Chankya niti : साप आणि दुष्ट माणूस दोघांमध्ये कोणाला निवडाल? चाणक्य काय सांगतात.

Chankya niti जर तुम्हाला साप आणि दुष्ट माणूस या दोन्हीमध्ये एकला निवडा अस सांगितले तर तुम्ही कोणाला निवडाल. आता यामध्ये कोणी साप निवडेल तर कोणी म्हणेल सापापेक्ष्या दुष्ट माणूस बरा.या दोन्ही मध्ये कोणाला निवडायला पाहिजे आणि त्याच कारण काय. यावर आचार्य चाणक्य यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे की या दोन्हीमध्ये कोणाला निवडलेल योग्य राहील. 

आचार्य चाणक्य म्हणतात साप आणि दुष्ट माणसामद्धे तुम्ही सापाला निवडले पाहिजे कारण साप वेळ आली तरच चावेल पण वाईट माणसा पासून तुम्हाला प्रतेक क्षणाला त्रास होणार. 

Chankya niti  चाणक्य यांनी स्पष्ट भाषेत सांगितले आहे की दुष्ट माणूस सापा पेक्ष्या जास्त हानिकारक आहे. साप तुम्हाला कधी चावतो जर का सापाला तुमच्याकडून धोका वाटला तर साप तुम्हाला चावतो किंवा तुमचा सापावर पाय पडला तर साप तुम्हाला चावतो.यांच्या वेगळा दुष्ट माणसाचा स्वभाव तुम्हाला प्रतेक क्षणाला दुख देतो.दुष्ट माणसामुळे तुम्ही अडचणीत येता तसेच तुमच्या जीवनात नको असलेल्या विपरीत घटना घडतात. 

वाईट स्वभावाच्या दुष्ट माणसापासून कधीही लांब राहिले पाहिजे. अश्या प्रकारची माणसे दोन पायावर चालत असले तरी ती जनावर समान असतात.त्यांना जनावरची उपमा देन म्हणजे जनावरांचा सुद्धा अपमान केल्यासारखे आहे.

 वाईट स्वभावाची माणसे काट्यासारखी असतात.आपल्या जर का अंगात काटा मोडला तर तो काटा आपल्याला वेदना देतो.वाईट माणसे पण अशीच असतात आपल्याला नकळत ती आपल्या दुखाच कारण बनतात.