HomeसंतवाणीSant Tukaram: देव अंगात कसा येतो ? संत तुकाराम महाराज यांनी १६ व्या शतकात सांगितलय. Sant Tukaram: देव अंगात कसा येतो ? संत तुकाराम महाराज यांनी १६ व्या शतकात सांगितलय. 10/31/202410/31/2024Marathi news sant tukaram maharaj Sant Tukaram आज आपल्याला संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या एका अभंगात सांगितलेल्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत.त्यामधून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे मिळतात जसे की देव अंगात येतो का?देव आहे का?देव अंगात येऊन कोणत्या मागण्या करतो ?खरा देव कोणता आणि खोटा देव कोणता?अंगात येणारा देव खरा की खोटा ?देव कोणाच्या अंगात येतो ?Sant Tukaram जर आपण बघितल तर देव अश्या माणसाच्या अंगात येतो जो खोटरडा आहे,अज्ञानी आहे,ढोंगी आहे. एवढंच काय दहा दहा दिवस अंघोळ करत नसेल अश्या माणसाच्या अंगात देव येतो. जी बाई अडाणी आहे, साधे दात घासत नसेल अश्या बाई च्या अंगात देवी येते.खर पाहिल तर देवाने अंगात कोणाच्या यायला पाहिजे ज्यांनी देवाची आयुष्यभर भक्ति केली चांगल जगण्याचा उपदेश केला अश्या संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकाराम असतील आणखी दुसरे संत यांच्या अंगात देवाने यायला पाहिजे पण या संतांच्या अंगात देव आले आले असं तुम्ही ऐकल च नसेल. कधी संतांच्या अंगात देव आलेच नाहीत. आणि कधी कोणते संत म्हणले नाहीत की माझ्या अंगात देव येतो. मग अंगात येणारे देव आणि ज्यांच्या अंगात देव येतो यांच्या विषयी संत तुकाराम महाराजांनी १६ व्या शतकात लिहून ठेवलय. आपण फक्त संतांचे चमत्कार ऐकत बसलो जे की आपले संत कधीही म्हणले नाहीत आम्ही चमत्कार केले. आपल्याला चमत्कार लोकांनी सांगितले म्हणून आता तरी आपल्याला आपल्या संतांनी काय लिहून ठेवलंय ते वाचन गरजेचे आहे. Sant Tukaram संत तुकाराम महाराज अंधश्रद्धे वर किती परखड पने बोललेत आणि देव अंगात येतो या गोष्टीचे खंडन केले आहे ती अभंगाची चरणे आपण पाहू सेंदरी हेंदरी दैवते | कोण ती पुजी भूतेकेते |आपल्या पोटा जी रडते | मागती शिते अवदान ||आपुले इच्छे आणिका पिडी | काय ते देइनल बराडी | कळो ही आली तयाची जोडी |अल्प रोकडी बुद्धी अधरा ||विलेपने बुजविति तोंड |भार खोल वाहाती उदंड |करवती आपणया दंड | ऐसियास भांड म्हणे देव तो ||या चरणामद्धे संत तुकाराम महाराज म्हणतात सेंदुर फासलेली ही दैवते आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जे मुक्या प्राण्यांचा बळी दे म्हणतात,मुक्या प्राण्यांना त्रास देतात. ते आपल्या भक्तांना कसे बरे करणार त्यांच्या पासून काय लाभ मिळणार. ही ओभड दोभड सेंदुर फासलेली दगड जे अंगात येतात ते देव नसून भूतखेते आहेत. असे देव खोटरडे आहेत आहेत आणि जो यांची पूजा करतो तो ढोंगी आणि अज्ञानी आहे.म्हणजे देव अंगात येणे , मुक्या प्राण्यांचा बळी देणे ,अश्या प्रकारच्या गोष्टींचे संत तुकाराम महाराज यांनी खंडन केले आहे . थोडक्यात काय अंगात येणारा आणि मुक्या प्राण्यांचा बळी मागणारा देव खोटा आहे. मग खरा देव कसा ओळखायचा हे पण संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगाच्या चरणात सांगतात. तैसा नव्हे नारायण | जगव्यापक जनार्दन |तुका म्हणे त्याचे करा चिंतन | वंदू चरण येती सकळे ||या चरणात संत तुकाराम महाराज सांगतात माझा ईश्वर असा नाही. ज्याने हे विश्व निर्माण केले तो तुम्हाला काही सुद्धा मागत नाही. तुमच्याकडून कश्याचीही अपेक्ष्या करत नाही. अश्या देवाला आपण देव मानले पाहिजे आणि त्याचे नामचिंतन आणि भजन केले पाहिजे. असे आहेत आपले संत जे चांगल्या मार्गावर चालण्याचा उपदेश करतात. आपण फक्त त्यांचे चमत्कार ऐकत बसलो. त्यांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचने गरजेचे आहे. Post Views: 84 Share this:FacebookWhatsAppLike this:Like Loading... Related