची वाट बघत असतो, म्हणजे तिच्या मरणा नंतर तो ह्या हवेलीच्या मलिक होऊ शकेल.
त्या हवेलीमध्ये अनेक वर्षांपासूनचे नाममात्र 30-70 रुपये भाड्याने राहणार जुने भाडेकरू आहेत, त्यामध्ये एक बांके रस्तोगी आहे. बांके हवेलीमध्ये आपल्या आई आणि तीन बहिणीनं सोबत राहतो. तो सहावी पर्यंत शिकला आहे आणि चक्कीचे दुकान चालवतो, तो एका मुलीवर प्रेम करतो जी त्याच्यावर लग्नाकरण्याठी दबाव टाकत आहे.
मिर्जा बांकेला जरा सुद्धा आवडत नाही, त्याला त्रास देण्यासाठी नवीन नवीन युक्त्या शोधत असतो आणि त्याला हवेली मधून काढून टाकू इच्छितो. बांकेकडे भाड्याचे पैसे न देण्याचा नेहमी एक बहाणा असतो तो म्हणजे ‘मी गरीब आहे’. लेखिका जूही चतुर्वेदी हिने खूप मोठा भाग ह्यादोघांच्या भांडणावर खर्च केला आहे. थोड्यावेळाने त्यांची भांडणे कंटाळा आणतात, कथा कुठेच जात नाही असे वाटे.
तेव्हा अचानक कथेमध्ये एक वळण आणि गती येते, एकीकडे मिर्जा एका वकील सोबत भेटून बिल्डरला हवेली विकण्याची तयारी करतो. तर दुसरी तिकडे बांके एलआईजी फ्लैट च्या लोभसाठी आर्कियोलॉजी विभागमध्ये असलेल्या एका अधिकाऱ्याला भेटतो आणि हवेली जुनी असल्याने पुरातत्व विभागाला देण्याच्या तयारीत करतो.
परंतु बेगमचा एक मास्टर स्ट्रोक मिर्ज़ा आणि बांके यांच्या योजनांवर पाणी टाकते आणि ज्या हवेलीसाठी ते एकमेकांचे शत्रू झाले होते त्या हवेली मधून दोघांना बाहेर जावे लागते.
गुलाबो सिताबोच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळेल की जीवनात एखाद्या गोष्टीची इच्छा ठेवणे योग्य आहे पण त्याचा लोभ ठेवणे तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जात नाही मग कुणाचेही हृदय असो,घर असो किंवा राजवाडा.
Gulabo Sitabo Movie Review – अभिनय
अमिताभ बच्चन यांना मिर्झा बनवण्यासाठी कृत्रिम मेकअप करून एक मोठे नाक लावले आहे. सैल कुर्ता आणि पायजामा परिधान केले आहेत. डोक्याला गोल टोपी आणि डोळ्यांना जाड लेन्सचे चष्मा आहेत. 78 वर्षीय मिर्झाच्या भूमिकेसाठी अमिताभ कमरेतून खाली वाकून चालतो, त्याच्या आवाजा साबोत प्रयोग केला गेला आहे.
शतकातील महान नायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभसाठी अशी व्यक्तिरेखा साकारणे हे आव्हानात्मक नव्हते. आव्हान तर लेखक आणि दिग्दर्शक यांच्यासमोर असते. शुजित या वेळी हे आव्हान योग्य प्रकारे हाताळू शकला नाही. परिपूर्ण गेटअप, मेक-अप आणि अचूक शारीरिक हावभाव असूनही मिर्झाचे पात्र ‘पीकू’ च्या भास्कर बॅनर्जी यांच्यासारखे गुदगुल्या करणारे नाही. Gulabo Sitabo Movie Review
तर, निम्न मध्यमवर्गीय कुटूंबाची भूमिका साकारण्यासाठी आयुष्मान खुरानाने घाणेरडे कपडे परिधान केले आहेत. थोडेसे पोट आलेले दाखवले आहे. आयुष्माननेही त्यांचे उच्चारण बदलले आहे. तो त्याच्या व्यक्तिमत्त्वात अगदी नैसर्गिक आहे. आयुष्मानची कलाकारी चांगली झाली आहे अनेक दृश्य त्याने उत्तम सांभाळून घेतले आहे. सहाय्यक कलाकारांपैकी सृष्टि श्रावास्तव, विजय राज़ आणि बृजेंद्र काला हे आपापल्या पात्रात उत्तम बसतात.
Gulabo Sitabo Movie Review – चित्रपट कसा आहे:
‘पीकू’ मध्ये अमिताभ बच्चन आणि ‘विकी डोनर’ मध्ये आयुष्मान खुराना यांना वेगवेगळे दिग्दर्शित केलेले शूजित ‘गुलाबो सिताबो’ मध्ये डगमलें आहे. दोन्ही अभिनेते सोबत असूनही हा चित्रपट ‘विकी डोनर’ आणि ‘पीकू’ पेक्षा खूपच कमकुवत आहे.
‘गुलाबो सीताबो’ च्या शेवटच्या भागात असे दाखवले आहे कि, मिर्जा हवेली मधील एका जुन्या खुर्चीला अडीचशे रुपयांमध्ये विकून टाकतो जी शो रूम मध्ये 1 लाख 35 हज़ार रुपयेचे लेबल लावून विकायला ठेवली आहे.
चित्रपटाचा संदेश स्पष्ट आहे, हक्कदार तोच बनतो जो ज्याला वस्तूच्या किमतीची माहिती असते. चित्रपट संपल्यावर एक गोष्ट लक्षात येते कि, अमिताभ सुद्धा त्या ‘एंटीक खुर्ची’ सारखा आहे, जो अमूल्य आहे आणि शूजित सरकार हा मिर्जा सारखा आहे ज्याला त्या खुर्चीला कमी किमतीला विकून टाकतो.
Gulabo Sitabo Movie Review – का पहावा
अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांची बॉन्डिंग पहिल्यांदा एकत्र दिसली आहे. याशिवाय एखाद्या छोट्या गावातल्या मजेदार कथेचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही चित्रपट बघायलाच हवा.
Tags : Gulabo Sitabo Movie Review, Amazon Prime, Amitabh bachchan, Ayushmann Khurrana, Gulabo Sitabo, Gulabo Sitabo Movie Review, gulabo sitabo full movie watch online, gulabo sitabo movie review, gulabo sitabo release date, Gulabo Sitabo Review, gulabo sitabo review in marathi, gulabo sitabo trailer, Shoojit Sircar, Vijay Raaz, गुलाबो सिताबो, गुलाबो सिताबो रिव्यू, Gulabo Sitabo Movie Review,