कडक शिस्त, रुबाबदार देहयष्टो व कर्तव्यदक्षपणामुळे महाराष्ट्र पोलीस खात्याची प्रतिमा जगभरात झळकवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत सन्मान घेतले जाणारे नाव म्हणजे आयपीएस कृष्णप्रकाश (ips krishna prakash) नावातच ‘प्रकाश’ असल्याने त्यांनी पोलीस खातेही उजळवले अन् गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. सध्या आयपीएस कृष्णप्रकाश हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पदी विराजमान असून त्यांनी स्थानिक पातळीवरील गुंडगिरी व टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी सक्षमपणे निर्णय घेतले. गुन्हे घडला म्हणजे पोलीस अयशस्वी ठरले, असे मध्यंतरीच्या काळात पाहावयास मिळाले.
मात्र आयपीएस कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गुन्ह्याची उकल करून पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात शहर पोलिसांनी यशस्वी ठरले आहेत. आयपीएस कृष्णप्रकाश यांची महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण कामगिरी लक्षात घेता एकादे पुस्तक लिहिता येईल. मात्र दिवाळी अंकात शब्दांना मर्याद असल्याने अगदी मोजक्याच शब्दात कृष्णप्रकाश यांची कर्तव्याची माहिती या लेखातून संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे.
१९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्रकृ पोलीस खात्यातील शायर मनाचे व्यक्तीमत्व, पोलीस खात्यातील प्रत्येकाला कुटुंबातील सदस्य समजून अधिकान्यांपासून अंमलदारांपर्यंत प्रत्येकाला प्रेमळ वागणूक देणारे, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व पिंपरी-चिंचवड पोलीस आयर्नमॅन लाभले. दलाला व शहरवासीयांना लाभले. कर्तव्याशी एकनिष्ठ अन् लोकसेवेला प्राध्यान देणे, अशी प्रतिमा असल्याने पिंपरी-चिंचवड गुन्हेगारीमुक्त करण्याचा कृष्णप्रकाश यांनी सतत प्रयत्न केला आहे.
पोलीस कुटुंबातील प्रेमळ उच्च अधिकारी यापलीकडे कृष्णप्रकाश यांची उत्तम खेळाडू अशी ओळख आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणान्या फ्रान्समधील आयर्नर्मन ट्रायथलों न’ स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी बाजी मारली. ४ किमी स्विमींग, १८६ किमी सायकलिंग, ४२ किमी रनिंग या विविध क्रीडा प्रकारांची स्पर्धा अवघ्या १ कृष्णप्रकाश हे पोलीस दलातील पहिले अधिकारी ठरले. या स्पर्धद्वारे कृष्णप्रकाश यांच्या नावाची पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद झाली. कृष्णप्रकाश यांची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणा ठरल्याने त्यानंतर पोलीस खात्याला आणखी आयर्नमॅन लाभले.
कृष्णप्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी मोडित काढण्यास सुरुवात केली. पेंडिंग गुन्ह्यांच्या तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांचा तात्काळ छडा लावण्यास सुरुवात केली. तसेच गुन्हेगारांना तडिपार करण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखालो परिमंडळ २ च्या हद्दीतील पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या १२ गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले. एवढेच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांच्या मूळ प्रवृत्तीवर घाव घालणे गरजेचे आहे.
मुळात गुन्हेगारी प्रवृत्ती संपली तरच गुन्हेगारी आपोआप संपुष्टात येईल. पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप आणि पोलिसांच्या विविध उपक्रमांद्वारे पोलीस आणि डॉक्टर, समुपदेशक, समाजसेवक, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक यांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच व्हिलेज डिफेन्स पार्टी ही संकल्पना मुंबई पोलिसांच्या मॅन्युअलमध्ये आहे. सदर संकल्पना पिंपरी-चिंचवड शहरात राबवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेऊ न पिंपरी-चिंचवड शहराची नवी ओळख निर्माण करण्यात आली.
वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कृष्णप्रकाश यांच्या कामगिरीची नोंद : पंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नावाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. त्यांनी सन २०१७ साली झालेल्या जगातली आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या ‘आर्यनमॅन ट्रायथलॉन रेस’ या स्पर्धेत बाजी मारली. ही कौतुकास्पद कामगिरी करणारे भारतातील पहिलेच पोलीस अधिकारी असल्याचा मान आयपीएस कृष्णप्रकाश यांनी मिळवला. फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धेत आयपीएस कृष्णप्रकाश यांनी लोहपुरुषाचा किताब पटकावला आहे. या स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी ३.८६ किलोमीटर पोहणे, ४२ किलोमीटर धावणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग हे अवघ्या १४ तास ८ मिनिटात पूर्ण केले. या कार्यबद्दल त्यांना आयर्न मॅन किताब प्रदान करण्यात आला. या सर्वच कामगिरीची दखल वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडनमध्ये नमूद करण्यात आली आहे. आयपीएस – आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी आहेत. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्र यांच्या हस्ते कृष्णप्रकाश यांना प्रमाणपत्र प्रदान केले. ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील संतोष शुक्ला आदींनी कृष्णप्रकाश यांना प्रमाणपत्र दिले.