Categories
Uncategorized

ऐकावे ते नवलच! एका कुत्र्यामुळे झाले होते दोन देशांमध्ये युद्ध

जगाच्या इतिहासात अनेक युद्ध झाली आणि त्याची प्रत्येकाची कारण देखील वेगवेगळी होती. युद्ध कशी सत्तेसाठी, कधी आपल्या सीमा विस्तारासाठी, कधी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, अशी एक ना अनेक करणे सापडतील.

 परंतु आज आम्ही तुम्हाला एक अशा युद्धा बद्दल सांगत आहोत ते ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही आणि तुम्ही विचार करण्यास लागलं. हि एक सत्य घटना आहे, जगाच्या पाठीवर अशी पण दोन देश आहेत ज्यांनी हे युद्ध अगदी शुल्लक कारणा वरून चालू झाले आणि एक विचित्र इतिहास करून गेले. हे दोन देश आहेत युरोपातील.

हि घटना आहे १९२५ मधील आणि ते देश आहेत ग्रीस (यूनान) आणि बुल्गारिया. ह्या दोन्ही देशात तेव्हा तणावाची परिस्थिती होती आणि ह्या दोन देशात एक दिवस अचानक युद्ध सुरु झाले त्यामागे कारण होता एक कुत्रा.

ग्रीसमधील एक कुत्रा चुकीने आपली सीमा पार करून मैसेडोनियाच्या सीमेत प्रवेश करतो म्हणजेच बुल्गारिया देशात प्रवेश करतो त्याच्या मागे ग्रीस देशाचा एक सैनिक जो त्या कुत्र्याचा मालक आहे तो देखील सीमा पार करून प्रवेश करतो.

मैसेडोनिया सीमा सुरक्षेची जबाबदारी हि बुल्गारियाच्या सैनिकांवर होती, त्याचं निदर्शनात आले कि ग्रीसचा सैनिक हा सीमा पार करून त्यांचा सीमेत आला आहे तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता त्याचावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली आणि त्याची त्यामध्ये हत्या झाली.

नेमका ह्या घटनेचा परिणाम असा झाला कि, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला पुढे राजकीय तणाव आणि सैनिकाच्या हत्येने नाराज असेलेल्या ग्रीसच्या सैन्याने बुल्गारिया देशा वर हल्ला करण्यास सुरूवात केली.

१८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत ग्रीस आणि बुल्गारिया ह्या दोन्ही देशात युद्ध चालू होते, त्यामध्ये ५० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. बुल्गारियाने हे युद्ध जिंकले होते परंतु दोन्ही देशात एक समजोता करण्यात आला.

समजोता असा झाला कि, युद्धामध्ये बुल्गारियाचे नुकसान झाले त्याची भरपाई ग्रीस ने करून द्यावी. ग्रीसने दंड आणि नुकसान भरपाई म्हणून बुल्गारियाला ४५ हजार पौंड म्हणजे जवळपास ४३ लाख रूपये इतक रक्कम दिली.

ह्या युद्धाला पेट्रिक घटना म्हणून ओळखले जाते, दोन देशात युद्ध झाले आणि लोकांनां आपला जीव गमवावा लागला तो देखील एक कुत्र्यामुळे हे म्हणजे मूर्खपणाचे युद्ध बोलावे.

पण ह्याच मूर्खपणाच्या करणामुळे हे युद्ध अनेकांच्या लक्षात राहिले, आशा करूया भविष्यात असे मूर्ख पुन्हा कोणी बनू नये.