सरोज खान आता आपल्यामध्ये नाही, पण असे नाही की नेहमी नाचत आणि हसतमुख चेहऱ्याच्यामागे कोणते दुःख, कसला राग, कोणती समस्या नसेल राहिली. सरोज खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक आयुष्यही चढउतारांनी भरलेले होते. सरोज खान थोड्या कडक स्वभावाच्या होत्या, त्यामुळे बऱ्याचदा त्या वादात अडकत असे.
चला तर सुरवात करूया त्यांचा वैयक्तिक जीवनातील घटनांपासून, जेव्हा त्यांना मूले झाल्यावर समजले कि त्यांचा नवरा हा विवाहित असून त्याला चार मुले देखील आहेत.
वयाच्या 13 व्या वर्षी लग्न केले
सरोज खानचे खरे नाव निर्मला नागपाल होते आणि त्यांनी फक्त 13 वर्षांची असताना आपले गुरू बी सोहनलालशी लग्न केले. या लग्नासाठी सरोजने इस्लाम धर्म स्वीकारला होता. बी सोहनलाल सरोजपेक्षा 30 वर्षांनी मोठे होते आणि त्याचे हे दुसरे लग्न होते. सोहनलालचे आधीच लग्न झाले होते हि माहिती सरोजला मुल झाल्यावर मिळाली. त्याचवेळी सोहनलाल यांनी मुलांना आपले नाव देण्यास नकार दिला, त्यानंतर दोघे वेगळे झाले. पुढे सोहनलालपासून वेगळे झाल्यानंतर सरोजने सरदार रोशन खानशी लग्न केले.
2016 मध्ये सलमान खान त्यांना टाळत असल्याचा आरोप केला होता.
एकदा सरोज खान यांना एका पेशंटचे बोलणे सलमान खान सोबत करून देण्याची इच्छा होती. त्यावेळी त्याच्या एका साथीदाराने सलमानला कॉल केला आणि सांगितले की मास्टरजी बोलू इच्छित आहे परंतु सलमानने त्याचा फोन घेण्यास नकार दिला. सरोजने म्हटले होते की ही खूप वाईट प्रवृत्ती आहे, सलमान त्यांना ओळखतो, त्यांनी बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे पण अशा प्रकारचे वागणे म्हणजे आपला अपमान केल्या सारखे आहे. गेल्या वर्षी सलमानने सरोजची भेट घेतली आणि तिच्याबरोबर चित्रपट करण्याचे आश्वासन दिले होते.
शाहरुखला मारली होती चापट
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा शाहरुख खान एकामागून एक तीन शिफ्टमध्ये काम करत होता, तेव्हा सतत काम केल्यामुळे तो थकला होता. एके दिवशी त्याने सरोजला सांगितले – सरोज जी, हे खूप काम आहे, मी थकलो आहे. मग सरोज खानने त्याला एक चापट मारत खूप प्रेमाने एक सल्ला दिला होता कि, कधी हे नको बोलू कि खूप काम आहे ह्या क्षेत्रात कधीही काम जास्त नसते.
तम्मा तम्माच्या रीमिक्समुळे नाराज होत्या सरोज
2017 मध्ये बद्रीनाथ की दुल्हनियाच्या रिलीजच्या वेळीसुद्धा तम्मा तम्मा या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन करूनही माधुरी दीक्षित ऐवढे महत्व त्यांना दिले गेले नाही. सरोज म्हणाली होती – कदाचित मास्टर जी म्हातारे आहेत, परंतु माधुरी नाही. म्हणून त्याने माधुरीला फोन केला. तथापि, वरुणने नंतर सांगितले की मी याबद्दल माफी मागण्यास तयार आहे. त्याच घटनेबद्दल सरोज खान म्हणाली होती – मी त्या लोकांना काय बोलावे? त्यांनी असा विचार केला असेल की जेव्हा माझी सहाय्यक माधुरी तिथे आहे तेव्हा त्यांना माझी गरज वाटली नसेल.
हॉलिवूड प्रोजेक्टही केला होता
2016 मध्ये एका मुलाखतीत सरोज खानने सांगितले की ती एक हॉलिवूड चित्रपट करत आहे. डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार सरोजने म्हटले होते – चित्रपटाचे नाव नाही. पण तीन लोकांची कथा आहे जे गांधी यांची हत्या होणार हे माहीत होते. सरोज यांनी हे एनएन कॉलेज मुंबई कार्यक्रमादरम्यान सांगितले. परंतु, या चित्रपटाचे किती काम झाले, ते कळले नाही. दरम्यान, दिग्दर्शनाकडे जाण्याच्या प्रश्नावर ती म्हणाले की जेव्हा माझे नृत्यदिग्दर्शन काम कमी होईल तेव्हा मी दिग्दर्शन करीन.
गणेश आचार्य यांनी कट रचण्याचे आरोप केले
जानेवारी 2020 मध्ये गणेश आचार्यने सरोज खान वर त्याच्या विरुद्ध कट रचण्याचा आणि इंडस्ट्री मध्ये भ्रष्टाचार करण्याचा आरोप केला होता. हे आरोप त्याने तेव्हा केले होते जेव्हा एका दुसऱ्या महिलेने गणेश वर कामाच्या बदल्यात प्रौढ व्हिडिओ पाहण्यास सांगितले. त्या महिलेने गणेश विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार केली होती. तेव्हा गणेश ने सांगितले होते कि – सरोज खान आणि त्यांचे सहकारी इंडस्ट्रीमध्ये भ्रष्टाचार करत आहेत. हे सर्व प्रकरण सिने डान्सर्स असोसिएशनमध्ये सरोज खानच्या आगमनाने आणखी चिघळले.
फराह खानच्या फिल्ममध्ये मिमिक्री केली होती
2014 मध्ये फराह खान हॅपी न्यू इयर फिल्म मध्ये किकू शारदा कोरिओग्राफर फिरोज खानच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर सरोज खान यांनी त्यावर आक्षेप घेत त्याला आपला अपमान म्हटले होते. तथापि, जेव्हा किकू यांना याबाबत विचारणा केली गेली तेव्हा ते म्हणाले- सरोज जी ही संस्था आहे, आम्ही त्यांचा कधीही अपमान करणार नाही. ती फक्त नृत्य शिक्षकाची भूमिका होती. जे मी बर्याच वर्षांपासून टीव्हीवर करत आहे.
कास्टिंग काउच वर धक्कादायक विधान केले
Yeh ladki ke upar hai ki tum kya karna chahti ho. Tum uske haath mein nahi aana chahti ho toh nahi aaogi. Tumhare paas art hai toh tum kyun bechoge apne aap ko? Film industry ko kuch mat kehna, woh humaara mai-baap hai: Saroj Khan on Casting Couch. pic.twitter.com/kYpPAPWMtB
— ANI (@ANI) April 24, 2018
2018 मध्ये, सरोज खानने कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक विधान केले. एएनआयच्या पत्रकार परिषदेत सरोज म्हणाली होती – बाबा आदमच्या काळापासून हे चालत आले आहे. प्रत्येक मुलीवर कोणी ना कोणी हाथ साथ करण्याचा प्रयत्न करतो. सरकारी लोक पण हे करतात. तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या मागे कशाला लागत ते कमीत कमी जेवण तर देतात, बलात्कार करून सोडत तर नाही. हे मुलींवर अवलंबून आहे कि त्यांना काय करायचे आहे. जर तुम्हाला त्यांच्या ताब्यात नाही जायचे तर नका जाऊ, तुमच्याकडे जर कला असेल तर तुम्ही कशाला विकाल स्वतःला. फिल्म इंडस्ट्रीला काहीही बोलू नका ती आमची मायबाप आहे.