swami vivekanand: swami vivekananad story |मोकार ज्ञान पाजळणाऱ्या लोकांसाठी स्वामी विवेकानंद यांची ही गोष्ट|

swami vivekanand story

आम्ही तुम्हाला अगोदर स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग सांगतो आणि नंतर स्वामी विवेकानंद आणि मोकार ज्ञान पाजळणाऱ्या लोकांमधला फरक तुमच्या लक्ष्यात येईल. 

 

swami vivekanand स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात घडलेला हा प्रसंग आहे.ज्या गोष्टीने स्वामी विवेकानंद पण विचारात पडले होते की आता काय करायचे पण शेवटी स्वामी विवेकानंद यांनी या प्रसंगात काय केलेले आहे ते वाचून तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल अभिमान वाटेल आणि त्यांचा तुम्ही आणखी जास्त आदर कराल एवढ नक्की. 

 

तर तो प्रसंग असा आहे की, एक आई तिच्या मुलाला घेऊन स्वामी विवेकानंद यांच्याकडे येते .आई तिच्या मुलाला स्वामी विवेकानंद यांच्या समोर उभा करते. विवेकानंद त्या दोघांकडे पाहतात. लगेच मुलाची आई विवेकानंद यांना सांगते की हा माझा मुलगा गोड पदार्थ जास्त खातो.आम्ही आई वडील दोघे त्याला सांगून खूप कंटाळलो पण तो आमच ऐकत नाही.तो प्रमानाच्या बाहेर गोड खातो. सर्वात जास्त गूळ खातो.आम्हाला त्याची काळजी वाटते. हा तुमच ऐकेल म्हणून तुमच्या कडे याला घेऊन आले आहे. आता तुम्हीच याला समजून सांगा. 

 

swami vivekanand स्वामी विवेकानंद त्या आई कडे आणि मुलाकडे पाहतात व थोडा विचार करून त्या आईला म्हणतात एक आठवडयानी याला घेऊन या.आई म्हणते ठीक आहे . आणि ते दोघेजण घरी परत येतात.त्या मुलांच गोड खान चालूच असत. बघता बघता एक आठवडा निघून जातो. 

 

एक आठवडयानंतर आई मुलाला घेऊन परत विवेकानंद यांच्या कडे येते. विवेकानंद आपल नित्याच काम करत बसलेले असतात.आई पुन्हा मुलाला विवेकानंद यांच्या समोर उभं करते.विवेकानंद दोघाकडे पाहतात आणि थोडा विचार करून आईला म्हणतात तुम्ही याला एक आठवडयानी घेऊन या. आईला आश्चर्य वाटते. पण तिचा स्वामी विवेकानंद यांच्यावर विश्वास असतो की विवेकानंद यांनी सांगितले की मुलगा गोड खाणार नाही. 

 

तोही आठवडा निघून जातो. आई मुलाला घेऊन विवेकानंद यांचा कडे येते. मुलाला समोर उभा करते.स्वामी त्या मुलाकडे पाहतात आणि त्याला गोड जास्त खाल्ल्याने काय होईल. अश्या सर्व गोष्टी त्याला समजून सांगतात. चांगला उपदेश करतात.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलगा विवेकानंद यांच ऐकतो आणि वचन देतो आज पासून गोड पदार्थ जास्त खाणार नाही.आईलाही आनंद होतो. 

 

आई आणि मुलगा दोघे घरी जायला निघतात. पण आईला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, जे आज विवेकानंद यांनी मुलाला समजून सांगितले ते सर्व विवेकानंद दोन आठवड्या पूर्वी पण सांगू शकत होते. आई न राहून विवेकानंद यांना विचारते की तुम्ही हे सर्व माझ्या मुलाला अगोदर पण सांगू शकत होतात मग दोन आठवड्या नंतरच का सांगितले. 

 

swami vivekanand स्वामी विवेकानंद त्या आईकडे पाहतात.विवेकानंद यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येते आणि आईला सांगतात दोन आठवड्या पूर्वी मीच जास्त गोड पदार्थ खात होतो. या दोन आठवड्यात मी गोड पदार्थ खाणे बंद केले. मला माझी सवायी मोडण्यासाठी दोन आठवडे लागले. म्हणून मी तुमच्या मुलाला आज सांगितले की गोड पदार्थ खाऊ नकोस.

 

या प्रसंगातून एक लक्ष्यात येते की दुसऱ्याला उपदेश करताना माणसाने आपण स्वत: काय आणि कसे आहोत याचा विचार नक्कीच केला पाहिजे. म्हणून ही गोष्ट मोकार ज्ञान पाजळणाऱ्या लोकांसाठी आहे.