Categories
Biography

विराट कोहली माहिती

विराट कोहली माहिती: विराट कोहली हा भारत कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. आजच्या घडीला उजव्या हाताने फलंदाजी करणारा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो.

विराट कोहली माहिती

कोहली इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर्फे खेळतो. जेव्हा पासून तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे तेव्हा पासून त्याची फलंदाजी अजून चांगली होत चालली आहे.

विराट कोहलीने दिल्लीतील विविध वयोगटासाठी आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्ली संघातर्फे खेळल्यानंतर, विराट कोहली 2008 मध्ये मलेशिया येथे झालेल्या 19 वर्षा खालील क्रिकेट वल्डकपच्या भारतीय संघाचा कर्णधार होता.

त्यानंतर ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंके विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले.

विराट कोहली माहिती

राखीव खेळाडू म्हणून सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीने थोड्याच दिवसात भारतीय संघात मधल्या फळीत एक महत्वाचे स्थान मिळवले. 2011 च्या क्रिकेट वल्डकपसाठीच्या भारतीय संघात महत्वपूर्ण स्थान मिळवले होते, त्याच संघाने विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता.

विराटने 2011 साली वेस्ट इंडिज विरुद्ध किंगस्टन मध्ये खेळताना कसोटी संघात पदार्पण केले. लवकरच त्याने कसोटी मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध शतक ठोकले त्यामुळे त्यांच्या वर तो फक्त “एकदिवसीय विशेषज्ञ” आहे असा शिक्का पुसला गेला.

बघता बघता त्याने आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकवर स्थान मिळवले. 20 साली झालेल्या T-20 क्रिकेट वल्डकपमध्ये मालिकावीर होण्याचा मान मिळवला होता आणि T-20 क्रिकेट मध्ये हि त्याचे वर्चस्व सिद्ध केले.

पुढे आयसीसी T-20 क्रिकेट क्रमावीत अव्व्ल स्थान मिळवले. 2016 सालच्या T-20 क्रिकेट वल्डकपमध्ये विराटच्या कामगिरीमुळे पुन्हा मालिकावीर हा पुरस्कार दिला गेला.

विराट कोहली

कोहलीची 2012 मध्ये उपकर्णधार म्हणून भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघा मध्ये नियुक्ती केली गेली.

विराट ने अनेकदा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणून जबाबदारी पार पडली त्यामुळे 2014 साली महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर विराट कोहलीची भारतीय क्रिकेट संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली.

विराट कोहली

विराटच्या नावावर एकदिवसीय क्रिकेट मध्ये बऱ्याच विक्रमांची नोंद झाली आहे. सर्वात जलद शतक, सर्वात जलद 5000 धावा आणि सर्वात जलद 10 शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.

सलग चार कॅलेंडर वर्षांमध्ये दरवर्षी किमान 1000 धावा करणारा विराट जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.

विराट कोहली

आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये 2015 साली सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज झाला.

विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराटने धावांचा पाऊस पाडतो म्हणून त्याला क्रिकेट विशेषज्ञ ”विराट द रन मशीन” म्हणून बोलतात.

विराट कोहली

विराट कोहलीने आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. 2012 सालच्या आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तसेच बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा 2011-12 आणि 2014-15 चा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.

भारतीय क्रिकेट मधल्या त्याच्या कामगिरीसाठी भारत सरकारने अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे. विराट कोहलीने बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत 11 डिसेंबर 2017 ला विवाह केला.

विराट कोहली चे बालपण

विराट कोहली

प्रेम कोहली आणि सरोज कोहली ह्यांच्या घरी 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्लीतील उत्तम नगर येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात विराट चा जन्म झाला. विराटचे वडील व्यवसायाने एक वकील होते तर आई गृहिणी होत्या.

विराटला विकास नावाचा मोठा भाऊ तर भावना नावाची मोठी बहीण देखील आहे. विराटचे कुटुंब असे सांगते कि, विराट हा 3 वर्षाचा असल्यापासून आपल्या वडिलांसोबत क्रिकेट खेळायचा, तो बॅट उचलून फिरायचा आणि वडिलांना गोलंदाजी करायला लावायचा.

विराट कोहली

2006 सालच्या 18 डिसेंबरला विराटच्या वडिलांचे निधन झाले, त्यापूर्वी ते मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यात होते.

आपल्या पूर्वायुष्यातील गोष्टींबद्दल बोलताना सांगतो की, “आयुष्यात खूप काही पाहिलं आहे, वडिलांचे निधन लवकर झाले आणि कौटुंबिक व्यापार चांगला चालत नव्हता, शिवाय भाड्याच्या घरात राहत होतो, कुटुंबासाठी कठीण वेळ आली होती हे सर्वच मनामध्ये घर करून राहील आहे.”

त्याच्या लहानपणी वडिलांकडून क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा मिळाला, ते खूप मोठे आधार होते, ते नेहमी सोबत सरावासाठी घेऊन जात, अजून देखील त्यांच्या सहवासाची आठवण येते.

विराट कोहलीचे शिक्षण 

उत्तम नगर मध्येच विराट मोठा झाला आहे, त्याचे शालेय शिक्षण विशाल भरती पब्लिक स्कूलमध्ये झाले. पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची 1998 साली स्थापना झाली आणि त्यावेळी विराट 9 वर्षाचा होता. विराट अकादमीच्या पहिल्या तुकडीचा सदस्य होता.

गल्ली क्रिकेटमध्ये विराटचा वेळ वाया न घालवता त्याला एका व्यावसायिक कल्वमध्ये टाकवे, असे शेजारच्या काही मंडळींनी विराटच्या वडिलांना सुचवले.

शेजाऱ्यांचा सल्ला ऐकून विराटला अकादमीमध्ये टाकले गेले, त्यावेळी राजकुमार शर्मा यांच्याकडून विराटने क्रिकेटचे धडे घेतले, त्यांनीच विराट ला चिकू हे टोपण नाव दिले होते.

विराट कोहली

सुमित डोग्रा ह्या नोयडा जवळच्या अकादमी मधून देखील त्याने सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या सरावासाठी मदत मिळावी म्हणून विराट नववीमध्ये असताना त्याने दिल्लीच्या पश्चिम विहार मधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला होता.

विराट खेळ सोबतच अभ्यासातही हुशार होता, त्याचे शिक्षक त्याला “तेजस्वी आणि हुशार” समजत असत.

विराट कोहलीची कारकीर्द

विराटने देशांतर्गत क्रिकेट मध्ये बरीच चांगली कामगिरी केली आहे. त्याने देशांतर्गत विविध स्पर्धाना मध्ये उत्तम कामगिरी केली त्याच्या मुळेच तो 2002 साली अंडर 15 क्रिकेट स्पर्धेत तो खेळला आहे, पुढे 2006 साली त्याची अंडर 17 संघात निवड झाली.

विराट कोहली

दिवसंदिवस विराटची कामगिरी चांगली होत होती, लवकरच विराटची निवड 2008 सालच्या अंडर 19 संघात झाली, अंडर 18 वल्डकप स्पर्धा मलेशिया मध्ये झाली त्यामध्ये विराटने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

त्याच्या खेळामुळे त्याला भारतीय एकदिवसीय आंतरराष्टीय संघात स्थान मिळवून दिले.

विराट कोहली

2011 सालच्या वल्डकपसाठी विराटची निवड करण्यात आली. वल्डकपच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट ने शतक बनवले होते, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय असा मान त्याला भेटला.

भारताने त्यावर्षी तो वल्डकप जिंकला होता. 2011 मधल्या होणाऱ्या कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आले होते. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिली कसोटी खेळली होती.

विराट कोहली

विराट कोहलीने 2014 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना 4 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतक ठोकले होते, त्यांच्या मदतीने त्या मालिकेमध्ये 692 धावा केल्या होत्या.

ह्या मालिकेमध्येच महेंद्रसिंग धोनीने आपली आंतरराष्टीय कसोटी मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती, त्याचा नंतर कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराटची निवड करण्यात आली.

विराट कोहली

पुढे 2017 उजाडताच महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय आणि T-20 मधील कर्णधार पदाचा राजीनामा दिला असल्याने विराटची त्याच्या जागी कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.

जेव्हा पासून त्याला कर्णधार केले आहे तेव्हा पासून त्याच्या खेळामध्ये अजून सुधारणा केल्याचे दिसून येते, शिवाय पूर्वी पेक्षा जास्त जबाबदारीने तो सामना खेळतो आणि संघाला जिंकण्यासाठी जीवपणाला लावतो.

विराट कोहली ने आता पर्यंत 86 कसोटी सामन्यांमध्ये 7240 धाव केल्या आहेत, त्यामध्ये 27 शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे, नाबाद 254 हि त्याची कसोटी मधील सर्वोच धावा आहे.

तसेच 248 एकदिवसीय सामने खेळला आहे, त्यामध्ये 11867 धाव, 43 शतक आणि 58 अर्धशतक केले आहेत, 183 सर्वोच धाव केल्या आहेत.

याशिवाय T-20 सामानाची विराटची कारकीर्द पाहिली तर त्याने 82 सामन्यांमध्ये 2794 धाव केल्या आहेत, त्यामध्ये 24 अर्धशतक केले आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 177 सामने खेळत त्याने 5412 धावा केल्या आहेत, 5 शतक, 36 अर्धशतक केले आहेत.

विराट कोहलीच्या खेळाची शैली

खेळाच्या शैली बद्दल बोलायचं झाले तर तो नैसर्गिकरित्या मजबूत तांत्रिक कौशल्याचा एक आक्रमक फलंदाज आहे.

विराट बहुतेक वेळा मधल्या फळीमध्ये फलंदाजी करतो, तर कधी कधी डावाची सुरुवात देखील करतो. संघाची जशी गरज आहे त्याप्रमाणे तो स्वतःचा फलंदाजी क्रम बदलत असतो.

तो फलंदाजी करताना छाती पुढे काढलेल्या पावित्र्यात आणि आपल्या खालच्या हाताची पकड मजबूत करून फलंदाजी करतो, शिवाय त्याच्या पायाची हालचालसुद्धा खूप चपळपणे करतो.

फलंदाजी करताना त्याची फटक्यांची विविधता उत्तम असते, जशी गरज आहे त्याप्रमाणे तो धावांची गती वाढवू शकतो. दबावाखाली फलंदाजी करताना तो सर्वोत्तम खेळाडू आहे.

मिड विकेट आणि कव्हर क्षेत्रात त्याचे उत्तम सामर्थ्य आहे, कव्हर ड्राइव्ह हा त्याचा आवडता फटका आहे, त्याला फिल्कचा फटका नैसर्गिकरित्या येतो.

फलंदाजी शिवाय तो क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम करतो. त्याचा आत्मविश्वास, बांधिलकी, एकाग्रता आणि नीतितत्त्वे ह्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतात.

विराट कोहलीच्या शैलीमुळे त्याची तुलना सचिन तेंडुलकर सोबत केली जाते, अनके माजी क्रिकेटपटूंना अशी अपेक्षा आहे कि विराट सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडू शकतो.

विराट कोहली मैदानात खूप आक्रमक असा वाटतो, अनेक प्रसार माध्यमांनी तर त्याला उतावीळ आणि उद्दाम देखील बोलले आहे. तो अनेकदा प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत, पंचाशी वाद करताना दिसतो.

त्यामुळे त्याला टीका सुद्धा सहन कराव्या लागतात. तर काही माजी खेळाडू त्याच्या ह्या आक्रमकतेचा चाहते आहेत ते त्याला पाठिंबा देतात.

विराट कोहली नमूद करतो कि, तो त्याच्या आक्रमकतेला आवर घालण्याचा प्रयत्न करतो आहे, पण खेळातील ताण आणि काही प्रसंगी त्या भावनांना आवर घालणे अवघड जाते. विराट सांगतो कि तो कपिल शर्मा शो चा चाहता आहे, त्याला तो शो खूप आवडतो.

विराट कोहली ने केलेले विक्रम व कामगिरी

 1. भारतीय फलंदाजांमधील सर्वात जलद शतक (52 चेंडूंत)
 2. सर्वात जलद 1000, 4000, 5000, 6000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय
 3. 7000 सर्वात जलद एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज
 4. सर्वात जलद 10 एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज
 5. 15 व 20 सर्वात जलद एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज
 6. सर्वात जलद 25 एकदिवसीय शतके करणारा फलंदाज.
 7. सर्वात जलद 1000 आंतरराष्ट्रीय T-20 धावा पूर्ण करणारा फलंदाज

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा

 1. 2010 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय
 2. 2011 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा.
 3. 2012, 2013, 2014 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.
 4. 2012, 2015, 2016 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.
 5. एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (973)
विराट कोहलीची कर्णधार म्हणून विक्रम
 1. एक कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके ठोकणारा पहिला क्रिकेटपटू.
 2. परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार.
 3. दोन किंवा अधिक द्विशतके करणारा पहिला भारतीय कसोटी कर्णधार.
 4. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा कर्णधार.
 5. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार

विराट कोहलीला मिळालेले पुरस्कार

विराट कोहलीने त्याच्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीत खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळेच तो आज ह्या शिखरावर पोहचला आहे. क्रिकेट मधील त्याचा योगदानासाठी त्याला अनेक पुरस्कार देण्यात आहे आहे.

 • 2012 साली पिपल चॉइस अवॉर्ड फॉर फेवरेट क्रिकेटर
 • 2012 साली आईसीसी ओडीआई प्लेयर ऑफ द ईयर अवॉर्ड

 • 2013 साली भारत सरकार तर्फे अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट
 • 2013 मध्ये सीमा सुरक्षा दलाने ब्रॅण्ड अँबेसेडर म्हणून घोषित केले

 • 2017 साली सीएनएन- आईबीएन इंडियन ऑफ द ईयर
 • 2017 साली भारत सरकार तर्फे पद्मश्री अवॉर्ड

 • 2018 साली सर गर्फीएल्ड सोबर्स ट्रॉफी ने विराट कोहली ला सन्मानित करण्यात आलं.

वैयक्तिक आयुष्य

तसे तर विराटचे नाव अनेक अभिनेत्रीनं सोबत घेतले गेले, एकदा तर इंग्लंड महिला क्रिकेट संघाची एक खेळाडू हिने विराट ला ट्विटरद्वारे प्रपोझ केले होते.

परंतु बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत त्याची मैत्री आणि प्रेम खूप जास्त होते असे बोलावे लागेल. ती सुद्धा त्याला भेटायला, त्याचे सामने बघायला परदेशात देखील जात होती. प्रसारमाध्यमांनी तर खूप प्रसिद्धी दिली होती त्यांचा नात्याला.

विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये इटली मध्ये धुमधडाक्यामध्ये काही मोजक्याच पाहुण्यांच्या साक्षीने लग्न सोहळा पार पडला. एक आदर्श पतिपत्नी म्हणून सुखाचा संसार करत आहेत.

दोघेही आप आपल्या कार्यक्षेत्रांत यश मिळवत आहे. प्रसारमाध्यम त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा चाहत्यांपर्यंत पोहचवत आहेत.

व्यावसायिक गुंतवणूक

विराटच्या बोलण्यानुसार फुटबॉल हा त्याचा क्रिकेट नंतर आवडता खेळ आहे. विराट २०१४ साली इंडियन सुपर लीगच्या क्लब एफसी गोवाचा सह-मालक झाला.

त्याला स्वतःला फुटबॉल मध्ये उत्सुकता आहे आणि त्याच असं मत आहे कि भारतामध्ये हा खेळ वाढीस लागावा त्यासाठी त्याने हि गुंतवणूक केली आहे.

शिवाय तो भविष्यातील एक व्यावसायिक उपक्रम म्हणून पाहतो, क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर काय करायचे ह्या दृष्टीने तो पर्याय खुले ठेवतोय.

WROGN नावाच्या फॅशन ब्रँड मध्ये गुंतवणूक केली आहे, ते पुरुषांचे कॅज्युअल कपडे बनवतात. याशिवाय मायंत्रा, शॉपर्स स्टॉप यांच्याशी देखील हातमिळवणी केली आहे.

विराटने देशभरात व्यायामशाळा आणि स्वस्थ केंद्राची साखळी सुरु करण्यासाठी गुंतवणूक केली आहे,

विराट कोहली फाउंडेशन

विराटने मार्च 2013 मध्ये “विराट कोहली फाउंडेशन ” नावाने एक गरिबांना मदत करणारी संस्था चालू केली, जी वंचित मुलांना मदत करते तसेच त्यासाठी पैसे गोळा करणे.

विराटच्या मध्ये त्याची संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत काम करते. त्याचं मुख्य हेतू मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे हा आहे. जमा झालेल्या निधीतून गरजू मुलांचे शिक्षण आणि आरोग्य ह्यासाठी सेवा केली जाते.