आजच्या बेडकाच्या गोष्टीतून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जी बेडके आहेत ती लक्ष्यात येतील.तर ती गोष्ट अशी आहे
Inspirational Stories एका राजाने एक सरोवर बांधलेले असते.सरोवराच्या मध्ये एक धातूचा खांब असतो. आणि तो एकदम मऊ असतो.त्या सरोवरात खूप सारी बेडके असतात.मग टी बेडके एक स्पर्धा ठेवतात. ती अशी की जो सर्वात आधी त्या खांबाच्या शेवटच्या टोकाला पोहोचनार तो जिंकणार.
आजूबाजूचे पण काही बेडके या स्पर्धेत भाग घेतात. ज्यावेळी सगळे त्या खांबाजवळ पोहोचतात तेंव्हा सगळी बेडके म्हणतात या खांबावर चढणे शक्यच नाही कारण हा खांब मऊ आहे. यावर चढायला गेलो तर आपण घसरणार. कोणीच या खांबावर चढू शकत नाही. आणि एवढ्या वरी कसा पोहोचणार.या स्पर्धेत कोणीच जिंकू शकत नाही.
Inspirational Stories अर्धे तर बाजूला जाऊन बसतात. काही जन स्पर्धेत भाग घेऊन खांबावर चढू लागतात. बाकीचे बाजूला बसलेले ओरडत राहतात कोणीच नाही चढू शकणार हे शक्य नाही. ती बेडके घसरून पडली की हसतात. बराच वेळ हे चालूच राहत. त्यात बेडके घसरायची पडायची पुनः वरी चढण्याचा प्रयत्न करायची बाजूला बसलेले मोठ्याने ओरडायचे कोणीच चढू शकणार नाही. थोड्या वेळात सगळे थकतात आणि बाजूला येऊन बसतात.
पण एका लहान बेडकाचे प्रयत्न चालूच असतात. तो बेडूक शंभर वेळ घसरून पडतो पण पुनः वरी चढण्याचा प्रयत्न करतो. सगळे त्याला ओरडून सांगत असतात राहू दे नाहीस चढू शकणार. परंतु तो प्रयत्न चालूच ठेवतो आणि एक वेळ अशी येते तो खांबाच्या टोकाला पोहोचतो आणि जिंकतो.
Inspirational Stories सगळे त्याला विचारतात तू हे कसं केलस पण तो काहीच बोलत नाही.मग एक बेडूक पळत येतो आणि म्हणतो अरे त्याला ऐकू येत नाही तो बहिरा आहे. ऐकू नाही आले तर तो तुम्हाला बोलेल कसा.
आली का गोष्ट लक्ष्यात तो बहिरा होता म्हणून त्याने ‘खांबावर चढणे शक्य नाही’ हे ऐकू आल नाही. ते ऐकलं नाही म्हणून त्याने आपले प्रयत्न सोडले नाही आणि विजयी झाला.
Inspirational Stories आता तुमच्या लक्ष्यात आले असेल की आम्ही कश्या बद्दल बोलतोय. आपल्या आजूबाजूला पण अश्या प्रकारची नकारात्मक बेडके असतात.जेंव्हा आपण काही तरी वेगळ करायच म्हणतो तेंव्हा ही बेडके आपल्याला नकारात्मक बनवतात. पण आपण त्यांच न ऐकता काम चालू ठेवल आणि आपण यशस्वी झालो तर हे कस केलस म्हणून विचारणारे आणि जयजयकार करणारी पण हीच बेडके असतात.