MARATHI STORY raja vikramaditya : राजा विक्रमादित्य यांच्या दरबारात घडलेली गोष्ट.

raja vikramaditya marathi story.

 

Marathi story raja vikramaditya राजा विक्रमादित्य यांच्या दरबारात घडलेली ही गोष्ट आहे. महाकाव्य मेघदूत ज्यांनी लिहिले ते कवि कालिदास हे तुम्हाला माहीतच असतील.

राजा विक्रमादित्य कालिदास यांना एकदा दरबारात विचारतात मन आणि बुद्धी सारखे तुमचे शरीर नाही. म्हणजे तुमच्या मनाला आणि बुद्धीला जसे तेज आहे त्याची जसे सगळे प्रशंसा करतात तसे तूचे शरीर नाही म्हणजे तुम्ही दिसायला तेवढे चांगले नाहीत.

Marathi story raja vikramaditya कालिदास लगेच एक शिपायाला बोलावून घेतात. त्याला सांगतात उध्या दरबारात येताना दोन भांड्यात पानी घेऊन ये. एक मातीच्या भांड्यात आणि दुसरे सोन्याच्या भांड्यात. सांगितल्या प्रमाणे तो शिपाई दुसऱ्या दिवशी सोन्याच्या आणि मातीच्या भांड्यात पानी घेऊन येतो.

मग कालिदास राजा विक्रमादित्य यांना विचारतात तुम्हाला कोणत्या भांड्यातील पानी प्यायचे आहे. विक्रमादित्य म्हणतात मातीच्या भांड्यातील पानी प्यायचे आहे. कारण बाहेर ऊन आहे आणि मीच काय दरबारात कोणाला जरी विचारले तरी तो मातीच्या भाड्यातील च पानी प्यायचा म्हणेल.कालिदास लगेच राजाला म्हणतात मग तुमच्या कालच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिले आहे. राजा विक्रमादित्य यांच्या लगेच ही गोष्ट लक्ष्यात येते.

Marathi story raja vikramaditya ज्या प्रमाणे पाण्याचे शीतल असणे त्याच्या भांड्याच्या सुंदरतेवर ठरवू शकत नाही त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी चे सौन्दर्य आपण शरीराच्या सुंदरतेवर मोजू नाही शकत. यावर आपण एक गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे कोणत्याही व्यक्तीच्या दिसण्यावरून त्याच्या मन बुद्धी तो चांगला वाईट याचा अंदाज लावू शकत नाही.