Site icon Marathi News

laxman hake on jarange patil: बारामतीचा आदेश म्हणून जरांगे पाटील यांचा रणांगणतून पळ-लक्ष्मण हाके

laxman hake

laxman hake on jarange patil जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. पत्रकारांशी बोलताना हाके म्हणाले हेच जरांगे पाटील एका जातीची भाषा बोलून कोणालातरी संपवतो असे म्हणत होते.130 आमदारांचा सुपडा साफ करणार असे बोलत होते.

 

laxman hake on jarange patil मग आता जरांगे पाटालानी पळ काढायला नको होता. रणांगनामध्ये आमणे सामने लढायला पाहिजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून नेत्याना शिव्या दिल्या. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीच्या आदेशावरून महाविकास आघाडीचा प्रचार केला. ठराविक उमेदवारांचा प्रचार केला.

 

laxman hake on jarange patil आणि ओबीसी च्या उमेदवारांना असं पाडा अस पाडा की यांच्या सात पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत. जरांगेनची ही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फायद्याची होती.पण आता महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला आहे हे लक्ष्यात आले म्हणून आपली धूळधाण होऊ नये म्हणू रात्री बारामतीतून जरांगेना आदेश गेला आणि त्यांनी रणांगणतून पळ काढला.बारामतीच्या स्क्रिप्ट नुसार जरांगे बोलत आणि वागत आहेत असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला.

 

Jarange patil जरांगे पाटील यांनी बदललेली भूमिका

काल जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन एक महत्वाचा निर्णय घेतला.यामध्ये त्यांनी 25 जागांवर मराठा उमेदवार निवडणूक लढवणार असे सांगितले.आणखी काही मतदार संघात उमेदवार द्यायचे का नाही यावर रात्रीत निर्णय होईल असे सांगितले.आणि ज्या ठिकाणी उमेदवार देणार नाही तीथे पाडा पाडी करणार असल्याचे सांगितले.

 

हे निर्णय घेण्याच्या अगोदर मराठा,मुस्लिम, आणि बौद्ध समीकरण जुळल्याच सुद्धा जरांजे पाटील यांनी सांगितले काही जागेवर मराठा आणि काही जागांवर इतर दोन समाजाचे उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.आणि ज्या ठिकाणी उमेदवार देणार नाही तिथे पाडापाडी करण्याचा निर्णय घेतला होता.

 

Manoj jarange patil आज सकाळी जरांगे पाटील यांनी सर्वात वेगळी भूमिका घेतली. त्यांनी सर्व मराठा उमेदवार यांना अर्ज मागे घ्यायला सांगितले. तसेच ह्याला पाडा आणि त्याला पाडा अशी भूमिका माझी नाही असे त्यांनी सांगितले. म्हणजे जरांगे पाटील यांनी जे दोन निर्णय घेतले होते

1) 25  जागांवर मराठा उमेदवार निवडणूक लढवणार .

2) ज्या ठिकाणी उमेदवार देणार नाही तीथे पाडा पाडी करणार . 

या दोन्ही निर्णयांना फिरकी मारणारी भूमिका जरांगे पाटील घेतली आणि निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले.

या निवडणुकीत जरांगे पाटील नेमक काय करणार – पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे यांनी सांगितले की जरांगे फॅक्टर लई काय करणार निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो काय आणि बाहेर राहिलो काय कसा बी खेळ खल्लास करणार. सुट्टी कोणालाच देणार नाही. एक जातीवर धाडस करणे आणि निवडणुकीला सामोरे जाणे योग्य नाही म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

 

Exit mobile version